ब्रेकिंग न्युज : आनंद नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा प्रकरण : अखेर अभय चोरडियांसह 14 जणांवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल ?
ब्रेकिंग न्युज: आनंद नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा प्रकरणात अखेर अभय चोरडियांसह 14 जणांवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असल्याचे पोलिस सुत्रांकडून समजले आहे.बहुचर्चित असा हा घोटाळा शिरुर शहरात झाला होता. अनेक गरीब व श्रिमंतांचाही पैसा या पतसंस्थेत गुंतलेला होता.
ब्रेकिंग न्युज : आनंद नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा प्रकरण : अखेर अभय चोरडियांसह 14 जणांवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल ?
ब्रेकिंग न्युज : आनंद नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा : अखेर ‘चोरडिया परिवार’ जाणार तुरुंगात ?
शिरुर, दिनांक 10 जुलै : (डा.नितीन पवार ,संपादक )
आनंद नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा प्रकरणात अखेर अभय चोरडियांसह 14 जणांवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असल्याचे पोलिस सुत्रांकडून समजले आहे.बहुचर्चित असा हा घोटाळा शिरुर शहरात झाला होता. अनेक गरीब व श्रिमंतांचाही पैसा या पतसंस्थेत गुंतलेला होता.
Dr.Nitin Pawar,Editor – satyashodhaknews.com
‘सत्यशोधक न्यूज’ ची याआधीची आवृत्ती शिरुर वार्ता ,www.Shirur Varta.in ने प्रथम काही महिन्यांपुर्वी या विषयाला वाचा फोडली होती. त्यानंतर काही लोकांचे पैसे परत देण्याचे काम पतसंस्थेकडुन सुरु केले गेले होते. सर्वांचे पैसे परत मिळतील अशी आशा सर्वांना होती.परंतु तसे झाले नाही.त्यावेळेस सुद्धा फसवणुक झालेल्या असंख्य गुंतवणुकदारांची पोलिस मदत घेण्याची इच्छा होती.परंतु शहरातील काही प्रतिष्ठीत मान्यवरांनी समेट घडवत मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता.
त्यानंतर शिरुर वार्ता, न्युज पोर्टल ने हा विषय सबंधितांवर सोडला होता. नंतर कधीच पुढुन किंवा मागच्या दाराने या विषयात कोनताही हस्तक्षेप केला नाही.तो आमचा प्रांत नाही. पत्रकारिता हा आमचा धर्म आहे.पैसा हा नाही. नंतर ‘शिरुर वार्ता’ चे रुपांतर आम्ही ‘सत्यशोधक न्युज’ मधे केले.डोमेन बदलले,होस्टिंग बदलले .पण आमचे वाचक व वाचकांचा आमच्या वरचा विश्वास बदलला नाही. नवे नाव आम्ही धारण केले. आमच्या वाचकांनी अपेक्षेपेक्षा कमी कालावधीत नव्या नावाशी आणि आमच्या ध्येय धोरणांशी जुळवून घेत आमची साथ सोडली नाही. आम्हाला ते अपेक्षितच होते.कारण आमचे कर्तव्य आम्ही पार पाडणार असा विश्वास आमच्या शिरुरसह महाराष्ट्र व डिजिटल दुनियातील आमच्या वाचकांना होता.
काही महिन्यांनतर हा विषय पुन्हा पुढे आला.तेव्हा आमच्या कर्तव्य्यांच्या बाबतीत तसुभरही न ढळता आम्ही या विषयाला पुन्हा वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.आमचे व्यक्तीगत कुणाशीही काहीही वैर नाही. उलट शिरुरला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा आमचा मानस आहे.हे आम्ही स्पष्ट करतो.सर्व नागरिकांनी,ग्राहकांनी ,गुंतवणुकीदारांनी,कर्मचाऱ्यांनी ,प्रशासनाने हा प्रश्न शांतता व संयमाने सोडवावा,अशीच ‘सत्यशोधक न्युज’ ची इच्छा आहे. हे आम्ही स्पष्ट करत आहोत !
—– संपादक – डा.नितीन पवार, शिरुर.
पतसंस्थेच्या संचालकांचे वारंवार फक्त आश्वासनच…
हा पैसा परत देण्याचे आश्वासन वारंवार अभय चोरडिया, संचालक यांच्याकडुन देण्यात येत होते. लोकांनी संयम व धीर धरला होता.पण काही किरकोळ पैसा वगळता बहुतेकांचा विश्वासाने पतसंस्थेतील ठेवींमधील मिळाला नाही. परिणामी आज संचालक अभय चोरडरडियासह 14जणांवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आल्याने शिरुर तसेच पुणे येथील व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. पतसंस्थांच्या क्षेत्रात देखील हा चर्चेचा विषय झाला आहे. त्यामुळे अखेर चोरडिया परिवार जाणार तुरुंगात जाणार का ? अशी चर्चा राज्यभर पसरत आहे, असे समजते.
दिनांक 31/12/2013 ते दिनांक 20/02/2020 या कालावधीमध्ये शिरुर, तालुका – शिरूर, जिल्हा- पुणे येथील आनंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, शिरुर या संस्थेमध्ये
1) श्री. अभयकुमार पोपटलाल चोरडिया, संस्था अध्यक्ष /भागीदार
2) श्री. प्रविण चंपालाल चोरडीया, भागीदार 3) श्री. मुरसलीन वहिंद मोहमद, भागीदार 4) श्री. सनी धरमचंद चोरडीया, भागीदार 5) सौ. सविता अभयकुमार चोरडिया, भागीदार
11) श्री. शांताराम गंगाधर देवकर, संस्था व्यवस्थापक
या व्यक्तींनी चाचणी लेखापरीक्षणानुसार संस्था कामकाजात निदर्शनास आलेल्या गंभीर बाबी, अपहार, अफरातफर, गैख्यवहार, अनियमितता करुन संस्था सभासदांचा व ठेवीदारांचा विश्वासघातं व फसवणूक केली आहे. तसेच
12) श्रीमती सरिता ब्रिजमोहन सिंह, सनदी लेखापाल 13) श्री. नागेंद्र एच. सोरटे, प्रमाणित लेखापरीक्षक 14) श्री. अजय एच. सोस्टे, प्रमाणित लेखापरीक्षक
संचालक व कर्मचार्यांचे संगनमत…
यांनी संगणमत करून वरील कालावधीत स्वताःच्या फायदयाकरीता आपल्या पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवींची रक्कम ही स्वतःचे फायदयासाठी आपल्याच फर्मच्या नावे कर्जाचे वितरण करून ठेवीदारांच्या रु. 16,70,54,361 / – (अक्षरी रुपये सोळा कोटी सत्तर लाख चोपन्न हजार तीनशे एकसष्ट फक्त) एवढ्या रक्कमेचा अपहार करून ठेवीदारांचा विश्वासघात केला आहे.
प्रमुख फिर्यादी संजयकुमार सखाराम पुंडे , वय – 56 वर्ष, व्यवसाय- शासकीय नोकरी , राहणार- 1103, जे – 2 टॉवर , लेजर टाऊन, अमनोरा फायरस्टेशन मागे, हडपसर, पुणे – 411028 हे आहेत.
अखेर गुन्हा दाखल !
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर
आरोपींवर शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं. 626/2024 म्हणुन वरील नमूद 14 लोकांच्या विरुद्ध सरकारतर्फे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस सब इन्पेक्टर मुजावर हे डी वाय एस पी श्री. प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक श्री. जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
आता शिरुर पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com