
Contents
Adda Dhad:रांजणगाव MIDC पोलिसांची मोठी कारवाई !
Jugar Adda Dhad:सात जण अटक, 12.5 लाखांचा जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त!
रांजणगाव MIDC – 07 मे 2025 : (कल्पना पुंडे यांच्याकडुन )
Jugar Adda Dhad:रांजणगाव MIDC पोलिसांनी एक मोठी कारवाई करत शिरूर तालुक्यातील बाभूळसर खुर्द गावच्या हद्दीत असलेल्या भांबर्डे ते करडे रस्त्यालगत एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जणांना अटक केली आहे. यामध्ये 12.5 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाई दि. 07 मे 2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास—-
ही कारवाई दि. 07 मे 2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खालील आरोपी जुगार खेळताना आढळून आले:
1. बाळू कृष्णाची बत्ते (42), रा. रांजणगाव
2. नवनाथ सूर्यकांत थीटे (43), रा. न्हावरे, खंडागळे वस्ती
3. संतोष बाजीराव वाळके (43), रा. करडे
4. अमोल मारुती गायकवाड (38), रा. करडे
5. नाना विक्रम पवार, रा. भांबर्डे
6. शशी वाळके, रा. बाभूळसर खुर्द
7. गोकुळ गव्हाणे, रा. न्हावरे
एकूण 12,54,800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त—
या सातही जणांकडून 24,800 रुपये रोख, मोबाईल, वाहने आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 12,54,800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अंतर्गत करण्यात आली आहे.
रांजणगाव MIDC पोलिसांची मोठी कारवाई —
या प्रकरणी पोलीस हवालदार विलास सूर्यभान आंबेकर (पो. हवा. 1881) यांनी फिर्याद दाखल केली असून तपास सहा. फौजदार दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही कारवाई सहा. पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, सहा. फौज. दत्तात्रय शिंदे, पो. हवालदार संतोष आवटी, रामेश्वर आव्हाड, आणि उमेश कुतवळ यांच्या पथकाने पार पाडली.
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवारी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३४ मध्ये काय वाचाल ..👇
✅बुद्धाची महत्ता ,मर्यादा व वारसा..
✅ बुद्ध:शरद पाटील..
✅ मेत्ता व करुणा..
✅ बुद्धकालीन समाज..
✅ ‘मावळाई प्रकाशनची प्रकाशने…