
Contents
- 1 “शिरुर नगरीची धमाल गोष्ट”
- 1.0.1 शिरुर नगरी,लई झकास आणि टवटवीत, इथे प्रत्येक गल्लीत आहे एक गोष्ट लपलेली गमतीची….
- 1.0.2 ए वन चहावाला, स्थानकासमोर चौकात उभा, “ओ अरे भाऊ, खास कडक देतो चहा !” असं ओरडतो रोज सकाळी सकाळी नवा. त्याच्या दुकानाजवळ गप्पा रंगतात, शहाणे, बावळट आणि रंगेल, सगळेच एकत्र येतात…..
- 1.0.3 बाबा भाजीवाला, तर फुलाच्या गजऱ्यांत रमलेली आक्का, “आलीये मावशी आज, ताजीताजी मिरची ढोबळी!” म्हणत हसते खळखळून ‘टाळी’ असते वाजलेली…..
- 1.0.4 ‘भाव’ करायला गेलात समजा , ती म्हणते, “अहो, बाजारच महाग आहे! पण मी फक्त तुमच्यासाठी कमी केलाय भाव !”
- 1.0.5 बसवाल्या चंदाबाई , बसथांब्यावर दरडावतात, “पुढे चला! मागे थांबू नका!!” असं ओरडून गाव हलवतात.
- 1.0.6 तर पोरं आणि पोरी काॅलेजच्या धुम ठोकतात ! त्यांच्या एका घुंघरूवजा हाकेत, संपुन जाते बसची गर्दी….
- 1.0.7 देते सगळ्यांना शिस्तीत वाटचालीचा संकेत!
- 1.0.8 नाना बेवडा, गाव -शिरुरचा हरहुन्नरी गडी, हाताला नेहमी काम आणि ओठात हिंदी गाणी, “सावळी गडे तु ! पण तुला पाहून डोळा आलं गं पाणी…”
- 1.0.9 गाऊन शिरुरच्या चौका चौकात मस्त झिंगतो, गल्ल्यांनाच दुमदुमवतो.
- 1.0.10 आणि मग नाना पोरगा आणि त्याचं टोळकं, इंदिरा नगरच्या ओढ्याच्या पाण्यात धडपडुन घेतो टपकन लोळण…
- 1.0.11 गोट्या, लंगडी, भेंड्या –असा असतो खेळ सुरूच,साळतल्या पोरी पोरांचा, घरून आई ओरडते, “ये रे अंघोळ कर आधी!”
- 1.0.12 गणपतीत असते वेगळीच धमाल, सोन्या ढोलपथकाचा राजा,
- 1.0.13 ढोल बडवत गुलाल उधळुन धरतो ताल, मंडपात भारी लाईटिंगचा सोहळा…
- 1.0.14 आणि पेढ्यांची होते बरसात, “बाप्पा मोरया!” च्या गजरात मग हरवते शिरुरची सारी जनता एकजात!….
- 1.0.15 आणि संध्याकाळ आली की,
- 1.0.16 पुन्हा चौकाचौकात रंगतं मंडळ, ए वनच्या टपरीवर घेऊन चहा ,
- 1.0.17 सुरू होते ‘देशाची आणि गावाची’ चर्चा बक्कळ !…..
- 1.0.18 आणि कधीतरी मग एखादा दोस्त ‘थंड चहा’ पिऊन गडबडतो….
- 1.0.19 हवेतच हातवारे करत चहा कप उलथवतो, नाना ओरडतो, “संपलं! आता कपाची किंमत वाढली ! आणखी मागवा “….
- 1.0.20 आणि हसुन फिदीफिदी त्या रात्रीचं गातात गानं,वाऱ्यावर उडून जाणारं !…
- 1.0.21 शिरुर नगरी, कुणाला वाटते गमतीची , कुणाला प्रेमाची,तर वाटते कुणाला कुठेतरी विरहाचीही !….
- 1.0.22 इथे प्रत्येक माणूस थोडा धनचक्करचं , पण हृदय ‘सोन्याचं’ पक्क! असतं हो ठाई !…..
- 1.0.23 इथे मारतात गल्ल्या गप्पा ! रंगवतात कुणी स्वप्नं स्वस्तात !
- 1.0.24 About The Author
“शिरुर नगरीची धमाल गोष्ट”
शिरुर नगरी,लई झकास आणि टवटवीत,
इथे प्रत्येक गल्लीत आहे एक गोष्ट लपलेली गमतीची….
ए वन चहावाला, स्थानकासमोर चौकात उभा,
“ओ अरे भाऊ, खास कडक देतो चहा !” असं ओरडतो रोज सकाळी सकाळी नवा.
त्याच्या दुकानाजवळ गप्पा रंगतात,
शहाणे, बावळट आणि रंगेल, सगळेच एकत्र येतात…..
बाबा भाजीवाला, तर फुलाच्या गजऱ्यांत रमलेली आक्का,
“आलीये मावशी आज, ताजीताजी मिरची ढोबळी!” म्हणत हसते खळखळून ‘टाळी’ असते वाजलेली…..
‘भाव’ करायला गेलात समजा ,
ती म्हणते, “अहो, बाजारच महाग आहे! पण मी फक्त तुमच्यासाठी कमी केलाय भाव !”
बसवाल्या चंदाबाई , बसथांब्यावर दरडावतात,
“पुढे चला! मागे थांबू नका!!” असं ओरडून गाव हलवतात.
तर पोरं आणि पोरी काॅलेजच्या धुम ठोकतात !
त्यांच्या एका घुंघरूवजा हाकेत,
संपुन जाते बसची गर्दी….
देते सगळ्यांना शिस्तीत वाटचालीचा संकेत!
नाना बेवडा, गाव -शिरुरचा हरहुन्नरी गडी,
हाताला नेहमी काम आणि ओठात हिंदी गाणी,
“सावळी गडे तु ! पण तुला पाहून डोळा आलं गं पाणी…”
गाऊन शिरुरच्या चौका चौकात मस्त झिंगतो, गल्ल्यांनाच दुमदुमवतो.
आणि मग नाना पोरगा आणि त्याचं टोळकं,
इंदिरा नगरच्या ओढ्याच्या पाण्यात धडपडुन घेतो टपकन लोळण…
गोट्या, लंगडी, भेंड्या –असा असतो खेळ सुरूच,साळतल्या पोरी पोरांचा,
घरून आई ओरडते, “ये रे अंघोळ कर आधी!”
गणपतीत असते वेगळीच धमाल,
सोन्या ढोलपथकाचा राजा,
ढोल बडवत गुलाल उधळुन धरतो ताल,
मंडपात भारी लाईटिंगचा सोहळा…
आणि पेढ्यांची होते बरसात,
“बाप्पा मोरया!” च्या गजरात मग हरवते शिरुरची सारी जनता एकजात!….
आणि संध्याकाळ आली की,
पुन्हा चौकाचौकात रंगतं मंडळ,
ए वनच्या टपरीवर घेऊन चहा ,
सुरू होते ‘देशाची आणि गावाची’ चर्चा बक्कळ !…..
आणि कधीतरी मग एखादा दोस्त ‘थंड चहा’ पिऊन गडबडतो….
हवेतच हातवारे करत चहा कप उलथवतो,
नाना ओरडतो, “संपलं! आता कपाची किंमत वाढली ! आणखी मागवा “….
आणि हसुन फिदीफिदी त्या रात्रीचं गातात गानं,वाऱ्यावर उडून जाणारं !…
शिरुर नगरी, कुणाला वाटते गमतीची , कुणाला प्रेमाची,तर वाटते कुणाला कुठेतरी विरहाचीही !….
इथे प्रत्येक माणूस थोडा धनचक्करचं , पण हृदय ‘सोन्याचं’ पक्क!
असतं हो ठाई !…..
इथे मारतात गल्ल्या गप्पा !
रंगवतात कुणी स्वप्नं स्वस्तात !
—- By Dr.Nitin Pawar,