शिरुरच्या सतरा कमानीच्या पुलाची कहानी:शिरुर हा पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक तालुका आहे. हा तालुका अनेक राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार आहे. भीमा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे एक तसं छोटं शहर आहे. आज ते प्रगतीच्या मार्गावर वेगाने वाटचाल करताना दिसते आहे. पण शिरुरचा एक मोठा भाग असा आहे,की जो जुन्या काळाच्या आठवणी आजही जपून ठेवताना दिसतो. त्यापैकी एक आहे. तो म्हणजे 'सतरा कमानीचा पूल.'
(लेखक : डा.नितीन पवार,संपादक, सत्यशोधक न्युज, पुणे,4 से 2025)
शिरुरच्या सतरा कमानीच्या पुलाची कहानी:शिरुर हा पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक तालुका आहे. हा तालुका अनेक राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार आहे. भीमा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे एक तसं छोटं शहर आहे. आज ते प्रगतीच्या मार्गावर वेगाने वाटचाल करताना दिसते आहे. पण शिरुरचा एक मोठा भाग असा आहे,की जो जुन्या काळाच्या आठवणी आजही जपून ठेवताना दिसतो. त्यापैकी एक आहे. तो म्हणजे ‘सतरा कमानीचा पूल.’
“शिरुरच्या सतरा कमानीच्या पुलाची कहानी” ही केवळ दगड-धोंड्याची गोष्ट नाही.तर ती आहे शिरुरच्या ओळखीची, संस्कृतीची व इतिहासाची कहानी !
“पूल” म्हणजे काय असते?––
आपण आज अनेक पूल पाहतो .नवीन तंत्रज्ञानाने बांधलेले, उंच उड्डाणपूल, भक्कम कॉंक्रिटचे स्ट्रक्चर्स पूल. पण शिरुरचा ‘सतरा कमानींचा पूल’ काहीतरी विशेष व वेगळा आहे. हा पूल जुन्या ब्रिटिश काळात बांधला गेला आहे.
त्याचा ‘स्थापत्यशैली’ तील सौंदर्यदृष्टी आजही डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे.
सतरा कमानीच्या पूलाचा इतिहास—
सतरा कमानींचा पूल बांधला गेला तो सुमारे १८५०-६० च्या दशकातील होता. ब्रिटिश राजवटीच्या काळात पुण्याला नगरकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर भीमा नदीवर असलेला हा पूल एक अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरला होता. त्या काळी ही जागा व्यापारासाठी खूपच महत्त्वाची होती. नदी आणि तीही घोडनदी, अर्थात घोडनदी ओलांडण्यासाठी कायमस्वरूपी उपाय त्याकाळी बनला होता.
एकूण १७ कमानी—
सतरा कमानीच्या पुलाची रचना कमानी स्वरूपात करण्यात आली आहे. एकूण १७ कमानी याला आहेत. म्हणूनच याला “सतरा कमानींचा पूल” असं नाव पडलं. यातील प्रत्येक कमान सिमेंट आणि दगडांनी बांधली गेली.ती अजूनही मजबूत स्थितीत आहे.हे विशेष!
पुलाची स्थापत्यशैली व वैशिष्ट्ये—
या पूलाची रचना ब्रिटिश स्थापत्यशैलीवर आधारित आहे.प्रत्येक कमान अत्यंत काळजीपूर्वक काटेकोरपणे बांधलेली आहे. या पुलाची लांबी अंदाजे २८० मीटर आहे., तो पूर्णपणे दगडी आहे.असे नैसर्गिक साहित्य वापरून हा पूल उभारला गेला आहे.
पर्यटनस्थळ देखील—
या पुलाचा उपयोग केवळ वाहतुकीसाठी केला जात नव्हता. तर तो एक दृष्य पर्यटनस्थळ देखील बनला आहे. आजही आहे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस या कमानींमधून उधळला जाणारा प्रकाशाचा खेळ एक विहंगम दृश्य ठरणारा पाहण्यासाठी अनेक शिरुरकर आजही तिथे येतात .
कालाच्या ओघात…
पुढे कालांतराने नवीन पूल उभारला गेला. महामार्ग तयार केला गेला. शिरुरचं शहर विस्तारलं.मोठं झालं ! सतरा कमानींचा पूल आधी फक्त दोनच चाकी वाहनांसाठी खुला आहे. मोठ्या गाड्यांना बाजूचा नवीन पूल वापरण्याचे निर्देश गेले आहेत.
पण या जुन्या पूलाकडे पाहत असताना संवेदनशिल मनांना एक वेगळंच समाधान मिळतं.अनुभुती मिळते.आता हा पूल केवळ फक्त भूतकाळाचं एक प्रतिक राहिला नाही. काळाच्या ओघात टिकून राहिलेला एक साक्षीदार बनला आहे !
शिरुरकरांची सामाजिक जागरूकता व जपणूक—
शिरुरमधील सामाजिक संस्था व स्थानिक नागरिक या पूलाचे जतनासाठी पुढाकार घेत असतात. “सतरा कमानी पूल संवर्धन समिती” नावाची एक स्वयंसेवी संस्था यासाठी कार्यरत आहे. असे ही समजते. त्यांनी पुलाच्या स्वच्छतेपासून ते त्याच्या दुरुस्तीपर्यंत अनेक उपक्रम राबवले आहेत.असे सांगतात. शिरुर,शिरुर तालुका व स्थानिक शाळांमध्ये या पूलावर आधारित निबंध, चित्रकला स्पर्धा घेतल्या जातात. त्यामुळे नव्या पिढीला या पूलाचे ऐतिहासिक व वास्तूशास्त्रीय महत्त्व समजतं.समजण्याची गरजही आहे !
सतरा कमानींचा पूल संवर्धन आणि पर्यटन–
आज शिरुर शहर पर्यटनाच्या दृष्टीने अधिक विकसित होताना दिसते आहे.या सतरा कमानींच्या पुलाला एक’ heritage site ‘ म्हणून घोषित करण्याची मागणी देखील जोर पकडत आहे. जर योग्य असा प्रचार आणि पुलाची जपणूक झाली, तर हा पूल पर्यटकांसाठी एक खास आकर्षण ठरू शकतो. एक सुंदर ,’ पिकनिक पॉईंट ‘ ठरेल !
चीनसारख्या देशांचे उदाहरण —
चीनसारख्या देशांनी अशी छोटी छोटी सुंदर ठिकाणे विकसित केली.तिथे छोटा ,स्वच्छ आणि सुंदर बाजार स्थळ निर्माण केली.हे देशभर केले.छोटं उद्यान ,शौचालये,छोटे सुंदर रस्ते बनवले. विविध वस्तुंची सुंदर दुकाने,गाड्या,फलक,सुचना,सुविधा ,वाहतुक व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे तिथे रोजगार निर्माण झाले.खरेदी बरोबर छानसी ,’पिकनिक’ घडेल अशी व्यवस्था निर्माण केली. चीनच्या आर्थिक प्रगतीचा अशा नाविन्यपुर्ण निर्मितीचा हातभार लागला ! हे आपण यु ट्युबवर पाहुणे शकता ! पूलाजवळ जर विश्रांतीस्थळं, माहितीफलक, फोटोजेनिक स्पॉट्स वगैरे असतील तर हा पूल शिरुरच्या आर्थिक व सांस्कृतिक विकासाला हातभार जरुर लावेल ! पण आपल्या राजकीय व्यवस्थेची इच्छाशक्ती भलत्याच दिशेला असते !
भविष्यासाठी संकल्प—-
सतरा कमानींचा पूल म्हणजे केवळ दोन टोकं जोडणारी भौतिक एक रचना नसते. तर ती काळ, संस्कृती व समाज यांची सांस्कृतिक जोड असते. “शिरुरच्या सतरा कमानीच्या पुलाची कहानी” ही आपल्याला हेच शिकवते . इतिहासाची जपणूक ही विकासाइतकीच महत्त्वाची असते.
या पूलाला जपणं म्हणजे शिरुरचं स्वाभिमान जपणं—
हा पूल सांगतो की काळ कितीही जरी बदलला, तरी माणसांची स्मृती आणि त्यांचा इतिहास नेहमी जिवंत ठेवत आहे. ठेवु शकेल जर इच्छाशक्ती असेल भक्कम असेल तर !
उपसंहार—
‘शिरुरच्या सतरा कमानीच्या पुलाची कहानी’ ही एक प्रेरणादायी गाथा आहे. ही बाब आपल्याला आपल्याच गावाचं, इतिहासाचं व संस्कृतीचं प्रेम पुन्हा एकदा नक्कीच जागवत असते !
अशा वास्तूंचं महत्त्व केवळ त्यांच्या वयात,जुनेपणात किंवा दगडांत नुसतं. तर त्या ज्या आठवणी, कथा व इतिहास जपतात ,सांगतात – त्यात असतं !
अशा शिरुरच्या या ऐतिहासिक सतरा कमानीच्या पुलाला एक नवा उजाळा देणं, ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे – आजही आहे आणि उद्याही असेल !
—–
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…
Dr. Nitin Pawar is a journalist, social analyst and editor at Satyashodhak Blog. He writes on democracy, social justice, rural Maharashtra and political analysis with reformist perspective.