
Contents
Shirur News Cheating 4 Laksh Case: चार लाखांची विश्वासघातकी फसवणूक; शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल
शिरूर, पुणे (दि. 17 मे 2025):(Satyashodhak News Report )
Shirur News Cheating 4 Laksh Cases मधे शेती व गु-हाळ व्यवसाय करणाऱ्या शरद लक्ष्मण आसवले (रा. आलेगाव पागा, ता. शिरूर) यांच्या तक्रारीवरून तब्बल १० जणांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा IPC कलम 318 (1)(2)(4), 3(5) अंतर्गत दाखल झाला असून गुन्हा क्रमांक 340/2025 असा आहे.
Shirur News Cheating 4 Laksh Cases मधील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत—
कुणाल ताराचंद मालचे, रामा लक्ष्मण भिल, बापु सदा भिल, शांताराम सोमा भिल, गोरख रामचंद्र भिल, नाना नामदेव भिल, संजय शांताराम भिल, विठोबा पंडीत भिल, संजय सुरसिंग सोनवणे (सर्व रा. वराड बुद्रक, ता. धरणगाव, जि. जळगाव).
फिर्यादी आहेत शरद आसवले—
फिर्यादी शरद आसवले यांच्या मते, ऑगस्ट 2024 ते 7 सप्टेंबर 2024 या कालावधीत आरोपींनी विश्वास संपादन करून त्यांच्या गु-हाळासाठी कामगार पुरवण्याचे आमिष दाखवले. कामगारांच्या नावे प्रत्येकी ₹५०,००० अशा एकूण ₹४ लाखांची रक्कम रोख स्वरूपात घेण्यात आली. तसेच कुणाल मालचे याने फोन पेद्वारे आणखी ₹१.२८ लाख घेतले. हे पैसे घेतल्याची नोंद नोटरीद्वारे ६ सप्टेंबर २०२४ रोजी एंडोल (ता. एरंडोल) येथे करण्यात आली होती.
परंतु, या आरोपींनी कामगार न पाठवता, ना पैसे परत करत शरद आसवले यांची विश्वासघाताने फसवणूक केली.
Shirur News Cheating 4 Laksh Cases चा पोलिस तपास—

• दाखल अंमलदार: पोलिस हवालदार टेंगले
• तपास अधिकारी: पो. ह. भोते
• पोलीस निरीक्षक: श्री. संदेश केंजळे, शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण
या घटनेमुळे स्थानिक भागात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली आहेत.
पोलिस भरती आणि गुन्हे माहिती –
फसवणूक विरोधी कायदे – भारत सरकारी
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या वाचा खालील लिंक वर क्लिक करून …