
Contents
- 1 Shirur News Ganja Case:शिरूर मधे लागोपाठ दुसरा ‘गंजाडी’ पोलिसांच्या तावडीत?२५ वर्षीय युवक अमली पदार्थासह अटक
- 1.0.1 Shirur News Ganja Case : 25 वर्षीय युवक अमली पदार्थासह आढळल्याने अंमली पदार्थांच्या ‘मोठ्या’ ‘धंद्यांची(?)’ शक्यता !
- 1.0.2 Shirur News Ganja Case मधे गुप्त बातमीवरून ही कारवाई—-
- 1.0.3 चिलीममध्ये काळसर-हिरवट पदार्थ टाकून धुर घेत होता—
- 1.0.4 Shirur News Ganja Case मधे वैद्यकीय तपासणी नंतर गुन्हा दाखल —
- 1.0.5 आपल्यासाठी उपयुक्त माहिती खाली क्लिक करून मिळवा —
- 1.0.6 About The Author
Shirur News Ganja Case:शिरूर मधे लागोपाठ दुसरा ‘गंजाडी’ पोलिसांच्या तावडीत?२५ वर्षीय युवक अमली पदार्थासह अटक
Shirur News Ganja Case : 25 वर्षीय युवक अमली पदार्थासह आढळल्याने अंमली पदार्थांच्या ‘मोठ्या’ ‘धंद्यांची(?)’ शक्यता !
शिरूर, पुणे | 17 मे 2025: (Satyashodhak News Report)
Shirur News Ganja Case:शिरूर पोलिसांनी दिनांक १६ मे २०२५ रोजी संध्याकाळी मौजे शिरूर गावातील गोपाळ वस्तीत छापा टाकून एका युवकाला बेकायदेशीररित्या अमली पदार्थाचे सेवन करताना रंगेहात अटक केली आहे. आरोपी कृष्णकुमार श्री कालीचरण कुशवाह (वय २५, मूळ – आग्रा, सध्या – सोनार आळी, शिरूर) याच्यावर एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ८(क) व २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shirur News Ganja Case मधे गुप्त बातमीवरून ही कारवाई—-
पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने (हवालदार नाथासाहेब जगताप, पोलीस अंमलदार विजय शिंदे) गस्त घालत असताना गुप्त बातमीवरून ही कारवाई करण्यात आली.
चिलीममध्ये काळसर-हिरवट पदार्थ टाकून धुर घेत होता—
आरोपी झाडाच्या आडोशात चिलीममध्ये काळसर-हिरवट पदार्थ टाकून आकडीच्या सहाय्याने धूर घेताना आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून त्याच्या ताब्यातील चिलीम, गांजासदृश पदार्थ व आगपेटी जप्त केली आहे.
Shirur News Ganja Case मधे वैद्यकीय तपासणी नंतर गुन्हा दाखल —

त्याची वैद्यकीय तपासणी ग्रामीण रुग्णालय, शिरूर येथे करण्यात आली असून, गुन्हा पोलीस स्टेशन गु. र. नं. ३३०/२०२५ अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पो. ह. जगताप करीत असून, पुढील चौकशी सुरु आहे.
या प्रकरणी सरकारी फिर्याद पोलीस अंमलदार अजय हरिश्चंद्र पाटील यांनी दिली आहे.
आपल्यासाठी उपयुक्त माहिती खाली क्लिक करून मिळवा —
पुणे ग्रामीण पोलिसांची अधिकृत वेबसाइट
गावकऱ्यांसाठी कायदेशीर मदत व सल्ला – महाराष्ट्र पोलीस
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या वाचा खालील लिंक वर क्लिक करून —
Shirur Cheating 4 Laksh Case: चार लाखांची विश्वासघातकी फसवणूक; शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल