अण्णा भाऊ साठे ,लोकशाहीर व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना संयुक्त जयंती कार्यक्रमात अभिवादन !
अण्णा भाऊ साठे ,लोकशाहीर व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना संयुक्त जयंती कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले आहे. तसेच अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रम 'माईलस्टोन ज्ञानपीठ फाउंडेशन' , पुणे या शैक्षणिक संस्थेच्या कारेगाव येथील शाळेत संपन्न झाले आहे.ही बाब कौतुकास्पद आहे. माईलस्टोन इंटरनॅशनल स्कुल हे एक नामांकित इंग्रजी स्कुल कारेगाव येथे आहे.ते अलिकडे या प्रकारच्या उपक्रमांमुळे चर्चेत आले आहे. ते शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करत आहे. त्यामुळे कारेगाव व शिरुर तालुक्यात ते नावाजले जात आहे.इंग्रजी माध्यमातुन असुनही ते समाजातील पददलित समाजामधे काम करत आहे. हे विशेष अशी बाब ठरली आहे.
अण्णा भाऊ साठे ,लोकशाहीर व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना संयुक्त जयंती कार्यक्रमात अभिवादन !
अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रम माईलस्टोन ज्ञानपीठ फाउंडेशन, पुणे या शैक्षणिक संस्थेच्या कारेगाव येथील शाळेत संपन्न !
शिरुर,दि.3 ऑगस्ट : ( सौ.कांचन सोनवणे पाटील,शिरुर तालुका प्रतिनीधी, दैनिक निर्मल विदर्भ,यांच्याकडुन )
कार्यक्रम प्रसंगीचे एक छायाचित्र !
अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक जयंती कारेगाव…
अण्णा भाऊ साठे ,लोकशाहीर व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना संयुक्त जयंती कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले आहे. तसेच अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रम ‘माईलस्टोन ज्ञानपीठ फाउंडेशन’ , पुणे या शैक्षणिक संस्थेच्या कारेगाव येथील शाळेत संपन्न झाले आहे.ही बाब कौतुकास्पद आहे. माईलस्टोन इंटरनॅशनल स्कुल हे एक नामांकित इंग्रजी स्कुल कारेगाव येथे आहे.ते अलिकडे या प्रकारच्या उपक्रमांमुळे चर्चेत आले आहे. ते शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करत आहे. त्यामुळे कारेगाव व शिरुर तालुक्यात ते नावाजले जात आहे.इंग्रजी माध्यमातुन असुनही ते समाजातील पददलित समाजामधे काम करत आहे. हे विशेष अशी बाब ठरली आहे.
क्षणचित्रे
अण्णा भाऊ साठे. …
अण्णा भाऊ साठे हे एक प्रतिभावान शाहीर,गीतकार, लेखक,कामगार चळवळ ,संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक आघाडीचे शिलेदार होते.ते आपल्या शाहिरीतुन आणि साहित्यातुन प्रबोधन चळवळ गतीमान करत होते.ते प्रामुख्याने कामगार व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कार्यरत होते.शाहिर अमर शेख हे त्यांचे सहकारी होती.या दोन कलावंतांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा महाराष्ट्रात दणाणुन सोडणार्यांपैकी एक होते.डा.बाबासाहेब आंबेडकर हे देखील या चळवळीत सक्रिय होते.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. …
दुसरे एक राष्रवादी, प्रखर पत्रकारिता करणारे त्याकाळातील दैनिक केसरीचे संपादक होते.त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध जहाल लेखन केले.इंग्रजांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले आहे. याच असंतोषामुळे पुढे भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतुन मुक्त झाला.असे एक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते होते.ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जहाल मतवादी तर होतेच पण महान स्वातंत्र्यसेनानी, तत्वज्ञ, राजकारणी व प्रखर देशभक्त होते.
‘माईलस्टोन ज्ञानपीठ फाउंडेशन’, पुणे हे होते आयोजक……
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त ‘ माईलस्टोन ज्ञानपीठ फाउंडेशन, पुणे’ या शैक्षणिक संस्थेच्या कारेगाव, तालुका – शिरूर येथील ‘माईलस्टोन इंटरनॅशनल स्कुल’या शाळेत लोकोत्तर महापुरुषांच्या प्रतिमानचे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर संयुक्त अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी आणि कार्यकारी संचालक राजाराम पाटील सोनवणे यांनी दिली आहे.
“अण्णा भाऊ साठे हे कामगार व प्रामुख्याने डाव्या चळवळीतील कलावंत होते.ते कला व लेखन या माध्यमातुन या चळवळीत सक्रिय होते. ही चळवळ मार्क्सवादी विचारांनी प्रेरित होती.कम्युनिस्ट रशियन सरकारने त्यांना सोव्हियेत युनियनला खास आमंत्रित केले होते.अण्णा त्या भेटीला गेले.त्या प्रवासावर अण्णा भाऊ साठे यांनी ,’माझा रशियाचा प्रवास ‘हे पुस्तक लिहिले आहे. ते वाचण्यासारखं आहे.ही चळवळ आर्थिक आधारावरील विषमता,शोषण व वर्गीय आधारावर जगाच्या इतिहासवर आधारित होती.कार्ल मार्क्स यांनी हे तत्वज्ञान मांडले होते.त्याने त्यावेळचे निम्मे जग व्यापलेले होते.
त्याच वेळी भारतात डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्ल मार्क्स यांच्या विचारांवर त्यांची चळवळ चालवली नव्हती .डा.आंबेडकर हे कार्ल मार्क्स प्रमाणे एक तत्वज्ञान मांडणारे विचारवंत व संशोधक होते.त्यांनी भारताच्या परिस्थितीत मार्क्सवाद लागु होत नाही. असा निष्कर्ष काढला होता. त्यानुसार ते जाती अंताची चळवळ चालवत होते.अर्थात ते दोघेही समाजाच्या हितासाठी लढत होते.
पण काही लोक मतांच्या राजकारणात,वोटबन्केच्या राजकारणात हे दोन्ही सारख्याच विचारांचे होते.असा प्रसार करतात.पण ते खरे नाही. ही बाब लक्षात घेऊन वास्तव समजुन घेतले पाहिजे.फरक समजुन घेतला पाहिजे. ओढुन तानून ते एकाच विचारांचे होते. असे खोटे सांगु नये.”
टिळक व अण्णा भाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरणादायी…
या कार्यक्रम प्रसंगी सोनवणे पाटील यांनी बोलताना ‘लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ यांच्या जीवनातील अनेक कठीण प्रसंग सांगितले. त्यांनी केलेल्या महान व उल्लेखनीय कार्याविषयी विद्यार्थी व उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.’साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कार्य आजही समाजाला मार्गदर्शक आणि दिशादर्शक असून आमच्यासारख्या युवकांना नेहमीच प्रेरणा देणारे असून सदैव आदर्शवत असल्याचे’ मत त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
स्तुत्य उपक्रम. …
अशा महान थोर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीचे कार्यक्रम शाळेमध्ये साजरे करुन त्यांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना ओळख करुन देण्याच्या आणि त्यातून संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी राबविण्यात येत आहे. ‘ ह्या स्तुत्य उपक्रमाने आपण भारावून गेलो असल्याचे’ मत महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेच्या पुणे जिल्हा समन्व्यक मीनाताई गवारे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी मोठ्या संख्यने उपस्थित असलेल्या विद्यार्थी, महिला पालकवर्ग आणि शिक्षकवृंद यांच्या उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माईलस्टोन स्कुल च्या संचालिका आणि प्रिन्सिपल सौ.कांचन सोनवणे मॅडम यांनी केले. तर आभार संस्थेचे अध्यक्ष सुनिल ओस्तवाल व्यक्त केले.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com