
Contents
- 1 Shirur News Accident: मांडवगण फराटा येथे टँकरच्या धडकेत मजुराचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल
Shirur News Accident: मांडवगण फराटा येथे टँकरच्या धडकेत मजुराचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल
Shirur News Accident Worker Dead
शिरूर ,दिनांक 9 जुन 2025 | सत्यशोधक न्युज |
” Shirur News Accident: शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे डांबर टँकरच्या धडकेत मजुराचा मृत्यू झाला. या प्रकरणी टँकर चालकाविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल. घटना, तपशील व पुढील तपासाबाबतची माहिती वाचा.”
शिरूरमधील मांडवगण फराटा येथे रस्त्याचे काम चालू असताना टँकरच्या धडकेत एका ३० वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक ६ जून २०२५ रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.(Shirur News Accident) या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रोडवरील कामात मजुरी करत होता—-
फिर्यादी समीर संतोष धायगुडे (वय २५ वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. अकोले, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते व त्यांचा भाऊ सुरज संतोष धायगुडे हे मांडवगण फराटा येथील कोळगाव डोळस ते मांडवगण रोडवरील कामात मजुरी करत होते. यावेळी एम.एच. १३ सी.यू. ८७७६ या क्रमांकाच्या डांबर टँकरचे चालक दत्तात्रय अभिमन्यु साळुंखे (रा. सवारी, ता. निलंगा, जि. लातूर) यांनी टँकर बेदरकारपणे व अति वेगात पाठीमागे चालवताना सुरज धायगुडे यांना जोरदार धडक दिली.
वैद्यकीय उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषीत—-
या धडकेत सुरज यांच्या उजव्या बाजूच्या बरगड्यांना तसेच उजव्या हाताला गंभीर व किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या. तातडीने वैद्यकीय उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
शिरुर पोलिसांकडुन पुढील तपास —

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 387/2025 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 281, 125 (अ), (ब), 186 (1) आणि मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गवळी (पो.ह.वा. /2271) करत आहेत.
चालक व कंत्राटदार यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी—-
या अपघातामुळे मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी संबंधित यंत्रणेने चालक व कंत्राटदार यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना—
Maharashtra Police Official Site
Motor Vehicles Act, 1988 (India)
Traffic Rules and Penalties in India
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंक वर क्लिक करुन —
Shirur News: शिरूर : भररस्त्यात 72 वर्षीय शेतकऱ्याला दुचाकीची धडक; गंभीर जखमी, आरोपी पसार