
उसतोड कामगार बंदीस्त करुन ठेवण्याचा धक्कादायक प्रकार शिरुरमधे उघड!
उसतोड कामगार वेठबिगार केले?
शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथे बंद बिगारीचा धक्कादायक प्रकार उघड!ऊसतोड कामगार मजूर कुटुंबाला दोन वर्षे बंधनात ठेवून जबरदस्तीने काम करणे, धमकी व मारहाण प्रकरणी शिरूर पोलिसांनी केली कारवाई. गुन्हा दाखल, चौकशी सुरु!
➡️ गुन्हा रजिस्टर क्र. 551/2025, शिरूर पोलीस स्टेशन
➡️ आरोप – जबरदस्तीने काम करवून घेणे, मारहाण व धमकी
➡️ आरोपी – संदिप बाळु डुबे, रा. गणेशनगर, आलेगाव पागा, शिरूर
➡️ पीडित – ज्ञानेश्वर साहेबराव चव्हाण व त्यांचे कुटुंब
🧾 घटनास्थळाचा तपशील—-
शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथील एका गुळाच्या शेतामध्ये, 2023 पासून 2025 पर्यंत तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ एका उसतोड मजुराच्या कुटुंबाला जबरदस्तीने काम करायला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी संदिप डुबे यांनी संपूर्ण कुटुंबाला बंधनात ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला.
🔍 प्रमुख आरोप व घटनेचा तपशील—-
• कुटुंबाच्या ताब्यातील 14 जण, त्यात लहान मुले, गाई, बकऱ्या व कोंबड्यांचा समावेश
• सरकारी रुग्णालयात उपचारासाठी जाऊ दिले नाही
• नातेवाईकांच्या मृत्यूच्या प्रसंगी गावी जाण्यास मज्जाव
• आठवड्याच्या बाजारासाठी फक्त स्थानिक गावात जाण्याची परवानगी
• कामाच्या मोबदल्याचा हिशोब दिला गेला नाही
• विरोध केल्यास धमकी आणि मारहाण
👮 पोलीस कारवाई—–
13 वाजता पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने, नायब तहसीलदार स्नेहा गोसावी, सरकारी कामगार अधिकारी, NGO कार्यकर्ते व वकील यांच्या सहकार्याने कुटुंबाची सुटका केली. पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 115(2), 126(2), 131, 351(2)(3), तसेच बंद बिगार पद्धती अधिनियम 1976 अंतर्गत कलम 9, 16, 17 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना••••••
🔗
https://labour.gov.in – Ministry of Labour and Employment, India
https://nhrc.nic.in – National Human Rights Commission
https://pune.gov.in – पुणे जिल्हा प्रशासन
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या वाचा पुढील लिंकवर क्लिक करुन,•••••
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) फंड: समाजासाठी फायदे, पात्रता, नियम व मराठी तरुणांना संधी .
https://shorturl.fm/Z0cZL
https://shorturl.fm/87wcT
https://shorturl.fm/wjy4d