"मी वैष्णवी हगवणे बोलतेय..." हे आत्मकथन एका दडपलेल्या आवाजाचं प्रतीक आहे – अन्यायाने गप्प केलेल्या प्रत्येक मुलीच्या हक्काचा, स्वाभिमानाचा आणि न्यायाच्या लढ्याचा आवाज. वैष्णवीसाठी न्याय मागणाऱ्या या मोहिमेचा भाग बना आणि तिच्या आठवणीला न्याय मिळवून द्या.
माझा आवाज आज हलकासा का होईना, पण आज जगाच्या कानावर जावा, हीच माझी इच्छा आहे. माझ्या आयुष्याच्या भीषण धगधगत्या राखेतून,आज एक हुंकार उठतोय –
“मी अस्तित्वात आहे…मी अस्तित्वात राहणार ! मी लढली आहे… आणि मी लढत राहणार आहे!”
तसं माझं बालपण अगदी साधं-सोपं होतं. घरात आई-बाबांचा आधार होता. शिक्षणाची ओढ व स्वप्नांना भरती होती. “जिथे इच्छा तिथे मार्ग” या म्हणीप्रमाणे मी माझं शिक्षण, करिअर, व स्वतंत्र अस्तित्व उभारण्यासाठी धडपड करत होते.
पण आपलं आयुष्य म्हणजे “साखरझोपेतील स्वप्न नसतं , तर काट्यांवर चालण्याचं दिव्य असतं”
कॉलेजमध्ये शिकत असताना, माझी ओळख एका मैत्रीणीने एकाशी करून दिली. ओळख मैत्रीत, मैत्री प्रेमात, नंतर प्रेम…आणि शेवट फसवणुकीत झाला ….
शब्द देऊन त्याने ‘तो’ नि ‘त्यांनी’ शब्दांचा खेळ खेळला. प्रेमाचं नाटक करून, सगळं आयुष्य गोंजारल्यासारखं दाखवलं त्यांनी ,
अचानक उमजलं , माझा फक्त वापर झाला.त्याचे ‘घरचे’ लालसी निघाले !
त्याने नी त्यांनी लग्नाचे आश्वासन दिले,आणाभाका घेतल्या,
पण ते आश्वासन कागदावर नाही, फक्त बोलण्यापुरते होते.’त्यांना’ हवी होती अधिक संपत्ती माझ्याकडुन!
अनेक वेळा ‘त्यांनी’ माझा वापर केला. जेव्हा मी सगळं थेट त्याच्या कुटुंबासमोर उघड केलं, तेव्हा ‘त्यांनी’ मला नकार दिला.माझ्या जगण्यालाही दिला नकार !
“माझं आहे तरी कोण?” हा प्रश्न आयुष्यभरासाठी छाताडात कोरला गेला माझ्या ! ह्दयात गेला कोरला !
पोलिस स्टेशनचे उंबरठे झिजवले मी ! पण समाजाच्या नजरा ‘विचित्र’ होत्या. “मुलीचं चुकतं” हे वाक्य काही जणांच्या तोंडात तयार असायचं .
पण मी गप्प बसले नाही. मी पोलिसात फिर्याद दिली. माझं नाव, माझी लढाई मग बातम्यांत झळकू लागली.
“असत्य कितीही मोठं असलं, तरी सत्याचं एक पाऊल जास्त भारी असतं .”
शहरातील बातम्यांमध्ये “वैष्णवी हगवणे प्रकरण” हे नाव आज येऊ लागलं. काहींनी पाठिंबा दिला. काहींनी कुजबुज केली.
पण मी एकच ठरवलं – “जग कितीही ओरडो, आपण आपला आवाज गमावू नये.”
एका ठिकाणी एका पत्रकाराने विचारलं, “तुम्ही एवढं का सहन केलतं?” मी हसून उत्तर दिलं –
“प्रेमात समजून घेतलं हो ! पण नातं जर जबरदस्तीचं वाटू लागलं, तर तो जुलूम नसतो का? जुलूमाविरुद्ध उठणं ही जबाबदारी कुणाची ?” “मी मोडले नाही, थोडीशी वाकली जरुर ! पण, आता पुन्हा उभी राहतेय!’प्रतिक’ बनुन !
माझा आवाज आता इतर मुलींसाठीही ‘आवाज’ बनतोय .अनेकजणी मला भेटतात, त्यांच्या व्यथा सांगतात.
मी त्यांना सांगते –
“अगं स्वतःवर विश्वास ठेवा, कारण विश्वास हेच पहिलं शस्त्र आहे!”
शब्दांचा चांगला वापर करणारा ‘तो’ व ‘ते’ शेवटी कायदा व समाजाच्या चौकटीत सापडतीलचं , यावर आहे विश्वास माझा !
“गोड गोड बोलणाऱ्यांच्या तोंडात काटा असतो, पण सत्याची तलवार बोचते खरी, पण तीच न्याय देते.” हे खरे ठरेल.
आजही डोळ्यांत पुष्कळ अश्रू येतात. आईबाबांची काळजी वाटते मला, पण त्याचवेळी मनात एक आग पेटली आहे –
“मी घाबरले असते, तर आज मी गप्प बसले असते ना !”
कधी कधी वाटतं, हे सगळं स्वप्नचं होतं का? पण नाही… ही माझी कहाणी आहे.माझी वेदना आहे,माझी शोकांतिका आहे !
“जखमांचं प्रदर्शन नाही केलं मी , पण प्रत्येक जखमेने मला कणखर केलं.”
आज मी सर्व मुलींना सांगू इच्छिते – “प्रेम करा,लग्न करा, पण डोळसपणे. आणि जर कोणी तुमचं शोषण करेल , तर आवाज उठवा.”
“तोंडावर हसणारे सारेच आपले नसतात, तसेच ते शब्दांचे ‘गोडवे’ प्रेमाचे नसतात.”
कधी कधी मनात प्रश्न पडतो – “यात माझं काय चुकलं होतं?”
उत्तर मिळत नाही या प्रश्नांवर ! पण पुढे जाणार , हे नक्की ठरवलंय.एक ‘प्रतिक’ बनुन.
“आयुष्य म्हणजे प्रवाह, एका अपघातामुळे संपूर्ण दिशा चुकवायची नसते.”
‘सत्यशोधक न्यूज’ ने माझी कहाणी समाजापर्यंत पोहोचवली आणि त्याबद्दल मी त्यांच्या ऋणात आहे. कारण,”ज्यांना आवाज द्यायचाच नाही, अशांसाठी माध्यमं हेच एकमेव शस्त्र असतात.”
आज मी म्हणते…
“मी वैष्णवी हगवणे बोलतेय – मी बळी नाही, मी योध्दा आहे!”
शेवटी एक शेर…
“चुप रहके सहना मेरी फितरत में नहीं, ज़ुल्म के आगे झुकना मेरी आदत में नहीं, जो जलाते हैं औरों के सपने, उन्हें चैन की नींद भी नसीब नहीं!”
“मी वैष्णवी हगवणे बोलतेय…” चे लेखक डॉ. नितीन पवार, शिरुर /पुणे.
” टिप – हे ‘आत्मकथन ‘ संभाव्य सत्य’ व ‘कल्पना ‘ यांचे मिश्रण आहे, प्रतिकात्मक आहे.’ हुंडाबळी’ सारख्या अनिष्ट प्रथेविरुद्ध एक आवाज आहे.कुणाची बदनामी करणे किंवा भावना दुखवणे हा या मागील हेतु नाही.पण एका अनिष्ट प्रथा व तिचा बळी कोणी ठरणे,तेही आजच्या भारतात,समाजात, लोकशाहीत हे निंदनीय व कठोर शिक्षेस पात्र नक्कीच आहे.त्यासाठी आवाज उठवण्यासाठीच मी सत्यशोधक न्युज, डिजिटल मिडिया पत्रकारिता ,संपादन व लेखन करतो.
–— लेखक: डॉ. नितीन पवार,संपादक, सत्यशोधक न्युज, शिरुर /पुणे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com