
Shirur News: पायी चालणाऱ्या वृद्ध महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेणार्यास अटक|1 लाख 10 हजार रुपयांचे होते मंगळसुत्र!
Shirur News 2 Thieves Arrested
📍शिरूर,३० सप्टेंबर २०२५ | प्रतिनिधी |
Shirur News: शिरूर पोलिसांनी मंगळसूत्र हिसकावणाऱ्या अटक करून जप्त मंगळसूत्र परत दिले. ही पोलीस कारवाई समाजासाठी आदर्श ठरली आहे.
शिरूर तालुक्यातील सविंदणे जवळ घडलेल्या गुन्ह्यात एका वृद्ध महिलेला मारहाण करून तिचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या मंगळसूत्र चोरट्यांना शिरूर पोलिसांनी गजाआड केले. हे चोरटे इसम अंदाजे वय २५ ते ३० वयाचे आहेत. या दोन अज्ञात इसमांनी खडकवाडी,लोणी जवळील रोडवरील बंटी हॉटेलसमोर एका वृद्ध महिलेस मारहाण करून १,१०००/- रुपये किंमतीचे दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता.
या संदर्भात ७९ वर्षीय वृद्ध महिला वत्सलाबाई दत्तात्रय सुके यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४५१/२०२५ भारतीय दंड विधान कलम ३०७ (४), ३५७ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलीस निरीक्षक दीपक केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ गव्हाणे व पोलीस अंमलदार भाऊसाहेब थोरसे यांच्यासह तपास पथकाने (१) अनिल नारायण गव्हाणे (२) अनिल सोमनाथ गव्हाणे, गव्हाणवाडी येथील आरोपींना पकडण्यात यश मिळवले. त्यांनी महिलेकडून हिसकावलेले मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार ३० सप्टेंबर रोजी जप्त केलेले मंगळसूत्र मूळ फिर्यादी वत्सलाबाई दत्तात्रय सुके यांना सुपुर्द करण्यात आले. या संपूर्ण कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढोले, श्री. अपर पोलीस अंधिकारी श्री. रमेश चोपडे ,शिरुर पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पाडले.
🔗 अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना ••••
1. https://punepolice.gov.in – पुणे ग्रामीण पोलीस अधिकृत संकेतस्थळ
2. https://maharashtrapolice.gov.in – महाराष्ट्र पोलीस
3. https://localcrimewatcher.com – स्थानिक गुन्हेगारी संबंधित माहिती
4. https://satyashodhaknews.com – सत्यशोधक न्यूज (स्थानिक शिरूर बातम्या)