Why should Sallory in Every Week? : people exchanging money representing weekly salary payment system for workers in India income discussionWeekly Salary in India: पगार दर आठवड्याला देण्याची मागणी — कामगारांसाठी नवा पर्याय?

Contents

Why should Sallory in Every Week? : एक सुझाव.

दिनांक, 21 जून 2026 | (Updated on 27 March 2026)

” Why should Sallory in Every Week? असा प्रश्न अनेकांना पडेल. पण अनेक प्रगत देशात ही पद्धत आहे. ती यशस्वी देखील आहे. शिवाय online सुविधा तन्तज्ञान आज उपलब्ध आहे.गरीब तबक्याला याचा फायदा होईल.भारतासारख्या देशात दर आठवड्याला पगार दिल्यास काय फायदे मिळतील? Why should Sallory in Every Week? या विषयावर सविस्तर विश्लेषण. आर्थिक स्थैर्य, डिजिटल पद्धती, जागतिक उदाहरणे व इतर मुद्दे.हे एक क्रांती कारक पाऊल ठरु शकेल “

file 00000000bedc71fa94060cb558e3561f—- सम्पादक:डॉ. नितीन पवार, पुणे, सामाजिक व आर्थिक प्रश्नांचे अभ्यासक व जाणकार.

आजही भारतात बहुतांश नोकरदार वर्गाला पगार महिना अखेरीस मिळतो. हा जुना आणि पारंपरिक पद्धतीचा पगार वितरणाचा नियम आपल्या सवयीचा झाला आहे. मात्र, बदलत्या काळात वेगाने फिरणाऱ्या अर्थव्यवस्थेत दर आठवड्याने पगार देण्याची संकल्पना आता नव्याने चर्चेत आली आहे.काही देशात ती यशस्वीपणे चालू आहे.

पण खरंच विचार केलात का? – Why should Sallory in Every Week? दर आठवड्याला पगार देण्याची पद्धत बरीच उपयुक्त ठरेल. मोठी, गुन्तागुन्तीची आर्थिक सन्रचना असली तरी नवीन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात हे सहज शक्य आहे.
यामागे काही ठोस आर्थिक, सामाजिक आणि व्यवहारिक कारणं आहेत. ती जी सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करू शकतात.

आठवड्याला पगार मिळाल्याने काय बदलू शकतं ?

पैसा सतत हातात खेळता राहील

जर दर आठवड्याला पगार मिळाला, तर कोणत्याही कामगार, नोकरदार किंवा छोटे-मोठे कर्मचारी वर्गासाठी “पैसा कधी मिळणार?” हा प्रश्नच उरणार नाही. आठवड्याभरातच पैसा हातात आला, की घरगुती खर्च, किराणा, वैद्यकीय गरजा, इंधन यासाठी फार वाट पाहावी लागणार नाही.महिना भर वाट पाहणे त्रासदायक असते. अर्थात बेकायदेशीर व्यवसाय, नफेखोरी, साठेबाजी, किंमती Manupulate करण्यास आळा बसेल.

दीर्घ वाट पाहावी लागणार नाही

महिनाअखेरीस येणाऱ्या आर्थिक टंचाईपासून सुटका मिळू शकते. विशेषतः १५ ते ३० तारखेच्या दरम्यान बहुतांश घरांत तंगी असते. हे टाळता येईल.ही पद्धत ब्रिटिश भारतात सुरु झाली. त्यावेळी लोकसंख्या कमी होती. चलन गती कमी होती. चलनच कमी होते. भक्कम असे तन्त्रज्ञान उपलब्ध नव्हते. पण आज ते उपलब्ध आहे. म्हणून नेहमी चिन्तेत असणारा व महिना सम्पण्याची वाट पहात राहणारा जो आधी स्रम करतो. मोबदला एक महिन्याने हे मुळात आर्थिक शोषण आहे.

आठवडाभरासाठी उधारीही परवडेल

पगार आठवड्याला मिळणार असल्यास व्यापाऱ्यांसाठी देखील हा लाभदायक निर्णय ठरतो. कारण ग्राहक आठवड्याभरात परतफेड करू शकतील. म्हणून थोडी उधारीही परवडेल.अशी शक्यता नक्की आहे. अविश्वास व पैसे बुडवण्याची भिती दुकानावर, व्यापारी, विक्रेते यांची कमी होईल. चनल मार्केट मधे खेळु लागेल. हे विकासाला चालना देईल.

बाजारात चलनाची गती वाढेल

आठवड्याला पगार दिल्यास लोक खर्चही आठवड्याच्या आधारावर करतील. त्यामुळे बाजारात पैशाचा प्रवाह वाढेल. खरेदी वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होईल.विक्री वाढेल. समाधान वाढेल. वन्चितता कमी होईल.

महिना अखेरची तंगी टळेल

आठवड्याला मिळणाऱ्या पगारामुळे महिना अखेरीस येणारी टोकाची तंगी उरणार नाही. खास करून हातावर पोट असणाऱ्या कामगारांसाठी ही बाब अत्यंत उपयुक्त ठरेल.अगदी सरकारी नोकरदारांची, पेन्शन धारकांची स्थिती कठिण असते. मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यातुन आरोग्य विषयक तक्रारी निर्माण होतात. जेष्ठ नागरिकांना हे आधार देणारे ठरेल.

Why should Sallory in Every Week? :काही जागतिक उदाहरणे•••

👉 अमेरिका ••••

Amazon, Walmart सारख्या कंपन्या “Weekly Pay” किंवा “Instant Pay” योजना वापरतात. त्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे प्रमाण जास्त आहे.

👉 ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा ••••

या देशांत अनेक नोकऱ्यांसाठी दर आठवड्याचा पगार सर्वसामान्य पद्धत आहे. विशेषतः कंत्राटी, सेवा आणि बांधकाम क्षेत्रात ही रीत आहे.

👉 युनायटेड किंगडम •••••

इथे “Weekly wage” अनेक क्षेत्रांत देण्यात येतो. लोकांना नियमित पैसा मिळाल्यामुळे खर्च व बचत यांचे योग्य नियोजन शक्य होते.

भारतात हे शक्य आहे का?•••••

सर्वात त्रस भारतीय माणूस आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतातही हे सहज शक्य आहे. अनेक कंपन्या आता online payroll management प्रणाली वापरतात.नवीन AI युगात हे सहज शक्य आहे. आणि फुकट पैसे द्यायचे नाहीत तर स्रमाचा मोबदला स्रमिकाला द्यायचा आहे. काही ठिकाणी हा महिनाभराच्या पैशावर व्याज खाणारे देखील आहेत. म्हणजेच आर्थिक शोषण आहे.

Automatic salary transfer system वापरून:

• दर आठवड्याला निश्चित दिवशी पगार बँकेत जमा होऊ शकतो.

• UPI, IMPS, NEFT यामुळे तात्काळ व्यवहार शक्य होतात.

• डिजिटल रेकॉर्ड्स ठेवणं आणि अकाऊंटिंगही सुलभ आहे.

प्रशासनाच्या धोरणात बदल आवश्यक••••

भारत सरकारने किंवा राज्य सरकारांनी कायद्यात छोटा बदल केल्यास हा उपक्रम शक्य आहे. “Minimum Wages Act” किंवा “Payment of Wages Act” मध्ये सुधारणा करून हे सुलभ करता येईल. यासाठी कामगार संघटना, उद्योजक आणि आर्थिक तज्ञ यांच्यात सुसंवाद आवश्यक आहे.नागरिकांची जागरुकता आवश्यक आहे. पारदर्शकता आवश्यक आहे.

Why should Sallory in Every Week? – यामागे असलेले फायदे•••√

लाभ स्पष्टीकरण••••

👉आर्थिक स्थैर्य निर्माण होते व लोकांना सातत्याने पैसा मिळत राहतो.
👉खर्चाचे नियोजन कमी काळाचे करणे सोपे होईल. दिर्घकालीन नियोजन करण्यास फुरसत मिळेल. आठवड्याचे बजेट ठरवता येते. अम्ललबजावणी सोपी होते. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ तसे हातात पैसा असल्यास उत्साह राहतो थोडा असला तरी. उसणवारी जणु शापच. मानसिक त्रास देणारा प्रकार आहे.

कर्जावरील अवलंबित्व कमी लहान लोन, उधारी घेण्याची गरज राहत नाही.तेही अव्वाच्या सव्वा व्याज देऊन!
👉आरोग्यदायी मानसिकतेमुळे पगाराच्या प्रतीक्षेतील तणाव टळतो. पैसा म्हणजे केवळ चलन नाही. ती गरजेच्या वस्तू, सेवा आरोग्य देणारी बाब आहे. कौटुंबिक ताण तणावाचे ते एक प्रमुख कारण आहे. तो कमी होईल.
👉खरेदी वाढते. लोक खर्चाला घाबरत नाहीत.
बाजार चालतो. लघुउद्योजक, दुकानदार यांना फायदा होतो. रोजगार वाढतो. सामाजिक प्रतिष्ठा देखील प्रभावित होत असते.

निष्कर्ष•••••

भारतात दर आठवड्याला पगार मिळण्याची संकल्पना काहींना नवीन वाटेल. पण जागतिक आर्थिक दृष्टिकोनातून आणि सर्वसामान्य नागरिकांच्या गरजांनुसार पाहता, ही संकल्पना अत्यंत व्यवहार्य आणि परिणामकारक ठरू शकते.असे आमचे ठाम मत आहे. कदाचित सत्ताधार्णाना जनतेला कमकुवत ठेवण्याचीच इच्छा असावी. अन्यथा किती तरी अर्थतज्ञ, समाजसेवक, प्रागतिक, पुरोगामी लोक समाजात आहेत. या बाबीकडे लक्ष कदाचित सवयीमुळे जात नसेल.

तुम्ही स्वतः विचार करा – Why should Sallory in Every Week? हे जणू घोषवाक्यासारखे मी मुद्दाम वापरत आहे. ते सर्वसामान्य व अधिकारी लोक यांचे लक्ष याकडे वेधवून घेण्यासाठी शुद्ध सामाजिक जाणीव व काळजी यातुन घडते आहे.

हे केवळ आर्थिक क्रांतीचे पाऊल नसेल – तर सामान्य माणसाच्या आयुष्यात दिलासा देणारा एक सकारात्मक बदल ठरेल. त्याच्या मधे आर्थिक सुरक्षितता वाढण्यास मदत होईल.जगण्यात असणारा भकासपणा दुर होईल.

हा लेख कसा वाटला व आपल्याकडे असणार्या Innovative सन्कल्पना सत्यशोधक कडे पाठवाव्यात. इ. मेल- np197512@gmail.com,What’s App Number- 917776033958/919529913558.

अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना •••

1. RBI Digital Payment Report

2. Amazon Pay Weekly Pilot

3. UK GOV Payment of Wages Act

4. Statista: Weekly Payment Adoption

सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंकवर क्लिक करुन•√••

Pappa Mummi : ‘पप्पां’नी आता घ्यावी ‘मम्मी’ची भुमिका ! प्रेम, जबाबदारी, वाढत्या जन्मदरासाठी ‘पप्पा’ हीच नवी ताकद!

Top 10 Shirur Atractions : शिरूरची शान – ‘टॉप १० आकर्षण स्थळं’ जी तुम्ही चुकवू शकत नाही !

About The Author