
Contents
- 1 Sex Hormones : कोनत्या कारणामुळे तुमची सेक्स करण्याची इच्छा कमी होते?
- 1.1 Sex Hormones Testosterone Affects Sex
- 1.1.1 टेस्टोस्टेरॉन हार्मोनची कमतरता —-
- 1.1.2 पती-पत्नीच्या सेक्स संबंधात बदल का येतो?
- 1.1.3 सेक्स हार्मोन आहेत तरी कोनते?—-
- 1.1.4 टेस्टोस्टेरोन हार्मोनचा सेक्सवर कसा परिणाम होतो?—-
- 1.1.5 टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी का होते?
- 1.1.6 टेस्टोस्टेरॉन पातळी कशी वाढवावी?
- 1.1.7 विश्वसनीय व मोफत माहिती स्त्रोत पहा—
- 1.1.8 About The Author
- 1.1 Sex Hormones Testosterone Affects Sex
Sex Hormones : कोनत्या कारणामुळे तुमची सेक्स करण्याची इच्छा कमी होते?
Sex Hormones Testosterone Affects Sex
पुणे, दिनांक 30 मे 2025 | सत्यशोधक न्युज |

पुरुष असो किंवा महिला, दोघांनाही सेक्स करण्याची इच्छा आणि नैसर्गिक, मानसिक, भावनिक, शारिरीक गरज असते ती सेक्स अर्थात संभोग करण्याची ! मात्र ही बाब हार्मोनल आहे हे लक्षात घ्या. सेक्स बाबत टेस्टोस्टेरॉन हार्मोन (Sex Hormones) मानवी शरीरात महत्त्वाची भूमिका बजावते.
टेस्टोस्टेरॉन हार्मोनची कमतरता —-
टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्या कमतरतेमुळे लोक शारीरिक संबंध ठेवण्यास तुमचा पार्टनर किंवा तुम्ही टाळाटाळ करता. या हार्मोनची कमतरता असेल तर तुमची शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा होत नाही.पण ते पुढील प्रमाणे दुरुस्त करता येवु शकते.
पती-पत्नीच्या सेक्स संबंधात बदल का येतो?

पार्टनर पासुन अंतर असणे , प्रेमात चिडचिड होत राहणे म्हणजे सेक्स संबंधांची इच्छा कमी होणे.अशा स्थितीत वैवाहिक जीवनच तुम्हाला नकोसे वाटू लागते. पती-पत्नीचे किंवा तुमच्या पार्टनरबरोबरचे नाते बिघडू लागते. हे अनेक कारणांमुळे होत असते. तरी हार्मोनल बदल हे त्यामागील एक मुख्य कारण आहे . म्हणुन कोणत्या हार्मोनमुळे सेक्स करण्याची इच्छा संपू लागते? ही समस्या कशी सोडवावी. ते जाणून घ्या…
सेक्स हार्मोन आहेत तरी कोनते?—-
पुरुष असो किंवा महिला, दोघांनाही सेक्स करण्याची इच्छा व गरज असते. यामधे शरीरातील ‘टेस्टोस्टेरॉन’ हार्मोन महत्त्वाची भूमिका बजावते. हे हार्मोन पुरुष व महिला दोघांमध्येही नैसर्गिकपणे असते. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन हार्मोन अनेक पटीने जास्त आढळते. याला ‘सेक्स हार्मोन’ असेही म्हटले जाते .
टेस्टोस्टेरोन हार्मोनचा सेक्सवर कसा परिणाम होतो?—-
टेस्टोस्टेरॉन हार्मोन शरीरात लैंगिक इच्छा वाढवण्यास मदत करण्याचे काम करते . ते शरीराच्या इतर बर्याच कार्यांमध्येही प्रभावी असते . ते शुक्राणू तयार करणे , प्रजनन क्षमता वाढवणे आणि शरीरात हाडे जुळवण्यात देखील मदत करते. या हार्मोनच्या कमतरतेमुळे सेक्स करण्याची इच्छा कमी होते. सेक्सालाजिस्ट म्हणतात की पुरुषाच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची नॉर्मल पातळी प्रति डेसिलीटर 300 ते 1000 नॅनोग्राम असते. या पातळीपेक्षा कमी टेस्टोस्टेरॉनची पातळी ही टेस्टोस्टेरोन मधे घट दर्शवते. महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनसह ‘इस्ट्रोजेन’ व ‘प्रोजेस्टेरॉन’ हे देखील महत्त्वाचे असतात. या हार्मोन्सचे असंतुलन झाले तर मासिक पाळी, प्रजनन क्षमता व सेक्सची इच्छा प्रभावित होते .
टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी का होते?
1. रोग किंवा आजाराने जर शरीर ग्रासलेले असेल तर ते टेस्टोस्टेरॉन हार्मोनवर परिणाम करू शकते. शरीरात त्याची कमतरता निर्माण होते.
2.अनियंत्रित वजन: शरीर लठ्ठ असणे हे अनेक आजारांचे प्रारंभिक कारण बनत असते हे लक्षात ठेवा . लठ्ठपणा हे कमी टेस्टोस्टेरॉनचे देखील एक महत्त्वाचे कारण आहे.
3.वय घटक: वाढत्या वयानुसार शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात . परिणामी शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोनची कमतरता निर्माण होते.
4. बिघडलेली जीवनशैली: जीवनशैलीतील बदल शरीरात अनेक आजारांना जन्म देतो. हे शरीरात हार्मोनल बदलांचे कारण बनते. ज्याचा परिणाम लैंगिक संबंधांवर देखील होऊ शकतो.
टेस्टोस्टेरॉन पातळी कशी वाढवावी?
✅तुमच्या आहाराकडे लक्ष द्या: तुमच्या आहारात अंडी, ट्यूना, सॅल्मन मासे, लाल मांस, सुकामेवा, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करा.
नियमित व्यायाम करा: वजन प्रशिक्षण व उच्च तीव्रतेचे अंतराल प्रशिक्षण तुमच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढविण्यास मदत करते.
✅पुरेशी झोप घ्या: शरीरात टेस्टोस्टेरॉन उत्पादनासाठी शरीराला पुरेशी व योग्य झोप आवश्यक आहे. दररोज 7 ते 9 तास चांगली झोप घ्या.
✅मानसिक ताण कमी करा: दीर्घकालीन मानसिक ताणामुळे कॉर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते. कॉर्टिसोल हार्मोनमुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते.
विश्वसनीय व मोफत माहिती स्त्रोत पहा—
1. Mayo Clinic – Testosterone
👉 https://www.mayoclinic.org/tests-procedures/testosterone-test/about/pac-20385045
(टेस्टोस्टेरॉन टेस्ट आणि लेव्हलबाबत सखोल माहिती)
2. Cleveland Clinic – Low Testosterone (Male Hypogonadism)
👉 https://my.clevelandclinic.org/health/diseases/17768-low-testosterone-low-t
(टेस्टोस्टेरॉनची कमी पातळी आणि तिचा उपचार)
3. NHS UK – Testosterone deficiency
👉 https://www.nhs.uk/conditions/testosterone-deficiency/
(UK च्या राष्ट्रीय आरोग्य सेवेतील अधिकृत माहिती)
4. Healthline – Natural Ways to Boost Testosterone
👉 https://www.healthline.com/nutrition/8-ways-to-boost-testosterone
(टेस्टोस्टेरॉन पातळी नैसर्गिकरित्या वाढवण्याचे ८ मार्ग)
5. WebMD – Understanding Hormones and Sexual Desire
👉 https://www.webmd.com/sex-relationships/guide/sex-and-hormones
(सेक्स आणि हार्मोन्सचे परस्परसंबंध)
सत्यशोधक न्युज वरील बातम्या व अभ्यासपुर्ण वाचा ….
LIC Jeevan Umang Yojana 2025 :ही विमा योजना २०२५ मध्ये सर्वाधिक फायदेशीर ठरणार! जाणून घ्या कारणं!
What is Narlikar Theory? | नारळीकर सिद्धांत म्हणजे काय?
1 thought on “Sex Hormones : कोनत्या कारणामुळे तुमची सेक्स करण्याची इच्छा कमी होते?”