साक्षीभावाचे टप्पे आणि अडचणी कोनत्या? : साक्षीभाव भाग- 2
साक्षीभावाचे टप्पे आणि अडचणी कोनत्या? : ‘साक्षीभाव’ ही एक सुलभ पण गहन आध्यात्मिक प्रक्रिया आहे, जी आत्मनिरीक्षणातून आत्मसाक्षात्काराकडे घेऊन जाते. या लेखात डॉ. नितीन पवार यांनी साक्षीभावाच्या चार प्रमुख टप्प्यांची व त्यातील अडचणींची सोपी व समजण्यासारखी मांडणी केली आहे. मानसिक अस्वस्थतेपासून अखंड साक्षीभावाकडे जाणारा हा प्रवास प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन घडवू शकतो. हा लेख नक्की वाचा आणि आपल्या साधनेतील दिशा शोधा.
साक्षीभावाचे टप्पे आणि अडचणी कोनत्या? : ‘साक्षीभाव’ ही एक सुलभ पण गहन आध्यात्मिक प्रक्रिया आहे, जी आत्मनिरीक्षणातून आत्मसाक्षात्काराकडे घेऊन जाते. या लेखात डॉ. नितीन पवार यांनी साक्षीभावाच्या चार प्रमुख टप्प्यांची व त्यातील अडचणींची सोपी व समजण्यासारखी मांडणी केली आहे. मानसिक अस्वस्थतेपासून अखंड साक्षीभावाकडे जाणारा हा प्रवास प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन घडवू शकतो. हा लेख नक्की वाचा आणि आपल्या साधनेतील दिशा शोधा.
साक्षीभावाचे टप्पे आणि अडचणी कोनत्या?
साक्षीभाव साधनेचे टप्पे पुढील प्रमाणे —
साक्षीभाव हा काही अचानक साध्य होत नाही. साक्षीभाव एका सुंदर प्रवासासारखा असतो. यात तुम्ही हळूहळू खोल जात स्वतःच्या मुळ अस्तित्वाशी एकरूप होता. पण याचे काही नैसर्गिक असे टप्पे असतात–
अस्वस्थतेची जाणीव होणे-
जेव्हा तुम्ही स्वतःला तटस्थपणे पाहायला सुरुवात करता, तेव्हा पहिलं काय जाणवतं माहित आहे?
” माझं मन खूपच गोंधळलेलं आहे.
विचार काही थांबतच नाहीत. भावना उफाळतातच आहेत. एक वेगळीच अस्वस्थता जाणवते आहे.
पहा ही सुरुवात आहे. ही अस्वस्थता म्हणजे पहिला टप्पा असतो. कारण तीच अस्वस्थता तुम्हाला पुढे नेणार असते.
साक्षीभावाचे टप्पे आणि अडचणी कोनत्या?: साक्षीभाव आत्मज्ञानाकडे जाण्याचा मार्ग -स्वामी विवेकानंद
अ मार्ल क्षणांची ‘साक्षी’भावना-
मग हळूहळू काही सेकंदांसाठी का होईना , तुम्ही स्वतःच्या विचारांपासून स्वतःला थोडं वेगळं करता ! असे जाणवते की
तुमचं मन विचार करतंय, पण त्या मनाला फक्त ‘पाहत’ आहात.’तटस्थ ‘ आहात.
अशी ही छोटी छोटी झलक मिळते.पण ती फार मौल्यवान असते.पुढच्या प्रवासासाठी !
असा अभ्यास वाढवला की,सराव वाढवला की काही मिनिटं किंवा तासभरही तुम्ही ‘साक्षीभावा’त राहू शकता.तुम्हाला भावना येतात, जातात ! पण तुम्ही त्या फक्त पाहत असता . प्रतिक्रिया मात्र देत नाही.
ही अवस्था असते ‘साक्षीभाव’ स्थिर होत आहे.याचा संकेत !
साक्षीभावाचे टप्पे आणि अडचणी कोनत्या?: साक्षीभाव म्हणजे शुद्ध अस्तित्व -ओशो रजनीश !अखंड ‘साक्षीभाव’ येवु शकतो ?
अगदी खाताना, बोलताना, चालताना सर्व काही करताना तुमचं केवळ ‘पाहणं’ थांबत नाही.
तुमचं पुर्ण आयुष्यच एक ध्यान बनुन जातं .
हा टप्पा मिळवणं कठीण वाटलं तरी शक्य मात्र आहे.
‘साक्षीभाव साधने’तील अडचणी कोणत्या?
हा साक्षीभाव शिकताना काही अडचणी जरुर येतात. त्या कोणत्या असतात ?
विचारांचा प्रवाह न थांबणे.
“तुमचे विचार बंद होत नाहीत!” ही सर्वात मोठी तक्रार असते खरी. पण लक्षात ठेवा, विचार आपण थांबवायचा नाहीये;त्या फंदात पडायचचं नाही.
फक्त त्यांना ‘पाहायचं’ असते.
तुमच्या भावना गडद होतात–
या प्रवासात कधी कधी जुन्या जखमा, दुःख, भीती वगैरे बाहेर येतात.पण
त्यांना दाबायचे नाही.
‘साक्षी’ राहून ‘तटस्थ’राहुन त्यांना संपूर्णपणे अनुभवू द्या शरीराला !
तेच उपचार बनणार आहेत .
कंटाळा व आळशीपणा–
“याचा काय उपयोग?” असंही तुम्हाला वाटायला लागतं.
ही फसवणूक आहे वाटतं ! तुमचं
मन कंटाळवणारं वाटतं!पण तेव्हाच तुम्ही प्रगती करता.
साक्षीभावाचे टप्पे आणि अडचणी कोनत्या?:साक्षीभाव म्हणजे स्वतःचे निरिक्षण:जे.कृष्णमुर्णी !
‘अहंकारा’चा धोका!
“मी फार मोठं साध्य केलं” असं वाटणंही घडतं. हा अहंकाराचाच प्रवेश असतो.पण
जिथे अहंकार येतो तिथे ‘साक्षीभाव’ नाहीसा होतो.हे लक्षात ठेवा.
म्हणून विनम्रता टिकवुन ठेवावी लागते .
‘साक्षीभाव’ टिकवण्यासाठीच्या टिप्स—
✅दररोज काही वेळ स्वतःशी ‘साक्षी संवाद’ ठेवा.
✅मन अस्थिर झालं तरी प्रयत्न सोडून देवु नका.
✅ छोट्या छोट्या यशांमध्ये समाधान मानून पुढे चालत रहा.
✅ स्वतःला दोष देऊ नका, फक्त ‘पाहा’.
निष्कर्ष काय निघतो?—
साक्षीभाव म्हणजे काही जादू नाही.
तर सततचा साधा व सातत्यपूर्ण असा सराव असतो.
जितके अधिक तुम्ही ‘पहाल’, तितके खोल तुम्ही स्वतःच्या अस्तित्वात विरघळत जाल !
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com