
Contents
- 1 Alibag News: जिल्हा रुग्णालय अलिबागमधील पुरुष शौचालय ९ महिन्यांपासून बंद; रुग्ण व नातेवाईकांची मोठी गैरसोय
- 1.0.1 शौचालयाचे काम नोव्हेंबर २०२४ मध्ये सुरू करण्यात आले होते—-
- 1.0.2 दुर्गंधी, पाण्याची अनुपलब्धता आणि स्वच्छतेचा अभाव–
- 1.0.3 शेतकरी कामगार पक्षाची मागणी—
- 1.0.4 कर्मचारी इतर कामांसाडी वळवले?
- 1.0.5 फिल्टर वॉटर कुलरमध्ये गाळ व अळ्या आढळल्या होत्या —-
- 1.0.6 खालिल उपयुक्त साईटला भेट द्या —
- 1.0.7 About The Author
Alibag News: जिल्हा रुग्णालय अलिबागमधील पुरुष शौचालय ९ महिन्यांपासून बंद; रुग्ण व नातेवाईकांची मोठी गैरसोय
Alibag News District Hosptial Issue
दिनांक 31 मे 2025 : अलिबाग प्रतिनिधी अमुलकुमार जैन |
देशभरात स्वच्छ भारत अभियानाचा डंका वाजवण्यात येत असतानाच रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात मात्र स्वच्छतेच्या नावाने बोंब असल्याचे चित्र आहे. पुरुष वैद्यकीय विभागातील एकमेव शौचालय गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असून, या विभागात दाखल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शौचालयाचे काम नोव्हेंबर २०२४ मध्ये सुरू करण्यात आले होते—-
सदर शौचालयाचे काम नोव्हेंबर २०२४ मध्ये सुरू करण्यात आले असले तरी आजही अपूर्णच आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना शेजारच्या महिला विभागातील शौचालयाचा वापर करावा लागत आहे. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी “फक्त पुरुषांसाठी” अशी पाटी असूनही, अशा परिस्थितीत दोन्ही लिंगांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
दुर्गंधी, पाण्याची अनुपलब्धता आणि स्वच्छतेचा अभाव–

असल्याचे सांगण्यात आले, पण सर्वच बंद आहेत. जिथे कधीमधी काही शौचालय सुरू असते, तिथे दुर्गंधी, पाण्याची अनुपलब्धता आणि स्वच्छतेचा अभाव हे ठळक प्रश्न आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट बाहेरून पाणी आणावे लागते.
शेतकरी कामगार पक्षाची मागणी—
शेतकरी कामगार पक्षाच्या आरोग्य व आपत्ती समितीचे जिल्हाकार्यकरिणी सदस्य व अलिबाग तालुका शहर प्रमुख सागर पेरेकर यांनी रुग्णालय प्रशासनाला यासंदर्भात जागे करत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
कर्मचारी इतर कामांसाडी वळवले?
कक्षाधिकारी परिचारिका यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, शौचालयाचे बांधकाम करणारे कर्मचारी इतर ठिकाणी वळवले गेले असून, अधूनमधूनच येथे काम केले जाते. हे काम लवकर पूर्ण करून विभागातील स्वच्छतेची दुरवस्था थांबवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
फिल्टर वॉटर कुलरमध्ये गाळ व अळ्या आढळल्या होत्या —-
यापूर्वी रुग्णालयातील फिल्टर वॉटर कुलरमध्ये गाळ व अळ्या आढळल्याचा प्रकारही घडला होता. या सर्व घटनांतून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने तत्काळ पावले उचलणे गरजेचे ठरते.
खालिल उपयुक्त साईटला भेट द्या —
स्वच्छ भारत अभियान अधिकृत संकेतस्थळ
महाराष्ट्र शासन – आरोग्य विभाग
Rural Health Statistics 2024 (PDF)
RTI Online Filing (शासकीय माहिती मागण्यासाठी)
तुमचं मत काय? या स्थितीत बदल होण्यासाठी तुम्हाला काय वाटतं? खाली कॉमेंट करून कळवा!
✍️ सत्यशोधक न्यूजसाठी प्रतिनिधी – अमुलकुमार जैन
🌐 satyashodhak.blog
—
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंक वर क्लिक करुन —-
LIC Jeevan Umang Yojana 2025 :ही विमा योजना २०२५ मध्ये सर्वाधिक फायदेशीर ठरणार! जाणून घ्या कारणं!