
Contents
- 1 AI Tools वापरून स्वतःचे वेगवेगळे फोटो कसे बनवाल? | Remini, Fotor, Photo AI वापरायला शिका.
- 1.1 AI Tools वापरून स्वतःचे वेगवेगळे फोटो कसे बनवाल? | Remini, Fotor, Photo AI:
- 1.1.1
- 1.1.2 (डॉ.नितीन पवार,संपादक, सत्यशोधक न्युज,पुणे ,3 ये 2025)
- 1.1.3 AI Tools वापरून फोटो तयार करण्यामागची संकल्पना काय आहे? —
- 1.1.4 AI Tools वापरण्याचे फायदे कोनते?—
- 1.1.5 AI Tools वापरून फोटो कसे बनवावे? (स्टेप बाय स्टेप पाहु)
- 1.1.6 खाली काही लोकप्रिय व प्रभावी असे AI Tools दिलेले आहेत-
- 1.1.7 1-2 तासात तयार होणारे फोटो कसे वापरावेत?
- 1.1.8 टूल 3: Photo AI—-
- 1.1.9 AI Tools वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवा—–
- 1.1.10 निष्कर्ष काय निघतो? —
- 1.1.11 About The Author
- 1.1 AI Tools वापरून स्वतःचे वेगवेगळे फोटो कसे बनवाल? | Remini, Fotor, Photo AI:
AI Tools वापरून स्वतःचे वेगवेगळे फोटो कसे बनवाल? | Remini, Fotor, Photo AI वापरायला शिका.
AI Tools वापरून स्वतःचे वेगवेगळे फोटो कसे बनवाल? | Remini, Fotor, Photo AI:
(डॉ.नितीन पवार,संपादक, सत्यशोधक न्युज,पुणे ,3 ये 2025)
AI Tools वापरून स्वतःचे वेगवेगळे फोटो कसे बनवाल? | Remini, Fotor, Photo AI वापरायला शिका:सध्याच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आपल्याला अनेक अनोख्या गोष्टी शक्य करून देणार आहे . अगदी आपण फोटो न काढता ,शूट न करता आपले स्वतःचे हवे तसे फोटो तयार करून देते आहे.! हे, आपण बरोबर वाचलंत — आज अनेक AI Tools उपलब्ध आहेत ज्याद्वारे तुमचे फोटो वेगवेगळ्या शैलीत, पार्श्वभूमीनुसार,वेगवेगळ्या पोशाखात किंवा अगदी कार्टून/चित्रशैलीत सुद्धा तयार करून देवु शकतात.
या लेखात आपण समजुन घेउ की की AI Tools वापरून आपले स्वतःचे वेगवेगळे फोटो आपण कसे बनवू शकतो? त्याचे फायदे काय असतात,त्यासाठी कोणते टूल्स वापरले पाहिजेत, काही खर्या उदाहरणांसह आपण हे समजून घेणार आहोत.
AI Tools वापरून फोटो तयार करण्यामागची संकल्पना काय आहे? —
AI Tools चे काम हे असते की तुम्ही दिलेल्या फोटोवर आधारित विविध शैलीमधे वेगवेगळे फोटो तयार करणे. यामध्ये चेहरा ओळखणे, वय , पोशाख बदलणे, पार्श्वभूमी हटवणे अथवा नवीन पार्श्वभूमी जोडणे , पोझ बदलणे, इत्याादी गोष्टी करणे सहज शक्य होते.
हे Tools डीप लर्निंग, जनरेटिव्ह AI व इमेज प्रोसेसिंगच्या साहाय्याने काम करतात. आपल्याला फक्त एक फोटो अपलोड करायचा असतो (ते मी पुढे दाखवेन) आणि नंतर निवडायचं असतं की आपल्यलला कोणत्या प्रकारचा फोटो/Output पाहिजे आहे.
AI Tools वापरण्याचे फायदे कोनते?—
1. फोटो शूट करण्याची गरज नाही.
फोटोग्राफर, मेकअप, कपडे, स्टुडिओ या सगळ्या बाबींचा खर्च वाचतो.
2. वेळेची बचत होतै.
काही मिनिटांत विविध प्रकारचे फोटो तयार केले जातात.
3. क्रिएटिव्हतेचे स्वातंत्र्य मिळते.
ज्या ठिकाणी आपण प्रत्यक्षात जाऊ शकत नाही.त्या ठिकाणचा आपला फोटो सहज बनवता येतो .उदा. चंद्रावर, चीनमधे किंवा एखाद्या जंगलात देखील !
4. सोशल मीडियासाठी उत्तम फोटो —
इंस्टाग्राम, फेसबुक, LinkedIn, Tinder,X इ. अशा सर्व प्लॅटफॉर्मसाठी योग्य स्टाइलचे फोटो सहज बनतात येतात.
AI Tools वापरून फोटो कसे बनवावे? (स्टेप बाय स्टेप पाहु)

• पायरी 1: एक दर्जेदार सेल्फी घ्या.
• चेहरा स्पष्ट दिसेल असा फोटो असावा.
• पार्श्वभूमी शक्यतो साधी घ्या.
• चष्मा किंवा टोपी नसलेला फोटो अधिक इफेक्टिव्ह ठरतो.
• पायरी 2: योग्य असस AI Tool निवडा.
खाली काही लोकप्रिय व प्रभावी असे AI Tools दिलेले आहेत-
टूल 1: Remini AI —
Remini हे एक मोबाइल अॅप आहे.ते AI च्या साहाय्याने आपला फोटो अल्ट्रा HD मध्ये सुधारून देते.या नव्या फीचर्समध्ये “AI Photos” ही एक सुविधा आहे. त्यात आपण वेगवेगळ्या स्टाईल्समध्ये आपले स्वतःचे फोटो बनवू शकताे .
वैशिष्ट्ये कोनती ?—-
विभिन्न पोशाखांत फोटो तयार होतो. उदा. पायलट, डॉक्टर, मॉडेल इ.
सोशल मीडियासाठी योग्य पोर्ट्रेट्स बनवणे —
1-2 तासात तयार होणारे फोटो
कसे वापरावेत?
1. Remini अॅप डाउनलोड करा…
2. “AI Photo” सेक्शनमध्ये जा….
3. आपला चेहरा असलेले 8-10 फोटो इथे अपलोड करा….
4. आपल्याला हवे असलेले टेम्प्लेट किंवा थीम निवडा….
5. काही वेळाने तुमचे फोटो तयार होतील….
टूल 2: Fotor AI Avatar Generator —-
Fotor हे वेब-बेस्ड Tool आहे.ते AI चा वापर करून आपले विविध प्रकारचे ‘अवतार’ तयार करुन देते.
वैशिष्ट्ये कोनती?—-
3D, पेंटिंग, कार्टून, अॅनिमेटेड अवतार्स,
प्रोफेशनल, LinkedIn अथवा इंस्टाग्रामसाठी प्रोफाइल फोटो तयार करुन देते.
वेगवेगळी पार्श्वभूमी व पोशाख
कसे वापरावेत?—-
1. www.fotor.com या वेबसाइटवर जा….
2. AI Avatar Generator निवडा….
3. तुमचे 7-10 फोटो येथे अपलोड करा….
4.आपली आवडीची शैली निवडा…..
5. काही मिनिटांत डाउनलोड करा….
टूल 3: Photo AI—-
Photo AI हे प्रीमियम Tool आहे.ते आपले AI मॉडेल तयार करते. आपल्याला हवे तसे फोटो बनवून देते.
वैशिष्ट्ये कोनती असतात —
• स्वतःच्या virtual model तयार करते.
• कमर्शियल फोटोशूटसारखी क्वालिटी देते.
• कोड किंवा टेक्स्ट वापरून फोटो तयार करते. Prompt-based – अर्थात आपल्या सुचनेप्रमाणे.
हे कसे वापरावे?—
1. www.photoai.com या साइटला भेट द्या…..
2. एक खाते तयार करा. आपले फोटो अपलोड करा.
3. AI तुमचे एक virtual model तयार करते.
4. Text prompt/ आज्ञा द्या. विविध शैलीचे फोटो तयार करून मिळतील.
उदाहरणे—
उदाहरण 1: सविता – एक इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर आहे.
सविताने Remini वापरून वेगवेगळ्या स्टाइल्समध्ये तिचे स्वतःचे फोटो बनवले .उदा. साडी, वेस्टर्न, फॉर्मल, इथनिक इ.प्रकारांमध्ये. या फोटोंमुळे तिच्या पोस्ट्सना 3 पटीने जास्त लाईक्स मिळाले. follower count देखील झपाट्याने वाढला.
उदाहरण 2: वैशालीने तिच्या LinkedIn प्रोफाईलसाठी वापर केला.
वैशालीने Fotor वापरून तिचे प्रोफेशनल लुक देणारे 3D स्टाईलचे पोर्ट्रेट्स बनवले. त्यामुळे तिच्या जॉब प्रोफाईलला चांगला प्रतिसाद मिळाला. इंटरव्ह्यूसाठी कॉल्स वाढले.
उदाहरण 3: विकासने AI फोटोशूट वापरून ब्रँड प्रमोशन केले.
विककसने Photo AI वापरून त्याच्या स्वतःचा virtual model तयार करुन घेतल्या.त्याने आपल्या ब्रँडसाठी दर्जेदार जाहिरात फोटो तयार केले.कोनत्याही कॅमेराविना! त्यामुळे त्याच्या उत्पादनांची विक्री वाढली.
AI Tools वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवा—–

1. प्रायव्हसी महत्त्वाची असते- कोणतेही फोटो अपलोड करताना त्या टूलचे डेटा पॉलिसीचे नियम नीट वाचा.
2. फोटो चांगल्या दर्जाचे असावेत— अंधारातले, अस्पष्ट फोटो वापरू नका.
3. Over-edit करणे टाळा: नैसर्गिक, वास्तवदर्शी परिणाम पाहिजे असल्यास अति-अलंकारीक बाबी टाळा.
निष्कर्ष काय निघतो? —
AI Tools वापरून आटण स्वतःचे वेगवेगळे फोटो कसे बनवू शकतो ? याचे उत्तर सहज सोपे म्हणजे , अगदी सहज आणि तेही क्रिएटिव्ह पद्धतीने वापरता येतात. हे टूल्स अगदी सामान्य माणसालाही प्रोफेशनल लुक, अनोखे अवतार, वेगवेगळी पार्श्वभूमी व शैली सादर करण्याची संधी देतात. एकदा आपण या टूल्सचा उपयोग करून पाहावा. अनुभव घ्यावा. हा एका नव्या डिजिटल क्रांतीचा अनुभव आहे.
1 thought on “AI Tools वापरून स्वतःचे वेगवेगळे फोटो कसे बनवाल? | Remini, Fotor, Photo AI वापरायला शिका.”