
Contents
Hath bhatti Daru Virodhi Andolan शिरूरमध्ये गावठी हातभट्टी दारूविरोधात अमरण उपोषणाची घोषणा — योगेश भोसले यांचा इशारा!
शिरुर,दि.13 मे 2025 :(सत्यशोधक न्यूज रिपोर्ट )

Hath bhatti Daru Virodhi Andolan:शिरूर तालुक्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या हातभट्टी गावठी दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत असून, शासन व प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. योगेश भोसले यांनी केला आहे.
श्री. भोसले अमरण उपोषणाला बसणार—
श्री. भोसले यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, तहसीलदार व पोलीस उपायुक्त यांना निवेदनाद्वारे कळवले आहे की, १३ मे २०२५ पासून ते स्वतः अमरण उपोषणाला बसणार आहेत. या निवेदनात त्यांनी नमूद केलं आहे की, संपूर्ण तालुक्यात पाण्याची उपलब्धता नसली तरी, गावोगावी हातभट्टी दारू सहज उपलब्ध आहे.
गेल्या वर्षभरात किमान १०० हून अधिक मृत्यू—
दारूच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तींमुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होत असून, गेल्या वर्षभरात किमान १०० हून अधिक मृत्यू झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
दिनांक २० मार्च २०२५ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे याबाबत तक्रार दाखल करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
इशाराही त्यांनी दिला—-
या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने वेळेत लक्ष दिले नाही, तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा स्थितीत संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आणखीन वाचण्यासारख्या बातम्या…
Shirur Electricity Office: Chori शिरूर वीज वितरण कार्यालयातून ३२ हजारांचा माल चोरट्याने चोरून नेला !
PM KISAN पीएम किसान योजनेत आपले नाव नाही? हे करा लगेच !
Personal Injury Lawyer – Marathi Guide:वैयक्तिक दुखापत वकील कसा निवडाल? – संपूर्ण मार्गदर्शक