
Contents
22 Years Youth Missing: शिरूर तालुक्यातून २२ वर्षीय युवक नितीन यादव बेपत्ता – परिवार चिंतेत
22 Years Youth Missing Nitin Yadav
शिरूर (पुणे) – दिनांक 14 जून 2025 रोजी
” 22 Years Youth Missing: शिरूर तालुक्यात आलेगाव पागा येथील २२ वर्षीय युवक नितीन यादव दिनांक 14 जून 2025 पासून बेपत्ता आहे. कुटुंबीय चिंतेत असून पोलिस तपास सुरू आहे. ’22 Years Youth Missing’ या गंभीर प्रकरणात नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे.”
सकाळी 7 वाजता आलेगाव पागा (ता. शिरूर, जि. पुणे) येथून नितीन लहू यादव (वय 22 वर्षे) हा युवक बेपत्ता झाला असून यासंदर्भात शिरूर पोलीस स्टेशन येथे मा. मि. नं. 95/2025 अन्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना ’22 Years Youth Missing’ या गंभीर स्वरूपात पाहिली जात आहे.
बेपत्ता नितीन यादव याचा तपशील—-
नितीन यादव (वय २२ वर्षे) हा युवक रंगाने सावळा, उंची ५.५ फूट, चेहरा उभट, सरळ नाक, काळी बारीक मिशी, पातळ काळी अर्धवट दाढी व वाढलेले काळे केस असलेला आहे. अंगाने सडपातळ असलेला नितीन, घटना घडली त्यावेळी पांढऱ्या रंगाचा काळ्या रेषांचा टी-शर्ट, काळ्या रंगाची अरमानी पँट व चॉकलेटी रंगाच्या पॅरागॉन चपला घालून होता. त्याच्यासोबत एक ग्रे रंगाची बॅग होती.
घटना कशी घडली?—–
नितीनचे आई सौ. चंद्रकला लहू यादव (वय ४२ वर्षे, व्यवसाय: शेतमजुरी, रा. आलेगाव पागा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन हा गेल्या १५ दिवसांपासून कामावर जात नव्हता. तो नेहमीप्रमाणे कारेगाव एम. आय. डी. सी. येथे कामासाठी जात असे. परंतु, 14 जून रोजी सकाळी तो आईला सांगून निघून गेला की, “ताईकडे चाकणला जाऊन येतो.” मात्र, त्याने मोबाईल घरीच ठेवून निघून गेला होता.
सायंकाळी जेव्हा त्याच्या बहिणीला (अंजली गणेश गाडवे, रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) फोन करून विचारले गेले की, नितीन घरी आला का, तेव्हा तिने तो अजून आलेला नसल्याचे सांगितले. यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेतला गेला – नातेवाईकांकडे, रांजणगाव एमआयडीसी परिसरात – पण त्याचा काहीच ठावठिकाणा लागला नाही.
पोलिसांकडून तपास सुरू—–
सदर प्रकरणाची तक्रार न्हावरा पोलिस दूरक्षेत्रात दाखल करण्यात आली असून, पोलीस अंमलदार बनकर (2436), तपास अधिकारी पोलीस अंमलदार भोते (1252), व प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या देखरेखीखाली या ’22 Years Youth Missing’ प्रकरणाचा तपास सुरू आहे.
नागरिकांना आवाहन——
कोणालाही नितीन यादव या युवकाबाबत काही माहिती असल्यास कृपया शिरूर पोलिस स्टेशनशी त्वरित संपर्क साधावा. नितीनच्या कुटुंबीयांची मानसिक स्थिती अत्यंत गंभीर असून त्याच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे बातम्या
आणखीन माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना—-
https://www.mahapolice.gov.in – महाराष्ट्र पोलिस अधिकृत संकेतस्थळ
https://www.nationalcrimeburea.gov.in – नॅशनल क्राईम ब्युरो
https://missingpersons.gov.in – हरवलेले व्यक्ती
आपण ही बातमी आपल्या सोशल मीडिया, व्हाट्सॲप ग्रुप्सवर शेअर करून नितीनच्या शोधात मदतीचा हात पुढे करू शकता.
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करून—-
21 Years Girl Missing : शिरूर तालुक्यातून 21 वर्षांची तरुणी बेपत्ता – नागरिकांनी सहकार्याची विनंती!