
Contents
- 1 “पेहलगामचे ते शेवटचे क्षण”
- 1.0.1 “पेहलगामचे ते शेवटचे क्षण”:एका बर्फाच्छादित पर्वताच्या पार्श्वभूमीवर उभं असलेलं एक प्रेमी युगुल — मुलगा मुलीला घट्ट मिठी मारतो आहे, दोघांच्याही चेहऱ्यावर काळजी आणि प्रेमाचे भाव. आजूबाजूला सगळीकडे पांढरं धुके आणि बर्फाळ दरड कोसळल्याचे चित्र. निसर्गाच्या रौद्रतेच्या मध्यात माणुसकी आणि प्रेमाची उबदार झलक.”
- 1.0.2 About The Author
“पेहलगामचे ते शेवटचे क्षण”
कथा:डा.नितीन पवार, शिरुर/पुणे.
“पेहलगामचे ते शेवटचे क्षण”: श्रीनगरच्या गजबजलेल्या गल्ल्यांमधे भेटलेले गौरव आणि अन्वी, एकमेकांच्या स्वप्नात अगदी नकळत प्रवेशकर्ते झाले होते. पर्यटनासाठी दोघं आज पेहलगामला आले.इथं स्वर्गतुल्य पहाडी,बर्फाळ निसर्गाच्या साक्षीने त्यांच्यात प्रेमाचा बहार फुलला.गगनचुंबी बर्फाच्छादित पर्वतशिखरे आणि संथ पण मंद खळखळत्या आवाजात वाहणाऱ्या लिद्दर नदीच्या गुंजणात त्यांच्या प्रेमगप्पा रंगू लागल्या.
त्या दिवशी त्यांनी बरीच लांब पायपीट केली. आरू व्हॅली गाठली. वातावरण थोडं कुंद होतं. तरीही प्रेमाच्या उबदार हवेत ते हरवले होते.
अन्वीच्या डोळ्यांत चमकणारी तरल स्वप्ने गौरव आता आपली आयुष्यभराची जबाबदारी मानू लागला होता.
पण ‘आतंका’च्या रौद्र रूपाने अचानक सगळंच थांबवलं. एका भीषण सत्र सुरु झालं ! आवाज कानठळ्या बसवणारा. फैरी फैरी ने माजवलेलं तांडव, कोसळणारे देह,आकांत,अस्रु,भय,पळापळ ! कसं सगळं अनपेक्षित,भीषण,क्रुर रुप !
या घटनेने पेहलगाम हादरलं होतं. धुक्याच्या पांढऱ्या पडद्यात अन्वी कधी हरवली हरवली गौरवला कळले नाही. तो इकडे तिकडे धावत तिला शोधू लागला. ओरडु लागला.हाका मारु लागला.तिथे चारी बाजुकडुन प्रतिध्वनित होणार्या, दरडीतल्या प्रत्येक आवाजाकडे वेड्यासारखा धावत होता.अगदी प्रभु राम सिताहरणानंतर आकांताने,दु:ख आवेगाने धावत होते.तसा. झाडे, दगड अगदी कशालाही मिठी मारून, ‘सिते,सिते’ असे म्हणत होते.तसा !
शेवटी एका छोट्याशा झाडाच्या आडोशाला गौरवला काहितरी हालचाल झाल्यासारखे जाणवले ! जखमी अवस्थेत अन्वी तेथे पडली होती.गौरवने तिला घट्ट मिठीत घेतलं.
“मी तुला सोडणार नाही,तु कुठे होतीस?काय झालं?तुला माझ्यापासुन कोणीच कधीच हिरावुन घेवु शकत नाही,” असं तो कुजबुजला.
“पेहलगामचे ते शेवटचे क्षण”:एका बर्फाच्छादित पर्वताच्या पार्श्वभूमीवर उभं असलेलं एक प्रेमी युगुल — मुलगा मुलीला घट्ट मिठी मारतो आहे, दोघांच्याही चेहऱ्यावर काळजी आणि प्रेमाचे भाव. आजूबाजूला सगळीकडे पांढरं धुके आणि बर्फाळ दरड कोसळल्याचे चित्र. निसर्गाच्या रौद्रतेच्या मध्यात माणुसकी आणि प्रेमाची उबदार झलक.”
जखमी अन्वीच्या ओठांवर एक हलकं स्मित उमटलं खरं,पण त्या भयावह घटनेत,ती जीवन आणि मरणाच्या सीमारेषेवर क्षणभर विसावली होती.थांवली होती.
त्यांनी एकमेकांना वचन दिलं —
“प्रेम हे फक्त सुखातच नाही, तर संकटातही,दु:खातही जपायचं असतं.वाचवायचं असतं.वेळ पडली तर स्वतः बलीदान द्यायचं असतं ”
त्यांच्या अतुट प्रेमाची ती ‘पेहलगाम भेट’ साक्षीदार बनली ! इथे संकटातही प्रेम फुललं आणि बळकट झालं.शाश्वत झालं !
—
1 thought on ““पेहलगामचे ते शेवटचे क्षण””