
Kokate Statement: “शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे कृषिमंत्री कोकाटे अधिवेशनात ‘रमी’ खेळतात? – आम आदमी पार्टीचा आरोप”
Kokate Statement Aap Aposes
📰 बातमी | सत्यशोधक न्यूज |
दिनांक : २० जुलै २०२५ |
Kokate Statement Aap Aposes : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे शेतकऱ्यांविषयी पुन्हा एक वादग्रस्त विधान चर्चेत, आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप – अधिवेशनादरम्यान मंत्री रमी खेळतात! कोकाटेंचा पगार आणि भत्त्यांवर प्रश्नचिन्ह. वाचा सविस्तर.
(व्हायरल व्हिडिओचा खुलासा ऐका…मुंंकुंद किर्दत, प्रवक्ते,आम आदमी पक्ष,महाराष्ट्र )
“कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी आहे”, असे विधान करणारे महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. शेतकऱ्यांविषयी अपमानजनक वक्तव्य केल्यानंतर आता अधिवेशनादरम्यान मंत्री रमी खेळतात, असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी कोकाटे यांनी शेतकऱ्यांची तुलना थेट भिकाऱ्यांशी केली होती. “शेतकरी कर्ज घेतात आणि त्याची माफीची वाट पाहतात, आणि कर्जमाफीच्या पैशातून लग्न-साखरपुडे करतात”, असे वक्तव्य करत कोकाटेंनी शेतकऱ्यांचा अपमान केला होता.
आता मुकुंद किर्दत म्हणतात की, “हे मंत्री आपल्या आणि तुमच्या खिशातून दर महिन्याला अडीच लाख रुपये पगार घेतात, अधिवेशनादरम्यान वेगळा भत्ता घेतात, आणि त्यावेळी जर हे जनतेच्या पैशावर रमी खेळत असतील, तर त्यांना पगार का द्यावा?”
अधिक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा •••••
🏷️ 1. https://www.aapnashahar.com – आम आदमी पार्टीच्या अधिकृत बातम्या
2. https://www.lokmat.com – कोकाटेंच्या पूर्वीच्या वक्तव्यांवरील बातम्या
3.https://www.agriculture.maharashtra.gov.in – कृषी विभागाची अधिकृत वेबसाइट
4. https://www.esakal.com – कोकाटे प्रकरणांवरील रिपोर्टिंग
5. https://www.indiatoday.in – राष्ट्रीय स्तरावरील राजकीय घडामोडी
🗣️ जनतेचा सवाल —
शेतकऱ्यांच्या श्रमांचा अपमान करणाऱ्या मंत्र्यांना पगार आणि भत्ते का?
तुमचा काय मत आहे? खाली कमेंट करा!
https://shorturl.fm/uSh18
https://shorturl.fm/a037O