
Contents
Aam Aadmi Party :’आप मे है दम !
दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील ‘आप’ च्या पुनरागमनाची खूण/ चाहूल!
Aam Aadmi Party Constituents Won in Gujarat And Punjab
दिनांक 23 जुन 2025 | प्रतिनिधी |
आज देशभरातील पाच पोटनिवडणूका चे निकाल जाहीर झाले. त्यातील लक्षवेधी असलेल्या गुजरात मधील विसावदार या जुनागड जिल्ह्यातील मतदार संघामधून आम आदमी पार्टीचे गोपाल इटालिया तब्बल 17581 मतांनी निवडून आले आहेत. तर दुसरीकडे पंजाब मधील लुधियाना या मतदारसंघात आपचे संजीव अरोरा हे १०५४८ मताने निवडून आले आहेत. यातील महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही ठिकाणी पूर्वीच्या मतांपेक्षा जवळपास दुप्पट मताधिक्य यावेळेस आम आदमी पार्टीस मिळाले आहे. या सर्वच ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढत होती. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या गुजरातमध्ये पूर्वीचे आमदार भाजपाच्या ऑपरेशन लोटस ला बळी पडलेले होते. परंतु तिथेच पुन्हा आपचा उमेदवार निवडून येणे हे जनतेचा आपवरचा विश्वासच अधोरेखित करते. इथे काँग्रेसने आप विरोधात उमेदवार उभा केला होता. पंजाब मध्ये सुद्धा आप च्या उमेदवाराविरुद्ध भाजप आणि काँग्रेस व अकाली दल निवडणूक रिंगणात होते. परंतु तिथे सुद्धा आपने जोरदार लढत देत विजय मिळवला.
गुजरातमध्ये भाजपची सत्ता असतानाही आम आदमी पार्टीचा विजय हा लक्षणीय आहे आणि पंजाब मध्ये आप च्या कामावर जनतेच्या समाधानाचे शिक्कामोर्तब झाले आहे.
आम आदमी पार्टी देशातील वेगाने वाढणारा पक्ष असून काँग्रेस आणि भाजपने वेळोवेळी आम आदमी संपली असा दावा केला तरीसुद्धा आम आदमी पार्टी पुन्हा नव्याने उभारी घेताना दिसते आहे.
गुजरात मधून विजयी झालेले गोपाल इटालिया हे महाराष्ट्राचे सह प्रभारी आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नव्याने उत्साह संचारला आहे. त्याचा फायदा आम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात निश्चितपणे होईल. स्थानिक पातळीवर काँग्रेस कार्यकर्ते अनेकदा आम आदमी पार्टीला , त्यांच्या कामाला, विचारधारेला पाठिंबा देतात हे सुद्धा या निवडणुकीमध्ये दिसून आले आहे.
आज पुण्यात छत्रपती शिवाजीनगर मेट्रो समोरील मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, ढोलावर नाचत विजयोत्सव साजरा केला. यावेळेस आप कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील, प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर,अमित म्हस्के, किरण कद्रे, अक्षय शिंदे, रविराज काळे, श्रद्धा शेट्टी, शंकर थोरात व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.