Contents1 Pune News PMC : पुणे कॅनॉल रोड घोटाळा: पाटबंधारे विभागाचा बेकायदेशीर करार, पालिकेचा भ्रष्ट सहभाग ? आम आदमी पार्टीचा आरोप1.1 Pune News PMC Canol Road Fraud ?1.1.1 🏗️ एफएसआयसाठी वॉटर बॉडीवर ‘डाव’—-1.1.2 💰 भ्रष्टाचाराचा आरोप—-1.1.3 🌳 पर्यावरणाचा संहार?—-1.1.4 📢 कायदेशीर लढाई आणि आंदोलनाची तयारी——1.1.5 🧭 पर्यायी दृष्टीकोन—-1.1.6 अधिक माहितीसाठी उपयुक्त स्रोत —1.1.6.1 सत्यशोधक न्युजच्या आणखीन बातम्या वाचा पुढील लिंक वर क्लिक करुन —-1.1.7 About The Author1.1.7.1 Dr.Nitin Pawar1.1.8 ❤️ Support Satyashodhak Blog Pune News PMC : पुणे कॅनॉल रोड घोटाळा: पाटबंधारे विभागाचा बेकायदेशीर करार, पालिकेचा भ्रष्ट सहभाग ? आम आदमी पार्टीचा आरोप Pune News PMC Canol Road Fraud ? पुणे | 30 मे 2025 | सत्यशोधक न्युज | पुण्याच्या मध्यवर्ती भागातून जाणारा मुठा डावा कालवा (कॅनॉल रोड) सध्या एका मोठ्या वादग्रस्त घोटाळ्याच्या भोवऱ्यात अडकला आहे. (Pune News PMC Canol Road Fraud ?) आम आदमी पार्टीच्या (आप) मुकुंद किर्दत यांनी पत्रकार भवन, पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप करत पाटबंधारे विभाग व पुणे महानगरपालिका बांधकाम विभागाने बिल्डरांशी संगनमत करून बेकायदेशीर एफएसआय मंजूर केल्याचा आरोप केला. 🏗️ एफएसआयसाठी वॉटर बॉडीवर ‘डाव’—- https://satyashodhak.blog/wp-content/uploads/2025/05/VID-20250530-WA0043.mp4 वर्षानुवर्षे पुणेकरांसाठी हिरवाई, सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, वृक्ष लागवड आणि वाहतुकीचा पर्याय म्हणून वापरला जाणारा 20 किलोमीटर लांबीचा कॅनॉल रोड आता बिल्डरांच्या फायद्यासाठी ‘पोहोच रस्ता’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. शहर विकास आराखड्यात हा भाग ‘वॉटर बॉडी’ म्हणून राखून ठेवलेला असतानाही मनपाने बेकायदेशीररित्या बांधकाम नकाशे मंजूर केले आहेत. 💰 भ्रष्टाचाराचा आरोप—- पाटबंधारे विभाग व बांधकाम विभाग यांनी बिल्डरांना ‘तात्पुरता एक वर्षाचा भाडेकरार’ करून कॅनॉलचा वापर करण्यास अनुमती दिली. शिवाजीनगर येथील जीवन प्रदीप को-ऑप. सोसायटीच्या उदाहरणात पाटबंधारे विभागाने पूर्वीच्या कराराची अधिसूचना बाजूला ठेवून नव्याने करार करत वाढीव एफएसआयला पाठबळ दिले, असे किर्दत यांनी सांगितले. या व्यवहारात बिल्डर, मनपा अधिकारी आणि खाजगी जमिनीचे मालक संगनमत करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 🌳 पर्यावरणाचा संहार?—- https://satyashodhak.blog/wp-content/uploads/2025/05/VID-20250530-WA0042.mp4 या कॅनॉल परिसरात झाडे, सायकल ट्रॅक, कलाकार कट्टा, शाळकरी विद्यार्थ्यांचा मार्ग अशा अनेक उपयुक्त सुविधा आहेत. हा भाग शहरासाठी ऑक्सिजन झोन ठरू शकतो. परंतु एफएसआयच्या हव्यासापोटी शहराच्या फुफ्फुसांवर घाव घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आपचे मत आहे. 📢 कायदेशीर लढाई आणि आंदोलनाची तयारी—— चाफेकरनगर नागरिक कृती समितीच्या सहकार्याने मुकुंद किर्दत यांनी CPC कलम 80 अंतर्गत नोटीस बजावली असून, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास मनपा आयुक्तांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. 🧭 पर्यायी दृष्टीकोन—- हा कॅनॉल पट्टा भविष्यात जर्मनी व युरोपियन शहरांप्रमाणे पादचारी, सायकलस्वार, कलाकार, विद्यार्थ्यांसाठी एक समर्पित सार्वजनिक जागा बनू शकतो. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अशा हिरव्या पट्ट्यांची अत्यंत गरज असून, या जागेचा केवळ बांधकामासाठी वापर होऊ नये, अशी भूमिका आपने मांडली आहे. अधिक माहितीसाठी उपयुक्त स्रोत — 1. Pune Municipal Corporation Official Site 2. Water Resources Department Maharashtra 3. Right to Information (RTI) Maharashtra 4. National Green Tribunal – India 5. India Kanoon – CPC Section 80 सत्यशोधक न्युजच्या आणखीन बातम्या वाचा पुढील लिंक वर क्लिक करुन —- Support Cancer Patients: गरीब कुटुंबासाठी देवदूत ठरले बजरंग दल व दलित महासंघ ; कॅन्सर रुग्णासाठी दिला आर्थिक मदतीचा हात ! Wagholi Pune Rain News:वाघोली पुणे येथे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर! गटारगंगाच जण अवतरली ! जलमय, नागरी त्रास शिगेला! About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Shirur News MIDC : 3300 ब्रास मुरूम चोरीचा गंभीर प्रकार! शिरूर MIDC परिसरातील लाखोंचा मुरूम अज्ञात व्यक्तीकडून चोरी Shirur News: शिरूर : भररस्त्यात 72 वर्षीय शेतकऱ्याला दुचाकीची धडक; गंभीर जखमी, आरोपी पसार