
Contents
- 1 Loan Guide in 2025 : 2025 मध्ये कर्ज कसे मिळवावे?
- 1.0.1 प्रस्तावना:
- 1.0.2 1.Loan Guide in 2025 मधे कर्जाचे प्रकार – तुमच्या गरजेनुसार कर्ज निवडा—-
- 1.0.3 2. कर्ज घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोनती? (Documents Required)
- 1.0.4 3.Loan Guide in 2025 मधेडिजिटल अॅप्सद्वारे कर्जासाठी अर्ज –
- 1.0.5 4. CIBIL स्कोअर –
- 1.0.6 CIBIL सुधारण्यासाठी टिप्स पुढील प्रमाणे—-
- 1.0.7 5.Loan Guide in 2025 मधेसरकारी योजना – गरीब व मध्यमवर्गासाठी वरदान
- 1.0.8 6. बँक कर्ज मंजुरीसाठी महत्त्वाच्या टीप्स पुढील प्रमाणे (Best Practices):
- 1.0.9 7. EMI पद्धती कशी निवडावी? – आर्थिक नियोजनाचा पाया
- 1.0.10 8. लोन फसवणुकीपासून सावध रहा—
- 1.0.11 निष्कर्ष असा—-
- 1.0.12 अधिक माहिती इथे पहा …
- 1.0.13 About The Author
Loan Guide in 2025 : 2025 मध्ये कर्ज कसे मिळवावे?
(Article by Dr.Nitin Pawar,Ediror-Satyashodhak News,Pune)
प्रस्तावना:
Loan Guide in 2025:कर्ज ही एक जवळजवळ प्रत्येकाची गरज आहे ! घर बांधायचं असो, व्यवसाय सुरू करायचा असो, शिक्षण करायचं असो वा अचानक उद्भवलेली आर्थिक परिस्थिती किंवा अडचण सांभाळायची असो. पण 2025 मध्ये कर्ज घेणं म्हणजे केवळ बँकेत फॉर्म भरून वाट पहात बसणं राहिलेले नाही .या डिजिटल युगात आपण मोबाईलवरूनही काही मिनिटांत कर्ज घेऊ शकतो यावर आता आपला विश्वास असणे किंवा बसणे शक्य आहे . या लेखात आपण पाहूया 2025 मधील Loan Guide अर्थातच कर्जाचे प्रकार, अर्जाची प्रक्रिया, कागदपत्रे, स्कोअर, मोबाईल अॅप्स, सरकारी योजना व काही महत्त्वाच्या टीप्स या सर्व बाबींची माहिती.
1.Loan Guide in 2025 मधे कर्जाचे प्रकार – तुमच्या गरजेनुसार कर्ज निवडा—-
कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही हे समजून घ्या की तुमची गरज कोनती आहे? त्यानुसार कर्जाचा प्रकार निवडणे अत्यंत आवश्यक आहे.
2. कर्ज घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोनती? (Documents Required)
2025 मध्ये अनेक बँका आणि NBFCs ने ‘पेपरलेस प्रोसेस’ सुरू केलेली आहे. म्हणुन
खालील मूलभूत कागदपत्रे आवश्यक आहेत.
• आधार कार्ड व पॅन कार्ड
• बँक स्टेटमेंट (६ महिने)
• उत्पन्नाचे पुरावे (सैलरी स्लिप / IT रिटर्न्स)
• व्यवसाय असल्यास GST प्रमाणपत्र
• CIBIL स्कोअर तपशील
3.Loan Guide in 2025 मधेडिजिटल अॅप्सद्वारे कर्जासाठी अर्ज –
2025 मधील नविन ट्रेंड
√√√ आज आपण मोबाईलवरून पर्सनल लोन देखील घेऊ शकतो.तेही फक्त काही मिनिटांत. काही
विश्वसनीय अॅप्स पुढील प्रमाणे–
• KreditBee
• Navi Loan
• CASHe
• MoneyTap
• LazyPay
पण सावधान! –
फसवणूक टाळण्यासाठी RBI List of Approved NBFCs वरून माहिती तपासुन पहा.
4. CIBIL स्कोअर –

कर्ज मंजुरीतले गुपित!
कर्ज मंजुरीसाठी तुमचा CIBIL स्कोअर हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सामान्यतः 750 च्या वर स्कोअर असणाऱ्यांना सहज कर्ज मंजूर होते.
CIBIL सुधारण्यासाठी टिप्स पुढील प्रमाणे—-
• क्रेडिट कार्डची बिलं वेळेवर भरा
• जास्त लोन अर्ज करू नका
• जुने कर्ज क्लिअर करा
• तुमचा स्कोअर इथे तपासा
5.Loan Guide in 2025 मधेसरकारी योजना – गरीब व मध्यमवर्गासाठी वरदान
2025 मध्ये काही प्रमुख योजना अशा —-
• PM Mudra Loan Yojana – (लघुउद्योगांसाठी)
• Stand-Up India Scheme – महिला व अनुसूचित जाती/जमातीसाठी
• Kisan Credit Card (KCC) – शेतकऱ्यांसाठी
• Education Loan Subsidy Scheme – गरीब विद्यार्थ्यांसाठी
• Mudra योजनेबाबत अधिक माहिती इथे
6. बँक कर्ज मंजुरीसाठी महत्त्वाच्या टीप्स पुढील प्रमाणे (Best Practices):
• चांगली क्रेडिट हिस्ट्री ठेवा
• सह-अर्जदार ठेवल्यास कर्ज मंजुरी शक्यता वाढते
• कर्जाची रक्कम व EMI तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत योग्य ठेवा
• सर्व कागदपत्रे व्यवस्थित आणि अपडेटेड ठेवा
• बँक/NBFC च्या ऑफिशियल वेबसाइटवरूनच अर्ज करा
7. EMI पद्धती कशी निवडावी? – आर्थिक नियोजनाचा पाया
EMI म्हणजेच मासिक हप्ता योग्य पद्धतीने ठरवल्यास तुमचं आर्थिक नियोजन बिघडत नाही.
EMI ठरवताना लक्षात घ्या:
• तुमचं मासिक उत्पन्न
• इतर कर्जांची जबाबदारी
• लवकर फेडायचं की दीर्घकाळात?
• लोन इन्शुरन्स आहे का?
8. लोन फसवणुकीपासून सावध रहा—
2025 मध्ये लोन अॅप्सच्या नावाखाली हजारो लोकांची फसवणूक देखील झाली आहे.
काही धोके असे—
• अवास्तव प्रोसेसिंग फी
• उगाचच कॉल/व्हॉट्सअॅप मेसेज
• वैयक्तिक माहिती चोरी
• धमक्यांचे कॉल्स
बचावासाठी उपाय—-
• कोणताही अॅप डाउनलोड करताना RBI मंजुरी तपासा
• अधिकृत वेबसाईट वापरा
• कुठेही OTP शेअर करू नका
निष्कर्ष असा—-
Loan Guide in 2025 मधे शहाणपणाने घ्या . 2025 मध्ये कर्ज मिळवणे सोपे आहे हे खरे ! ते पण शहाणपणाने घेतले तरच फायदेशीर ठरते.कर्जासाठी कोणताही अर्ज करण्याआधी कर्जाची गरज, परतफेडीची क्षमता व व्याज दर याचा नीट अभ्यास करा. विविध बँकांची तुलना करा.कर्जाचा प्रकार ठरवा. फसवणुकीपासून सावध राहा.
satyashodhak.blog वरील हा लेख वाचा, शेअर करा आणि इतरांनाही आर्थिक ज्ञानात मदत करा.
अधिक माहिती इथे पहा …
https://www.mudra.org.in
https://www.standupmitra.in
https://www.cibil.com
https://www.rbi.org.in
अशीच आणखीन माहिती वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा—-
Share Market 2025 For Beginners: “शेअर मार्केट म्हणजे काय? | नवशिक्यांसाठी संपूर्ण माहिती”
1 thought on “Loan Guide in 2025 : 2025 मध्ये कर्ज कसे मिळवावे?”