
Contents
News Missing Women: शिरूर येथून गायब झालेल्या रेखा चव्हाण यांचा पत्ता अद्यापही अज्ञात – पतीने दाखल केली मिसिंग तक्रार!
News Missing Women 35 Years Old?
शिरूर, ५ जून २०२५ | सत्यशोधक न्युज |
” News Missing Women : शिरूर तालुक्यातील भाऊनाथवाडी येथून रेखा चव्हाण (वय 35) या महिला बेपत्ता झाल्याची घटना. पतीने शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दिली तक्रार. नागरिकांना सहकार्याची विनंती.”
शिरूर तालुक्यातील भाऊनाथवाडी येथून एका ३५ वर्षीय गृहिणीच्या अचानक बेपत्ता होण्याचा प्रकार (News Missing Women ) समोर आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग डायर (मानव मिसिंग रजि. नं. 90/2025) दाखल करण्यात आली आहे.
काहीही न सांगता घरातून निघून गेल्या—
खबर देणारे सहदेव दत्ता चव्हाण (वय 38 वर्षे, व्यवसाय – ड्रायव्हर) हे निमोणे, भाऊनाथवाडी, ता. शिरूर, जि. पुणे येथे वास्तव्यास असून, मूळ राहणार उपनवाडी, पोस्ट धनसळ, ता. पुसद, जि. यवतमाळ येथील आहेत. त्यांनी सांगितले की, दिनांक 01 जून 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत त्यांच्या पत्नी सौ. रेखा सहदेव चव्हाण या कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या आहेत.
बेपत्ता व्यक्तीचे वर्णन असे –
वय 35 वर्षे, रंग गोरा, उंची 5 फूट 2 इंच, केस काळे लांब, नाक सरळ, गळ्यात मंगळसूत्र, कानात कर्णफुले, नेसलेली रंगीत साडी आणि काळ्या रंगाची चप्पल. त्या मराठी भाषा (गोरमाटी बोली) बोलतात आणि उजव्या पायाच्या पोटरीवर “सुरेश” असे मराठीत गोंदवले आहे.
शिरुर पोलिसांचा तपास सुरू —-

पतीने अनेक ठिकाणी शोध घेतला, मात्र ती कुठेही आढळून आली नाही. शेवटी त्यांनी 04 जून 2025 रोजी संध्याकाळी 6:37 वाजता शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणाचा तपास पो.ह. टेंगले , दाखल अंमलदार पो.हवा. कळमकर यांच्या मार्फत सुरू असून प्रभारी अधिकारी सौ. चिवडशेट्टी हे तपासाची जबाबदारी सांभाळत आहेत.
आपण कोणाला या वर्णनाशी जुळणारी व्यक्ती दिसल्यास, कृपया शिरूर पोलीस स्टेशनशी तात्काळ संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या —
https://www.mahapolice.gov.in – महाराष्ट्र पोलीस अधिकृत संकेतस्थळ
https://missingpersonbureau.in – गायब व्यक्तींच्या माहितीचे केंद्र
https://www.facebook.com/punepolice – पुणे ग्रामीण पोलीस फेसबुक
https://twitter.com/punepolice – अधिकृत ट्विटर हँडल
https://satyashodhaknews.com – सत्यशोधक न्यूज: आपल्या गावाचा आवाज
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा —
Domestic Violence: लग्नाच्या 11 वर्षांनी गृहिणीची पोलिसांत तक्रार; पतीविरुद्ध गुन्हा दाखल