
Contents
Shirur Motor Cycle Theft:शिरूर येथे मंगल कार्यालयाच्या पार्कींगमधून मोटारसायकल चोरी!
Shirur Motor Cycle Theft:शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
Shirur 11 May 2025:(Satyashodhak News Report)
Shirur Motor Cycle Theft :दिनांक 10 मे 2025 रोजी लग्नकार्याच्या निमित्ताने समर्थ लॉन्स, शिक्कर गायचे येथे आलेल्या चितळकर कुटुंबीयांची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरी केली. याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन सी येथे गु.र.नं. 312/2025 नुसार BNS कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील—-
फिर्यादी राहुल अर्जुन चितळकर, वय 32 वर्ष, रा. साकत खुर्द, ता. नगर, जि. अहिल्यानगर (मो. 8088733876) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दिनांक 10 मे 2025 रोजी सकाळी 08:00 वाजता, ते पत्नी सुप्रिया व मुलगा सोहमसोबत मोटारसायकल (क्र. MH 16 CP 4980) वरून बिरूर न्हावरा फाटा येथील नातेवाईकाच्या लग्नासाठी निघाले.
समर्थ लॉन्स, येथे पोहचले—-
तेव्हा काही पाहुण्यांना भेटून, रांजणगाव गणपती दर्शन घेतल्यावर 1:30 वाजता समर्थ लॉन्स, शिक्कर गायचे येथे पोहचले. त्यांनी मोटारसायकल हँडल लॉक करून कार्यालयाच्या बाहेर पार्किंगमध्ये लावली. मात्र, लग्न सोहळ्यानंतर दुपारी 3:00 वाजता परत निघताना त्यांना आपली मोटारसायकल पार्किंगमधून गायब असल्याचे लक्षात आले.
चोरी गेलेल्या मालाची माहिती—-
✅मोटारसायकल क्रमांक: MH 16 CP 4980
✅कंपनी: Honda Pine
✅रंग: काळा रंग, टाकीवर लाल पट्टा
✅किंमत: अंदाजे ₹40,000/-
✅चॅसी नंबर: ME4JC65DHKG064389
✅इंजन नंबर: JC65EG0131824
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने हँडल लॉक तोडून ही मोटारसायकल चोरून नेली आहे.
पोलीस तपास—-
या घटनेची नोंद सहायक फौजदार बनकर यांनी घेतली असून पोहवा 2498 शिंदे तपास करत आहेत. स्थानिक नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच कोणालाही सदर मोटारसायकल संबंधित माहिती मिळाल्यास तात्काळ शिरुर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुलभूत माहिती—
✅गुन्हा दाखल दिनांक: 10 मे 2025 (वेळ: 19:56 वा.)
✅घटना घडल्याचा कालावधी: 18 मे 2025 रोजी 1:38 ते 3:00 वा. दरम्यान
✅घटनास्थळ: समर्थ लॉन्स, शिक्कर गायचे, ता. शिरुर
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवारी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३४ मध्ये काय वाचाल ..👇
✅बुद्धाची महत्ता ,मर्यादा व वारसा..
✅ बुद्ध:शरद पाटील..
✅ मेत्ता व करुणा..
✅ बुद्धकालीन समाज..
✅ ‘मावळाई प्रकाशनची प्रकाशने…