
Contents
पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल:प्रितम प्रकाश नगर येथील घटना
शिरूर २९ एप्रिल : (प्रकाश करडे यांच्याकडुन)
पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल:शिरूर पोलीस ठाण्यात एका महिलेने आपल्या पती आणि सासूविरुद्ध शारीरिक आणि मानसिक छळप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 285/2025 भा.दं.वि. कलम 85, 115(2), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शारीरिक आणि मानसिक छळ–
तक्रारदार मयुरी आदित्य चिखले (वय 27, रा. प्रीतम प्रकाश नगर, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती आदित्य नरेंद्र चिखले आणि सासू संगीता नरेंद्र चिखले (रा. ए 905, बालाजी विश्व, आयडियल डेव्हलपर्स, डीमार्ट समोर, मोशी, पुणे) यांनी 25 मे 2022 पासून सतत माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकून, किरकोळ कौटुंबिक कारणांवरून भांडणे करत शारीरिक आणि मानसिक छळ केला.
या घटनेचा तपास पोलीस नाईक राऊत करत असून, पोलीस हवालदार वारे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या गुन्ह्याचे प्रभारी अधिकारी पो.नि. श्री. संदेश केंजाळे आहेत.
या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३2 मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील: जात्यंतक क्रांतीचे सुत्रकार ….
• सवाई शिवाजी …
• दासशुद्रांची गुलामगिरी …
• ‘मावळाई प्रकाशन ची प्रकाशने ..अंक ३२, सत्यशोधक मार्क्सवादी (1) …