
Contents
Shirur News : दोन मोटरसायकल चोरीला, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Shirur News Chinchani Motorcycle Theft
दिनांक 15 जुन 2025 | सत्यशोधक न्युज|
” Shirur News:शिरूर तालुक्यातील चिंचणी येथून दोन मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना उघडकीस. अज्ञात आरोपीविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वाचा सविस्तर माहिती.”
शिरूर तालुक्यातील चिंचणी (धावडे वस्ती) येथे दोन मोटरसायकल चोरीचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 415/2025, भादंवि कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी श्री. सुनील भीमराव धावडे (वय 48 वर्षे, व्यवसाय: शेती, रा. चिंचणी धावडे वस्ती, शिरूर, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 13 जून 2025 रोजी रात्री 9 वाजता ते 14 जून रोजी सकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत, त्यांचे शेती कामगार किशोर दळवी यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात व्यक्तीने दोन मोटरसायकल चोरून नेल्या आहेत.
चोरीस गेलेल्या मोटारसायकलचे तपशील पुढीलप्रमाणे —-
1. हिरो होंडा सुपर स्प्लेंडर – काळ्या रंगाची, निळा पट्टा असलेली, अंदाजे किंमत ₹20,000/-
आरटीओ नंबर: MH 12 DF 9092
2. होंडा शाईन – काळ्या रंगाची, अंदाजे किंमत ₹25,000/-
आरटीओ नंबर: MH 12 SH 1561
शिरूर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल—-

या घटनेनंतर 14 जून 2025 रोजी सायंकाळी 8:52 वाजता शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पोलीस हवालदार आगलावे (ब.नं.1191) यांनी गुन्हा नोंदवला असून, तपासाचे काम पो.ह. मोरे (ब.नं.1572) करत आहेत. प्रकरणाचे प्रभारी अधिकारी पो.नि. संदेश केंजळे आहेत.
पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध तपास सुरु केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संदिग्ध हालचाली आणि स्थानिक माहितीदारांचे सहकार्य घेऊन तपास अधिक गतीने सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.
🔒 नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करावीत आणि वाहनांना लॉक लावणे आवश्यक आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात माहिती द्यावी.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना••••••
https://punepolice.gov.in – पुणे पोलीस अधिकृत संकेतस्थळ
https://maharashtrapolice.gov.in – महाराष्ट्र पोलीस
https://satyashodhak.blog/category/crime-news – गुन्हेगारी बातम्या (आपल्या वेबसाईटवरील)