
शिरूरमध्ये रस्त्याच्या वादातून मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
निमगाव दुडे, शिरूर | 11 मे 2025:(Satyashodhak News Report )
रस्ता करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाच कुटुंबातील व्यक्तींवर हाताने, काठ्यांनी आणि दगडांनी मारहाण झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे येथे घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, श्री काशिनाथ दादाभाऊ वागदरे (वय 50, व्यवसाय – शेती, रा. निमगाव दुडे) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, 11 मे रोजी दुपारी 1:30 वाजता वरील आरोपींनी त्यांना, त्यांच्या पत्नी सुनीता व भावजय लिलाबाई यांना मारहाण केली.
आरोपींमध्ये खंडू भाऊसाहेब शिंदे, रखमा शिंदे, योगेश उत्तम शिंदे, राहुल उत्तम शिंदे तसेच इतर दोन ते तीन अनोळखी इसमांचा समावेश आहे.
या आरोपींनी शिवीगाळ करत धमकावल्याचेही तक्रारीत नमूद आहे. वादाचे कारण रस्ता करण्यावरून निर्माण झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गु. र. नं. 315/2025 नोंदवण्यात आला असून, भारतीय दंड संहिता (BNS) कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 191(2), 191(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक बनकर तपास करत असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
—–