
Shirur Crime News Gharfodi:
शिरूरमध्ये बंद घरफोडी : गुजरमळा भागातून 62,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला
Shirur Crime News Gharfodi 27 May 2025 | Satyashodhak News Report |
Shirur Crime News Gharfodi ची घटना घडली आहे. शहराच्या शांततेला धक्का देणारी ही एक गंभीर घटना शिरूरमध्ये समोर आली आहे. शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा 356/2025 नुसार, शिरूर तालुक्यातील गुजरमळा परिसरातील एका घरातून तब्बल 62,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.
अज्ञात चोरट्याचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश—
ही घटना दिनांक २४ मे २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतच्या वेळेत घडली. घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि 1) 5 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या कानातील रिंग्ज (किंमत अंदाजे 42,000/- रुपये) आणि 2) 2.5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे 20,000/- रुपये) असा एकूण 62,000 रुपयांचा ऐवज लंपास केला.
फिर्यादी माधुरी नारायण तरटे या गुजरमळा येथील —
फिर्यादी माधुरी नारायण तरटे (वय ३५), व्यवसाय – नोकरी, रा. गुजरमळा, शिरूर यांनी शिरूर पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी सांगितले की, कोणीतरी अज्ञात इसमाने संमतीशिवाय घरफोडी करून वरील दागिने चोरून नेले आहेत.
शिरूर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल —-

याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे भा. दं. वि. कलम 331 (3), 305 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार चागताप (25) करत आहेत. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
दाखल अंमलदार सफी कदम यांनी ही गुन्ह्याची नोंद घेतली आहे.
या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, स्थानिकांनी पोलिसांकडून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी केली आहे.
शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा 356/2025 हे प्रकरण गंभीर असून लवकरात लवकर अज्ञात चोरट्याला पकडावे अशी अपेक्षा आहे.
वाचकांसाठी सूचना—-
आपणही आपल्या घराचे लॉकिंग सिस्टीम मजबूत ठेवा आणि शक्यतो घर बंद ठेवताना शेजाऱ्यांना माहिती द्या. अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवा आणि संशयास्पद हालचाली असल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधा.
उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक व क्लिक करा. ….
शिरूर पोलीस स्टेशन माहिती – पुणे ग्रामीणhttps://शिरूर पोलीस स्टेशन माहिती – पुणे ग्रामीण
गृहसुरक्षेसाठी १० महत्त्वाचे उपाय
गुन्हेगारी तक्रार कशी नोंदवावी – सरकारी मार्गदर्शक
हा लेख आपल्या सत्यशोधक न्युज – satyashodhak.blog वर वाचा आणि गुन्हेगारीविरोधातील सजग नागरिक बना.
सत्यशोधक न्युज च्या आणखीन उपयुक्त व माहिती पुर्ण बातम्या व लेख वाचण्यासारखी खालील लिंक वर क्लिक करा.
Shirur News 16 Years Girl Missing : वॉशरूमला गेलेली बहाणा 16 वर्षीय तरुणी पळाली? वाचा सविस्तर. .