
Contents
Accident Pune Nagar High Way : अज्ञात इसम अपघातात मृत्युमुखी !
Accident Pune Nagar High Way वर अपघातातील मृत इसम 35 ते 40 वयोगटातील !
Shirur Accident News , 18 February 2025
Accident Pune Nagar High Way वर अज्ञात इसम अपघातात मृत्युमुखी पडला आहे.
Accident Pune Nagar High Way वरील या अपघातातील मृत इसम 35 ते 40 वयोगटातील अज्ञात आहे. Shirur Police पुढील तपास करत आहेत.
Accident Pune Nagar High Way वर —-

शिरुर पोलिस स्टेशन मधे अपघाताची नोंद करण्यात आली आहे. ती अशी आहे. दिनांक 15/02/2025 रोजी रात्री 8: 30 वाजण्याच्या पुर्वी ( नक्की वेळ माहीत नाही ) शिरुर , तालुका – शिरुर , जिल्हा – पुणे गावच्या हद्दीत Accident घडला. पुणे अहमदनगर हायवे रोडवर पुणे ते अहमदनगर जाणार्या लेन वर आर. के – हॉटेल समोर हा अपघात झाला आहे. एक 35 ते 40 वर्षे वयोगटातील अनोळखी इसमास कोणत्यातरी अजात वाहनाने धडक दिली.
” दरम्यान या अज्ञात इसमाची ओळख पटली आहे . त्यांचे नाव संतोष दशरथ शिंदे, वय – 47 वर्षे, राहणार- हिंगणी दुमाला,तालुका – श्रिगोंदा, जिल्हा – अहिल्यानगर असे आहे. त्यांच्या पत्नी छाया शिंदे या ते बेपत्ता असल्याची माहिती देण्यासाठी शिरुर पोलिस स्टेशन ला आल्या होत्या. तेव्हा शिरुर पोलिसांनी त्यांना मृत इसमाची ओळख करण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी आपल्या पतीला ओळखले. ते शनिवारी आठवडा बाजारासाठी शिरुर ला आले होते. असे त्यांनी सांगितले. नंतर ही दुर्दैवी घटना घडली आहे. “
Read more >>
Chaava Box Office ‘छावा’ ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई – विकी कौशलची सर्वात मोठी ‘ओपनिंग’ फिल्म !
शिरुर जवळ दुचाकीस्वारास ट्रकची धडक ! दोघांपैकी एक जखमी गंभीर!
Accident Pune Nagar High Way मृत व्यक्ती व चालकही अज्ञात —
त्यावरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने , अविचाराने चालवले. भरधाव वेगात वेगात वाहन चालवले. रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. आणि अज्ञात इसमास धडक दिली. या अपघातातील मृत इसमास अपघात होवुन त्याच्या डोक्यास तसेच हातापयाला गंभीर व किरकोळ दुखापती झाल्या. अज्ञात चालक त्याच्या मृत्युस कारणीभूत झाला. या अपघाताची खबर न देता निघुन गेला .
Read more>>
Shirur Police Station मधे गुन्हा दाखल —-

म्हणुन फिर्यादी रमेश पांडुरंग चौधरी , वय – 62 वर्षे , धंदा – मजुरी, राहणार- सतराकमान पुलाजवळ , शिरुर , तालुका – शिरुर, जिल्हा – पुणे यांनी त्या अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध Shirur Police Station मधे
कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे .
फिर्यादी—
रमेश पांडुरंग चौधरी, वय- 62 वर्षे ,धंदा- मजुरी , राहणार – सतराकमान पुलाजवळ, शिरुर, तालुका – शिरुर, जिल्हा – पुणे
आरोपी—
अज्ञात वाहनावरील अज्ञात चालक.
मयताचे नाव —-
35 ते 40 वयोगटातील अनोळखी इसम.
शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर- 105/2025 असा आहे. तर भारतीय न्याय संहीता कायदा कलम 281, 125 (a),125 (b) 106 (2),व मोटर वाहन कायदा कलम 184,134/177 प्रमाणे अज्ञात वाहन चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more >>
Shirur Police करत आहेत Accident Pune Nagar High Way चा पुढील तपास —-
दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. टेगले हे आहेत.तर पुढील तपास अंमलदार पोलिस निरीक्षक श्री . चव्हाण हे करत आहेत. प्रभारी अधिकारी , पोलीस निरीक्षक संदेश केंजाळे , शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.
” सत्यशोधक न्युज ची खास भेट “
सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी खास ज्यांना वैचारिक खाद्य लागते.त्यांच्यासाठी कांब्रेड शरद पाटील प्रेरित डॉ.सुभाष गवारी,शिरुर यांच्या मावळाई प्रकाशन निर्मित , ‘ साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी चा अंक 23 त्यांच्या सौजन्याने पीडीएफ स्वरुपात देत आहोत.