Contents1 शिरूरमध्ये अज्ञात चोरट्याने पार्किंगमधून स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरली !1.0.1 About The Author1.0.1.1 Dr.Nitin Pawar1.0.2 ❤️ Support Satyashodhak Blog शिरूरमध्ये अज्ञात चोरट्याने पार्किंगमधून स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरली ! शिरूर, 12 मे 2025 (सत्यशोधक न्यूज) – शिरूर शहरातील बाबुराव नगरमधील श्री स्वामी समर्थ अपार्टमेंटमधून एका नागरिकाची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी योगेश जिवराव पाटील (वय 31 वर्ष, राहणार श्री स्वामी समर्थ अपार्टमेंट, बाबुराव नगर, शिरूर) हे ITC कंपनीत रांजणगाव एमआयडीसी येथे खाजगी नोकरी करतात. त्यांची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (MH 19 EH 3729) दिनांक 11 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये हँडल लॉक करून लावण्यात आली होती. रात्री 11:30 वाजता ते घरी परतल्यावर मोटरसायकल पार्किंगमध्ये होती. मात्र 12 मे रोजी पहाटे 5 वाजता अपार्टमेंटमधील रहिवासी प्रकाश तांबे यांनी पार्किंग गेटचा गोविंदा तुटलेला पाहिला आणि इतर रहिवाशांना जागे केले. योगेश पाटील हे खाली आल्यानंतर त्यांच्या मोटरसायकलचे गायब असलेले लक्षात आले. परिसरात शोध घेतल्यावरही ती मिळून न आल्याने त्यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. चोरी गेलेली मोटरसायकल 70,000/- रुपये किमतीची असून तिचा चेसी क्रमांक MDLHAW237PHK4471 आणि इंजिन क्रमांक HA11E8PHK63676 असा आहे. या प्रकरणी गु. र. नं. 320/2025 अन्वये भारतीय दंड विधान कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक शिंदे हे करत आहेत. About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन शिरूर: तांबे वस्ती येथील घरफोडी प्रकरण, 2.80 लाख रुपयांचा ऐवज चोरीला Hath bhatti Daru Virodhi Andolan शिरूरमध्ये गावठी हातभट्टी दारूविरोधात अमरण उपोषणाची घोषणा — योगेश भोसले यांचा इशारा!