
Contents
- 1 शिरूर आर्थिक फसवणूक प्रकरण:पोलीसांत गंभीर तक्रार- शिरूरच्या वेदांत मोटर्स मालकांवर १५ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप
शिरूर आर्थिक फसवणूक प्रकरण:पोलीसांत गंभीर तक्रार- शिरूरच्या वेदांत मोटर्स मालकांवर १५ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप
शिरूर आर्थिक फसवणूक प्रकरण:वेळोवळी घेतले होते पैसे?
शिरुर ,दिनांक 3 मे 2025 : (कल्पना पुंडे यांच्याकडुन )
शिरूर आर्थिक फसवणूक प्रकरण:शिरूर (पुणे) – वेदांत मोटर्सच्या मालकांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. बाबूराव नगर येथील व्यावसायिक राजेंद्र अशोक बारगुंजे (वय ४९) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात दीपक भीमराव बारवकर आणि सारिका दीपक बारवकर यांच्या विरोधात तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे.
प्रकरणाची सविस्तर हकीगत—
फिर्यादी राजेंद्र बारगुंजे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, १८ ऑक्टोबर २०२३ पासून ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत बारवकर दांपत्याने वेळोवेळी पैसे उधार घेतले. सुरुवातीला त्यांनी २५,००० + २५,००० + ५०,००० = एकूण १,००,००० रुपये नोटरी स्टॅम्पवर करार करून घेतले. मात्र, १० डिसेंबर २०२४ रोजी त्या कराराचा कालावधी संपल्यानंतरही उर्वरित १५ लाख रुपये परत दिले नाहीत.
उडवाउडवीची उत्तरे, अश्लील शिवीगाळ आणि धमक्या देण्यात आल्या—-
जेव्हा राजेंद्र यांनी परतफेडीसाठी मागणी केली, तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरे, अश्लील शिवीगाळ आणि धमक्या देण्यात आल्या. “तुझ्यावर सावकारकीचा खोटा गुन्हा दाखल करून तुला जेलमध्ये टाकतो,” अशी धमकी दिली गेल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
कायदेशीर कारवाईची सुरुवात—
या प्रकरणावर शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 278/2025 खाली खालील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
• कलम 316 (2)
• कलम 352
• कलम 351
• कलम 318 (4)
• कलम 3 (5)
• दाखल अंमलदार: पोलीस कर्मचारी टेंगले
• तपास अधिकारी: पोसई चव्हाण
• प्रभारी अधिकारी: मा. संदेश केंजळे
निष्कर्ष—–
या प्रकरणामुळे शिरूर परिसरात खळबळ माजली असून व्यावसायिक वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
——
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…