
Contents
Support Cancer Patients: गरीब कुटुंबासाठी देवदूत ठरले बजरंग दल व दलित महासंघ ; कॅन्सर रुग्णासाठी दिला आर्थिक मदतीचा हात !
Support Cancer Patients Vishwa Hindu Parishad | Bajrang Dal | Bharatiya Dalit Mahasangha |
दिनांक 29 मे 2025 | प्रतिनिधी – विठ्ठल ठोंबरे |

Support Cancer Patients हा नारा प्रत्यक्ष कृतीत आणला गेला आहे. समाजात नेहमी सामाजिक भान जपत काम करणाऱ्या संस्था व संघटना वेळोवेळी गरजूंना आधार देताना दिसत असतात . अशीच एक अनुकरणीय मदत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल लोणी व भारतीय दलित महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्याची एक आदर्श घटना व उदाहरण समोर आले आहे.
दाढ , ता.श्रीरामपूर , येथील गरीब साळवे कुटुंबीय सध्या प्रचंड आर्थिक अडचणीतून जात होते. या
संतोष साळवे यांची कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज—-
कुटुंबातील संतोष साळवे हे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. पुढील उपचारांसाठी त्यांना तातडीने आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या या कुटुंबाकडे उपचाराचीही पुरेशी पैशांची सोय करता येत नव्हती.
विश्व हिंदू परिषद बजरंग दल, लोणी आणि भारतीय दलित महासंघाकडुन मदत—-
या परिस्थितीत साळवे कुटुंबीयांनी बजरंग दल कार्यकर्त्यांशी संपर्क साधला .बजरंग दलाने त्वरित सहकार्याची भूमिका घेतली. विश्व हिंदू परिषद बजरंग दल, लोणी आणि भारतीय दलित महासंघ या दोन सामाजिक संस्थांनी लोणी परिसरातील नागरिक, मित्रमंडळी व हितचिंतकांकडून निधी गोळा केला. तो किसन बाळाजी साळवे (संतोष साळवे यांचे वडील) यांच्याकडे वेताळबाबा चौक, लोणी येथे सुपूर्त केला आहे.
मान्यवरांची उपस्थिती—–
या वेळी भारतीय दलित महासंघाचे प्रमुख सुनील उमाप, अध्यक्ष हिनाताई उबाळे, बजरंग दलाचे अध्यक्ष सागर राक्षे, विकी राक्षे, सागर उबाळे, राधाकिसन आहेर, कुणाल जगधने, विशाल आव्हाड, अमन शेख, सनी राक्षे, रशीद भाई, प्रफुल्ल भोसले आणि इतर मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक एकतेचे उदाहरण—–
या उपक्रमातून सामाजिक सलोखा आणि एकतेचे एक आदर्श उदाहरण साकार झाले. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील व्यक्ती एकत्र येऊन एका गरजू रुग्णासाठी धावून आल्याने माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे सिद्ध झाले.
महासंघाच्या वतीने कॅन्सरग्रस्त संतोष साळवे यांच्यासाठी आर्थिक मदत गोळा करण्यात आली. या सामाजिक उपक्रमातून माणुसकीचा अनमोल संदेश दिला गेला आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना—-
https://vhp.org – विश्व हिंदू परिषद (VHP) अधिकृत संकेतस्थळ
https://www.cancer.org – American Cancer Society (कॅन्सरविषयी माहिती)
https://donate.pmcare.gov.in – पंतप्रधान मदत निधी (जिथे रुग्णांसाठी मदत करता येते)
https://satyashodhaknews.com – सत्यशोधक न्युज
सत्यशोधक न्युजच्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंक वर क्लिक करुन —-
Shirur Krushi Utpanna Bazar Samiti Nirnay :शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा शेतकरी हितैषी निर्णय
2 thoughts on “Support Cancer Patients: गरीब कुटुंबासाठी देवदूत ठरले बजरंग दल व दलित महासंघ ; कॅन्सर रुग्णासाठी दिला आर्थिक मदतीचा हात !”