
Accident News Shirur Pick Up: शिरूरमध्ये पिकअप वाहनाच्या निष्काळजीपणामुळे अपघात – शिक्षकाच्या कारचे नुकसान!
Accident News Shirur Pick Up Damage
शिरूर, ७ जून २०२५ | सत्यशोधक न्युज |
” Accident News Shirur Pick Up: शिरूरमध्ये भरधाव पिकअप जीपने शिक्षकाच्या कारला दिलेल्या धडकेत मोठे नुकसान झाले. पोलीसांनी अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.”
शिरूर शहरात पुन्हा एकदा निष्काळजी वाहनचालकामुळे अपघात घडला आहे. ही घटना दिनांक ६ जून २०२५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पुणे-नगर हायवेवरील बापुराय नगर (शिरूर) येथे घडली. या अपघातात एका शिक्षकाच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.
फिर्यादी संभाजी शिवाजी सरड हे शिक्षक —
फिर्यादी संभाजी शिवाजी सरड (वय ५०, व्यवसाय – शिक्षक) हे त्यांच्या स्विफ्ट कार (MH12PZ0364) ने रस्ता ओलांडत असताना, MH12WX6124 क्रमांकाच्या पिकअप जीपने भरधाव वेगाने येत त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की कारच्या समोरील टायर आणि बोनटचे मोठे नुकसान झाले.
चालक घटनास्थळावरून पळून गेला—

या अपघातानंतर संबंधित पिकअपचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. फिर्यादी सरड यांनी याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 392/2025 अन्वये भा.दं.वि. कलम 281, 324(1) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 व 134/177 नुसार फिर्याद नोंदवली आहे.
या प्रकरणाचा तपास सफौ साबळे करत असून, अज्ञात पिकअप चालकाचा शोध सुरू आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना–
1. महाराष्ट्र वाहतूक नियम व कायदे
2. मोटार वाहन कायदा – भारत सरकार
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंक वर क्लिक करुन —
Ranjangaon MIDC Triple Murder Case: “याला फाशीचीच शिक्षा व्हावी!”
Breaking News: रांजणगाव MIDC तिहेरी खुन प्रकरणाचा पर्दाफाश! खुनाची गूढ उकलले ! वाचा सविस्तर —