
Contents
- 1 Breaking News Bangladeshi In MIDC: चक्क ४ बांगलादेशी नागरिक रांजणगाव MIDC !
Breaking News Bangladeshi In MIDC: चक्क ४ बांगलादेशी नागरिक रांजणगाव MIDC !
Breaking News Bangladeshi In MIDC Ranjangaon
📅 दिनांक : 12 जुलै 2025 | सत्यशोधक न्यूज
Breaking News Bangladeshi In MIDC: चक्क ४ बांगलादेशी नागरिक रांजणगाव MIDC ! रांजणगाव व दहशतवाद विरोधी शाखेच्या संयुक्त कारवाईत कारेगाव (शिरूर) येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारे ४ बांगलादेशी नागरिक अटकेत – पासपोर्ट व विदेशी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू”
(रांजणगाव MIDC बेकायदा राहणार्या बांगलादेशी नागरिकांसह)
दहशतवाद विरोधी शाखा पुणे ग्रामीण व रांजणगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत, भारतात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणारे चार बांगलादेशी नागरिक कारेगाव (ता. शिरूर) येथे अटक करण्यात आले आहेत. या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
👉 अटकेतील आरोपींची माहिती —-
1. कमरोल रमजान शेख (32 वर्षे) – जिल्हा खोलना, बांगलादेश
2. अकलस मजेद शेख (39 वर्षे) – जिल्हा गोपालगंज, बांगलादेश
3. मोहम्मद अब्दुल्ला मलिक (35 वर्षे) – जिल्हा नोडाइल, बांगलादेश
4. जाहिद अबूबकर शेख (30 वर्षे) – जिल्हा नोडाइल, बांगलादेश
(सध्या सर्वजण – राहणार कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे)
📌 गुन्ह्याची नोंद —-
• गु.र.नं. : 228/2025
• कायदे : भारतीय दंड संहिता कलम 336(2)(3), 338, 340(2),
• पासपोर्ट अधिनियम 1950 अंतर्गत कलम 3, 6,
• परकीय नागरिक आदेश 1948 अंतर्गत कलम 14
• फिर्यादी : पो.कॉ. मोसिन बशीर शेख (दहशतवाद विरोधी शाखा, पुणे ग्रामीण)
• गुन्हा घडलेली वेळ : 11 जुलै 2025 रोजी सायं 6.30 ते रात्री 11.20
• अटक तारीख : 12 जुलै 2025, सकाळी 5.00 वा.
• नोंद क्र. : 04/2025
🕵️ हकीकत काय?—-
गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या बातमीवरून कारेगाव (शिरूर) येथे बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी शाखा आणि रांजणगाव पोलीस ठाण्याचे पथक यांनी संयुक्त कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत वरील चौघे बांगलादेशी नागरिक कोणतीही वैध प्रवासी कागदपत्रे न ठेवता, बनावट आधार कार्ड तयार करून मागील दोन वर्षांपासून येथे वास्तव्य करत असल्याचे उघड झाले.
⚖️ न्यायालयीन कारवाई—-
सदर आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
👮 कारवाईचे नेतृत्व —
ही महत्त्वाची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
कारवाईत सहभागी अधिकारी :
👉 पो.नि. महादेव वाघमोडे (रांजणगाव पोलीस ठाणे)
👉 सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार (दशविरोधी शाखा)
👉 PSI तिडके, PSI अविनाश थोरात,
👉 ASI विशाल गव्हाणे, दत्तात्रय शिंदे,
👉 HC विशाल भोरडे, रवींद्र जाधव,
👉 पो.कॉ. मोसीन शेख, ओमकार शिंदे, योगेश गुंड, संतोष साळुंखे, आकाश सवाने
📌 निष्कर्ष—-
बेकायदेशीर घुसखोरी ही देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर बाब आहे. दहशतवाद विरोधी शाखा व स्थानिक पोलीस प्रशासन यांनी वेळेवर केलेल्या कारवाईमुळे अशा प्रकारचा गंभीर प्रकार उघड झाला असून, गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना•••••
🔗
Passport Act 1950 – India Code
Foreigners Act, 1946 – India Code