
Contents
- 1 Breaking News Ranjangaon MIDC: अनोळखी युवकाचा मृतदेह विहिरीत आढळला; पोलीस तपास सुरू !
- 1.1 Breaking News Ranjangaon MIDC Unknown Dead Body of Youth?
- 1.1.1 ऋषीकेश काळुराम मलगुंडे यांच्या विहिरीत मृतदेह तरंगताना दिसला—-
- 1.1.2 मृतदेहाच्या डोक्यावर टक्कल ; दाढी-मिशा नाहीत—
- 1.1.3 मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही—
- 1.1.4 🕵️ तपास अधिकारी—-
- 1.1.5 🔎 वाचकांसाठी विनंती—
- 1.1.6 📌 वर्णन—
- 1.1.7 अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना—
- 1.1.8 सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंक वर क्लिक करुन —-
- 1.1.9 About The Author
- 1.1 Breaking News Ranjangaon MIDC Unknown Dead Body of Youth?
Breaking News Ranjangaon MIDC: अनोळखी युवकाचा मृतदेह विहिरीत आढळला; पोलीस तपास सुरू !
Breaking News Ranjangaon MIDC Unknown Dead Body of Youth?
दिनांक 8 जुन 2025 | सत्यशोधक न्युज |
रांजणगाव एमआयडीसी (जिल्हा पुणे) परिसरात 8 जून 2025 रोजी सकाळी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.कोनती ते वाचा. ..
रांजणगाव एमआयडीसी (जिल्हा पुणे) परिसरात 8 जून 2025 रोजी सकाळी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. (Breaking News Ranjangaon MIDC) ढोकसांगवी येथील गट नं. 501 मधील शेतातील विहिरीत एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 20 ते 25 वर्षे दरम्यान आहे.
ऋषीकेश काळुराम मलगुंडे यांच्या विहिरीत मृतदेह तरंगताना दिसला—-
हकीकत अशी की, ऋषीकेश काळुराम मलगुंडे (वय 28, रा. मलगुंडे वस्ती, धनगरवाडा, ढोकसांगवी, ता. शिरूर, जि. पुणे) हे सकाळी सुमारास शेतातील विहीरीवरील पाण्याची मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत एक व्यक्ती मृत अवस्थेत तरंगताना दिसला. यानंतर त्यांनी पोलीस पाटील दीपक मलगुंडे यांना संपर्क केला आणि पोलीस स्टेशनला त्वरित माहिती कळवण्यात आली.
मृतदेहाच्या डोक्यावर टक्कल ; दाढी-मिशा नाहीत—
पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ASI कर्डिले यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली व फायर ब्रिगेडच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. प्राथमिक तपासात हा मृतदेह पूर्णतः सडलेला असून त्याच्या चेहऱ्यावर जलचर प्राण्यांनी नुकसान केले आहे. हातपायांचे तळवे पांढरे पडलेले आहेत. मृत व्यक्तीच्या अंगावर फिकट जांभळ्या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट, निळी जीन्स पॅन्ट, व जॉकी कंपनीचे काळ्या रंगाचे अंतर्वस्त्र असल्याचे दिसून आले आहे. डोक्यावर टक्कल असून दाढी-मिशा नाहीत.
मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही—
सध्या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 194 प्रमाणे गुन्हा रजि. नं. 62/2025 नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
🕵️ तपास अधिकारी—-

ASI कर्डिले, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन
📞 माहिती देणाऱ्याचा संपर्क: ऋषीकेश काळुराम मलगुंडे – 7373901212
🔎 वाचकांसाठी विनंती—
कोणत्याही नागरिकाने या वर्णनाशी मिळताजुळता व्यक्ती हरविल्याची माहिती दिल्यास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनशी तात्काळ संपर्क साधावा.
📌 वर्णन—
रांजणगाव एमआयडीसी परिसरातील विहिरीत आढळलेल्या अनोळखी युवकाच्या मृत्यू प्रकरणाने खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना—
🌐
https://mahapolice.gov.in – महाराष्ट्र पोलीस अधिकृत संकेतस्थळ
https://www.indiacrimewatch.org – भारतातील गुन्हे तपास माहिती
https://satyashodhaknews.com – सत्यशोधक न्यूज अधिकृत वेबसाइट
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंक वर क्लिक करुन —-
Breaking News: रांजणगाव MIDC तिहेरी खुन प्रकरणाचा पर्दाफाश! खुनाची गूढ उकलले ! वाचा सविस्तर —