
Contents
News Shirur Police: शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ; १३ अल्पवयीन मुलींसह ९० हरवलेले नागरिक शोधून कुटुंबांना सुखरूप परतवले!
News Shirur Police Great Job
शिरूर, ता. ६ जून २०२५ | सत्यशोधक न्युज |
” News Shirur Police: शिरूर पोलिस ठाण्याच्या उत्कृष्ट मोहिमेमुळे हरवलेल्या ९० नागरिकांना सुखरूप शोधून त्यांना कुटुंबात परतवण्यात आले आहे. अल्पवयीन मुली, महिला व पुरुषांच्या संवेदनशील प्रकरणांत पोलिसांनी मानवतेची बाजू जपत काळजीपूर्वक तपास केला.”
शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेल्या अल्पवयीन मुली, महिला आणि पुरुष यांचा यशस्वी शोध घेण्यात शिरूर पोलिसांनी मोठी यशस्वी मोहीम पार पाडली आहे. (News Shirur Police Great Job) जानेवारी २०२४ ते मे २०२५ या कालावधीत हरवलेल्या एकूण ९० व्यक्तींपैकी १३ अल्पवयीन मुली, ४५ महिला आणि ३२ पुरुषांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालक व कुटुंबियांकडे सुरक्षित परत करण्यात आले.
नेतृत्व पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांचे—

या मोहिमेचे नेतृत्व पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शुभम चव्हाण , महिला पोलीस अंमलदार सोनाली तावरे,महिला पोलिस अंमलदार सारिका माळी, आकाश नेमाने, पवन तावडे ,पोलिस हवालदार संपत खबाले,पोलिस हवालदार नाथसाहेब ,जगताप,पोलिस अंमलदार विजय शिंदे,नितेश थोरात,नीरज पिसाळ,सचिन भोई, निखील रावडे,अजय पाटील,रविंद्र आव्हाड, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव,पोलिस हवालदार मोनिका वाघमारे,प्रतिभा देशमुख, स्नेहल होळकर,गोदावरी धंदरे,परवीन पप्पुवाले,गीता मुळे,पवन तायडे,मिसिंग तपास पथकाचे संपत खबाले व महिला पोलिसांच्या विशेष पथकाने सर्वेक्षण, प्रत्यक्ष शोध मोहीम व संवादातून ही कामगिरी बजावली.
अल्पवयीन मुलींचा शोध—
हरवलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शाळा, वस्ती, ग्रामपंचायती आणि ग्रामीण परिसरात विशेष मोहिम राबवली. हरवलेल्या महिला व पुरुषांच्या प्रकरणात कौटुंबिक व मानसिक कारणे, तसेच संवेदनशील बाबींचा विचार करून संवाद आणि समुपदेशनाच्या माध्यमातून योग्य उपाययोजना केल्या.
पोलीस निरीक्षक श्री. केंजळे यांनी सांगितले की, एक महिन्याच्या काळात शिरूर शहर व ग्रामीण भागात ४५ महिला आणि ३५ पुरुषांचा यशस्वी शोध लागला. हे सर्व नागरिक हरवलेले, बेपत्ता, घरातून निघून गेलेले होते.
वरिष्ठ पोलीस अधिकार्यांचा सहभाग —
या मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सो.पो.नि.संदिप सिंह गिल, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. रमेश चोपडे, श्री. प्रशांत ढोले, तसेच विविध पोलिस कर्मचारी आणि अंमलदार यांचा मोलाचा सहभाग होता.
आणखीन माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना—
https://www.childlineindia.org
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंक वर क्लिक करुन —
Accident News | टाकळी हाजी येथील भीषण अपघात! निष्काळजी वाहनचालकावर गुन्हा दाखल, पती-पत्नी जखमी.
Breaking News Ranjangaon Lady Murder: रांजणगावमध्ये महिला आणि दोन चिमुकल्यांची निर्घृण हत्या!