
Contents
शिरूर : २० वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात दोघांना २ वर्षे साधी कैदेची शिक्षा : आरोपी टाकळी हाजीचे !
शिवाजीनगर सेशन कोर्ट, पुणे | दिनांक : २८ एप्रिल २०२५:(कल्पना पुंडे यांच्याकडुन )
शिरूर : २० वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात दोघांना २ वर्षे साधी कैदेची शिक्षा :शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत २००५ साली घडलेल्या सरकारी कामात अडथळा आणणे व मारहाणीच्या प्रकरणात आज शिवाजीनगर सेशन कोर्टात निकाल लागला आहे.
गुन्हा क्रमांक ५१/२००५ अन्वये भारतीय दंड विधान कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत दाखल या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवले.
आरोपींची नावे:
•पोपट भाऊसो घोडे (वय ७४, रा. हाजी टाकळी, ता. शिरूर, जि. पुणे)
• बाळु पोपट घोडे (वय ४३, रा. हाजी टाकळी, ता. शिरूर, जि. पुणे)
न्यायालयाचे नांव:
श्री ए. आय. पेरमपल्ली, जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे
शिक्षा:
दोन्ही आरोपींना भारतीय दंड विधान कलम ३५३ व ३२३ अन्वये दोषी धरून प्रत्येकी २ वर्षे साधी कैद व प्रत्येकी १००० रुपये दंड सुनावण्यात आला आहे. दंड न भरल्यास आणखी १ महिना साधी कैद भोगावी लागणार आहे.
सरकारी वकील:
श्री प्रदीप गेहलोत
तपास अधिकारी:
पोलीस हवालदार एच.एम.लगड (मयत)
पोलीस निरीक्षक श्री. शंकर केंगार (सेवानिवृत्त)
प्रभारी अधिकारी:
श्री. संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन
कोर्ट पैरवी कर्मचारी:
पो.हवा. बाळासाहेब गदादे
मपोकाॅ रेणुका एन. भिसे
सेशन कोर्ट पैरवी अंमलदार:
श्री विद्याधर निचीत, श्रेणी PSI
जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी:
श्री संतोष घोळवे, पोलीस निरीक्षक
समन्स व वॉरंट अंमलदार:
पो.हवा. वाडेकर
पो.काॅ. प्रकाश वाघमारे
या निकालामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रकरणाला न्याय मिळाला असून शिरूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षम कामगिरीचे कौतुक होत आहे.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३2 मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील: जात्यंतक क्रांतीचे सुत्रकार ….
• सवाई शिवाजी …
• दासशुद्रांची गुलामगिरी …
• ‘मावळाई प्रकाशन ची प्रकाशने ..अंक ३२, सत्यशोधक मार्क्सवादी (1) …