
Contents
- 1 Golden Ganthan Chori : जबरी चोरीची घटना: शिरूरमध्ये गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून चोरट्यांची पलायन!
Golden Ganthan Chori : जबरी चोरीची घटना: शिरूरमध्ये गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून चोरट्यांची पलायन!
Golden Ganthan Chori Ramling Road Shirur
दिनांक 8 जून 2025 | सत्यशोधक न्युज |
” Golden Ganthan Chori: शिरूर शहरात घडलेली सोन्याच्या गंठण चोरीची जबरी घटना – पाठीमागून आलेल्या पल्सरवरील चोरट्यांनी एका महिलेला लुटले. पोलिसांकडून तपास सुरू.”
शिरूर शहरातील पाबळ फाटा ते रामलिंग रोडदरम्यान काल रात्री एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून दोन अनोळखी चोरट्यांनी पलायन केल्याची घटना समोर आली आहे. (Golden Ganthan Chori) याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
▪️ गुन्हा क्रमांक: 384/2025
▪️ कलम: मा. न्या. का. सं. 384(2), 3(5) अंतर्गत
▪️ फिर्यादी: त्रिवेणी शशिकांत गोळे (वय 35), व्यवसाय – घरकाम, रा. श्री हाईट्स, रामलिंग रोड, शिरूर
▪️ आरोपी: दोन अनोळखी इसम
▪️ घटना स्थळ: पाबळ फाटा ते रामलिंग रोड, वॉशिंग सेंटर समोर, शिरूर
▪️ घटना दिनांक व वेळ: 05 जून 2025 रोजी सायंकाळी 7:40 वाजता
▪️ गुन्हा नोंदवण्याची वेळ: 06 जून 2025, पहाटे 2:17 वाजता
▪️ चोरी गेलेला ऐवज:
अंदाजे 2 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण (किंमत ₹1,40,000)
एकूण नुकसान: ₹1,80,000
घटनेची हकीकत—
त्रिवेणी गोळे या त्यांच्या टीव्हीएस आयक्यू दुचाकी (MH 12 XL 7256) वरून राहत्या घरी जात असताना, हिरव्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवर दोन अनोळखी इसम आले. त्यापैकी मागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने ओढून हिसकावले व पलायन केले.
पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद—–

या प्रकरणी त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
▪️ गुन्हा नोंदवणारे अंमलदार: पोहया/2463 शिंदे
▪️ तपास अधिकारी: पोसई चव्हाण
शिरूर पोलीस पुढील तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. नागरिकांनी सतर्क राहून अशा घटनांबाबत तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना—-
https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/index.aspx – महाराष्ट्र पोलीस FIR तपासणीसाठी
https://satyashodhak.blog/category/shirur-news – शिरूर बातम्या
https://www.mponline.gov.in/portal/Services/Police/ComplaintFiling.aspx – ऑनलाईन तक्रार नोंदणी
https://www.cybercrime.gov.in – सायबर गुन्हा तक्रार
🟠 कृपया खबरदारी घ्या—
दुचाकीवरून जाताना सोन्याचे दागिने उघडे ठेवू नका. गर्दीच्या किंवा सुनसान रस्त्यांवर सावधगिरी बाळगा. अशा प्रकारच्या घटना दिसल्यास तत्काळ 112 किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधा.
या बातमीला सोशल मीडियावर शेअर करून जनजागृतीस हातभार लावा.
‘सत्यशोधक न्यूज ‘- आपल्या अधिकारांची आणि सुरक्षेची साथ!
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंक वर क्लिक करुन —-
Shirur News 2 Girls Missing :दोन अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणाचा यशस्वी छडा