
Contents
शिरूरमध्ये मोटरसायकल चोरीची घटना; गुन्हा रजिस्टर, चोरटा अद्याप फरार
शिरूर, पुणे –12 मे 2025:(Satyashodhak News Report )
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पुन्हा एकदा चोरीची घटना घडली आहे. विशाल मारुती मोरे (वय ३१ वर्षे), व्यवसाय वीटभट्टी, रा. बाफना मळा, शिरूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची हिरो होंडा एचएफ डिलक्स (क्रमांक MH12KH4741) ही मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.
ही घटना ५ मे २०२५ सकाळी ११:०० वाजता ते ६ मे २०२५ सकाळी ७:०० वाजेपर्यंत, राजनंदिनी हॉटेल व कोळपे हॉस्पिटल यांच्या मध्ये असलेल्या पंचशील दुकानासमोर घडली. फिर्यादींनी मोटरसायकल त्या ठिकाणी पार्क केली होती.
चोरीस गेलेल्या दुचाकीची माहिती—-
✅ब्रँड: हिरो होंडा एचएफ डीलक्स
✅रंग: काळा (निळ्या पट्ट्यासह)
✅इंजिन नंबर: HA11EF09J11952
✅चेसी नंबर: MBLHA11EW09J07216
✅किंमत: अंदाजे ₹15,000
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 316/2025 अन्वये BNS कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोहवा/25 जगताप यांच्याकडे नोंद करण्यात आली असून तपास पो.हवा. राऊत करत आहेत.
शहरात दररोज वाढणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस प्रशासनाकडून अधिक दक्षतेची मागणी नागरिकांकडून होत आहे.