
Prahaar Sanghatana News: शिरूरच्या कारेगाव येथे शेतकरी कर्जमाफीसाठी चक्का जाम आंदोलन
Prahaar Sanghatana News Koregaon Protest !
📅 दिनांक: २४ जुलै २०२५
📍 ठिकाण: कारेगाव (यश इन चौक), शिरूर तालुका, पुणे जिल्हा
Prahaar Sanghatana News: शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाने चक्का जाम आंदोलन केले. बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली हा लढा महाराष्ट्रभर सुरू आहे.

आज दिनांक २४ जुलै २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्जमाफीसाठी व्यापक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा भाग म्हणून Prahaar Sanghatana News अंतर्गत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे (यश इन चौक) चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
🔸 आंदोलनाला प्रमुख उपस्थिती—-
• प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष: राहुल वाळके
• प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष: शरद जाधव
• जिल्हा महिला अध्यक्ष: अनिता कदम
• उपजिल्हा कार्याध्यक्षा: उज्वला गाडेकर
• कार्याध्यक्ष: सुप्रिया लोखंडे
• पुणे जिल्हा संघटक: भास्कर गवारे
• शिरूर तालुका अध्यक्ष: नारायण नवले
• महिला तालुका अध्यक्ष: ज्योती हिवरे
👥 सहभागी कार्यकर्ते व ग्रामस्थ—-
संभाजी नवले, शोभा दुधाडे, माया फलके, मनिषा पाटील, विलास नवले, धनंजय कोहोकडे, माणिक तात्या, तुकाराम महाराज गवारे, फक्कड नवले, नंदू नवले, शंकर कोहोकडे, उमेश कोहोकडे,माजी उपसरपंच नवनाथ नवले ,रंगनाथ कान्हेरे आदींसह कारेगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.
विशेषतः गणेश कचरे, वंदना शिरतोडे, दत्तात्रय तरटे, तुषार हिरवे, मनीष सोनवणे, रेणुका मल्लाव, रेश्मा कडलग, योगिता कदम, रंणशिगे, बोरकर मामा या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला.
⏰ आंदोलनाची वेळ—
सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत या चक्का जाम आंदोलनाने परिसरात वाहतूक ठप्प केली होती. पोलिस यंत्रणेने शिस्तबद्ध नियंत्रण ठेवले असून, आंदोलन शांततेत पार पडले.
✊ मागणीचा मुद्दा—-
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ही Prahaar Sanghatana News मध्ये केंद्रस्थानी असलेली मागणी होती. प्रहार संघटनेने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी आवाज बुलंद केला आहे.
📷 फोटो, व्हिडिओ व पुढील अपडेटसाठी भेट द्या. ..
प्रहार जनशक्ती पक्ष अधिकृत फेसबुक पेज
बच्चूभाऊ कडू यांचे ट्विटर प्रोफाईल
शेतकरी आंदोलनांवरील राज्यस्तरीय अपडेट
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करून ••••
https://shorturl.fm/mRq9O