
Contents
कारेगाव येथे शेततळ्यात दुर्दैवी अपघात: दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू, दोन जखमी
कारेगाव सह तालुका हळहळला!
दिनांक २८ जुलै २०२५ |प्रतिनिधी |
शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे 28 जुलै रोजी सायंकाळी पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी दोन अल्पवयीन मुलांचा शेततळ्यात पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृत मुलांमध्ये अनमोल पवार (13) आणि कृष्णा राखे (8) यांचा समावेश आहे. ही दुर्दैवी घटना रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. इतर दोन मुले जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शिरूर तालुक्यातील कारेगाव परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. 28 जुलै 2025 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता बाभुळसर शिवारालगत असलेल्या एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार बालकांपैकी दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अनमोल उर्फ बाबू प्रविण पवार (वय 13) आणि कृष्णा उमाजी राखे (वय 8, दोघेही रा. कोहकडे हॉस्पिटल शेजारी, कारेगाव) हे दोघे पाण्यात बुडाले.
इतर दोन मुले – आदेश पवार (वय 14) व स्वराज शिरसाठ (वय 13) यांच्यावर श्री गणेशा हॉस्पिटल शिरूर येथे उपचार सुरू आहेत. ही घटना पोलिसांना प्रदीप रामराव पवार यांनी कळविली.
प्राथमिक उपचारासाठी श्री गणेशा हॉस्पिटल येथे आणण्यात आलेल्या मुलांना नंतर शिरूर ग्रामीण रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. घटनेचा रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अन्वेषण सुरू असून, अ. म. रजि. नं. 87/2025 अन्वये भा. ना. सु. सं. कलम 194 अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
🔗अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थांळा••••
https://maharashtratimes.com – स्थानिक बातम्या
https://www.punepolice.gov.in – पुणे ग्रामीण पोलीस
https://shriramhospitalshirur.com – शिरूर हॉस्पिटल संदर्भ
https://ncrb.gov.in – अपघात आणि दुर्घटनांची राष्ट्रीय माहिती
https://shorturl.fm/zjCAv
https://shorturl.fm/ZzJb1
https://shorturl.fm/OJVZh
https://shorturl.fm/wjy4d