
शिरुर पोलीस स्टेशन
Contents
- 1 दम देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण; आण्णापूर येथे नोकरीच्या कारणावरून हल्ला, आठ जणांवर गुन्हा दाखल
दम देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण; आण्णापूर येथे नोकरीच्या कारणावरून हल्ला, आठ जणांवर गुन्हा दाखल
दम देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण:तरुण आण्णापुरचा !
शिरूर (पुणे) | प्रतिनिधी —दिनांक २ एप्रिल २०२५ — (प्रकाश करडे यांच्याकडुन)
दम देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण:
दम देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण:शिरूर तालुक्यातील आण्णापूर येथे एका तरुणास नोकरी न दिल्याच्या कारणावरून दम देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आठ आरोपींविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी तरुण आण्णापुरचा ?
फिर्यादी सूरंजन बिजेन गव्हाणे (वय 25, रा. आण्णापूर, ता. शिरूर) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 ते 5 दरम्यान आमदाबाद येथील मळगंगा लॉन्सजवळ आरोपींनी दम देऊन शिवीगाळ केली व शारीरिक मारहाण केली.
घटनेचे तपशील—
अजय प्रकाश गव्हाणे याने “तु मला एमआयडीसीत काम दिलं नाही, मी तुझे पाय तोडून टाकतो” अशी धमकी दिली. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी, म्हणजे विशाल रसीक पवार, अक्षय गि-हे (पूर्ण नाव माहिती नाही) व चार अज्ञात इसमांनी, सूरंजन गव्हाणे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
स्विफ्ट कारमधून पाठलाग —
त्याच दिवशी, आणलेल्या दोन स्विफ्ट कारमधून पाठलाग करून आण्णापूर-आमदाबाद फाट्यावर गाडी अडवून, गाडीवर दगडफेक करण्यात आली.
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल –
या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 189(2), 191(2), 191(3), 190, 115(2), 352, 351(2), 351(3) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस तपास—
या प्रकरणाचा तपास पो. ह. 2436 बनकर हे करत असून, गुन्हा पो. ह. 2498 शिंदे यांनी दाखल केला आहे. प्रकरणाचे प्रभारी अधिकारी पो. नि. संदेश केंजळे आहेत.
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…