अट्रासिटी कायद्यानुसार शिरुर मधे पती व सासु विरुद्ध गुन्हा दाखल ! कारण काय आहे ते वाचा सविस्तर. ..
अट्रासिटी कायद्यानुसार शिरुर मधे पती व सासु विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमविवाह झालेल्या पिडीतेने आज शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.या कायद्यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकारी विभागीय पोलिस अधिकारी, शिरुर विभाग हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अट्रासिटी कायद्यानुसार शिरुर मधे पती व सासु विरुद्ध गुन्हा दाखल ! कारण काय आहे ते वाचा सविस्तर. ..
अट्रासिटी कायद्यानुसार प्रेमविवाह झालेल्या पिडीतेची आहे फिर्याद !
शिरुर,दिनांक 26 जुलै : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )
अट्रासिटी कायद्यानुसार शिरुर मधे पती व सासु विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमविवाह झालेल्या पिडीतेने आज शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.या कायद्यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकारी विभागीय पोलिस अधिकारी, शिरुर विभाग हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Dr.Nitin Pawar,Editor, Shirur.
‘संपादकिय टच’. …
अट्रासिटी कायदा काय आहे —–
“अट्रासिटी कायदा व त्याची कलमे यांबाबत मी काही इथे लिहीणार नाही.तो कोणी ? का? केला याबाबतही मी लिहिणार नाही.मी भारतीय माणसाची मानसिकता, तिची जडणघडण याविषयी काही मते मांडणार आहे.ते माझे व्यक्तीगत मत आहे. ते कोणी खोडून काढले तर ते मी मागे घ्यायला सदैव तयार असतो.
अनुसुचित जाती जमाती घटक आजही रस्यावर?
भारतीय माणुस भुतकाळात जगतो.म्हणजे काय तर त्याच्या जन्मापासुन परंपरेने चालत आलेल्या गोष्टी त्याच्यावर पक्का परिणाम करुन राहतात.आईच मुलाला शिकवते की त्यांच्याबरोबर राहू नकोस.ते अमुक लोक आहेत.ते घाणेरडे आहेत.खालच्या जातीचे आहेत.किंवा ते वरच्या जातीचे आहेत. ते अमुक खातात किंवा खात नाहीत. ते आपल्याला कमी लेखतात.त्यांनी आपल्या पुर्वजांनी खुप अन्याय अत्याचार केले आहेत.ते अमुक धर्माचे लोक आहेत.ते आपले दुश्मन आहेत.ते अस्वच्छ असतात.वगैरे वगैरे.
वयाच्या 8 वर्षांपर्यंत मुलाच्या मनात जे रुजले जाते त्यातील 70 ते 80 टक्के त्याच्या व्यक्तीमत्वाचा भाग बनतात ते आयुष्यभर! अशा पार्श्वभूमीवर व्यक्ती अनेक पुर्वग्रह बाळगुन त्याचे जिवन व वर्तन करत राहतो. शेजारी तसेच.नंतर शाळा तसेच.नंतर समाजही तेच ! म्हणुन भारतीय माणुस मोकळा वागताना कधी दिसत नाही. सारखे त्याला हे काय म्हणतील.ते काय म्हणतील. अशी काळजी असते.यांच्यापुढे कमीपणा घेणे नामुश्किचे असते.त्यांच्यापुढे आपण जास्त बोलु नये.आवाज चढवून बोलु नये.ते पहिल्यापासुन आपल्या वरचे आहेत.कित्येकांना त्यांनी असे केल्याने संपवले आहे.
जात,पोटजात,धर्म,भाषा,प्रांत,दक्षिण,उत्तर,भैया,आण्णा इ.वरिष्ठ कनिष्ठ असे सगळे ठासुन मनात सहज भरून ठेवले जाते. सामुहिक mass मानसशास्त्र हे देखील असते.त्यातही या गोष्टी ठासुन भरल्या जातात.अशा परिस्थितीत आपण लोकशाही आणली.आपण म्हणजे आपल्या हिताचा विचार करणारे नेते विशेषता स्वातंत्र चळवळीच्या काळात ! लोकशाही मुल्ये,तत्वे आणि पारंपारीक मुल्ये यांच्यात भरपुर विसंगती होती.बहुतेकांनी जिथे जे सोईस्कर आहे ते वापरले.
सामाजिक वर्तन व्यवहार होत असताना या परस्परविरोधी परिस्थितीचा परिणाम म्हणुन जास्त न्याय किंवा जास्त अन्याय घडुन जातो.त्यात समाजातले काही घटक बर्याच पिढ्यांपासून दडपले गेले.त्यामुळे त्यांचा विकास झाला नाही. विकास सर्व अंगांनी व्यापक असा मी येथे सांगत आहे. केवळ संपत्ती वाढणे असा नाही.
याच वैयक्तीक व सामाजिक मानसिकतेतुन सबळ सर्व बाबतीत असे असणारे लोक शोपणकर्ते बनले.काही पिडीत ठरले.कायदा आला.पण तो कागदावर राहिला.प्रत्यक्ष व्यवहारात मात्र पुर्वग्रह राहिले.ते मनात आहेत.पण तोंडातून बोलणे जरा कठीण झाले. मतदानाचा सार्वत्रिक हक्क हे एक याला महत्वाचे कारण ठरले.
मग 80 च्या दशकात इथल्या कनिष्ठ समजलेल्या जातींनी विशेष तरतुदी,राखीव जागा वगैरेचा लाभ मिळाल्याने लक्षणिय प्रगती केली.परंपरेने मोठे समजणार्या समुहांना हे त्यांच्या अहंकाराला धक्का देणारे ठरले.हे लोक अस्वस्थ झाले. त्यातुन जातीय संघर्षाच्या ठिणग्या उडु लागल्या.यात ज्यांची लोकसंखा जास्त आहे ते त्या लोकसंख्येचा ढाल व हत्यार म्हणून वापर करू लागले.
अनुसुचित जाती जमातींचे झोपडपट्यांमध्येच वास्तव्य जास्त?
यात इंग्रजांनी ज्या कनिष्ठ मानल्या गेलेल्या जाती व जमाती यांची सुची केली होती.हीच अनुसुचित जाती जमातींची सुची मुळ मानली जाते.यांनाच सामाजिक अन्यायाचे बळी म्हणून सामाजिक न्याय देण्याच्या हेतुने काही सवलती,आरक्षण,योजना, तरतुदी केल्या गेल्या होत्या. त्याचाच परिपाक म्हणून त्यांच्यावरील अत्याचारात वाढ झाली. थातुर मातुर कारणे दाखवली जायची.पण मनात जात हेच कारण असायचे.ते आजही बर्याच प्रमाणात आहे. तोंडात नाही पण मनात आहे.त्याआधारे होणारा पक्षपात,अडवणुक,आर्थिक नाकेबंदी करणे,कर्ज न मिळु देणे,व्यवसाय न चालु देणे,बदनामी करणे इ.पाठीमागुन वार केल्यासारखे केले जाते.समोर गोड बोलून, साहेब म्हणून,बरोबर आहे तुमचे असे म्हणुन.एकाने मारल्यासारखे करणे आणि दुसर्याने रडल्यासारखे करणे.अशा पद्धतीने.तर काहींनी आम्हाला हे समजलेच नाही.तुम्ही आता सांगताय.आधी सांगितले असते तर मी तसे नसते होवू दिले.
यात प्रत्येकाला त्याची जात माहिती नसण्याचे काही कारण नाही.ते काम बालवयातच झालेले असते.जातीची लोकसंखा कुणाची किती आहे.हेही माहिती असते.त्यातुन प्रत्यक्षात अनेक अन्याय, अत्याचार, विटंबना, बहिष्कार, हिंसा आणि सर्वात महत्वाचे स्थानिक लोकप्रतिनीधी सरपंच,आमदार, खासदार, ग्रहमंत्री, मुख्यमंत्र्यांपर्यंत व्यक्तींचा आशिर्वाद किंवा विरोध हाही महत्वाचा भाग ठरला ! मग रान मोकळे झाले. ठिणगी मराठवाडय़ात पडली.देशभर अशी परिस्थिती होतीच.त्यातल्या त्यात महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे म्हणे.मग याचा विचार होवून एक प्रतिबंध करणारे धोरण म्हणुन अधिक कडक कायदा देशात प्रथम महाराष्ट्रात झाला.तोच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणून आज अस्तित्वात आहे. ती प्रवृत्ती सर्व क्षेत्र व्यापलेली होती.म्हणुन मग प्रत्येक क्षेत्रात हा कायदा चांगला प्रभावी ठरला आहे.अनेक संभाव्य अत्याचार यामुळे रोखले जातात.हे खरे आहे. त्याचा गैरवापर झाला,ब्लैकमेलिंग करण्यासाठी केला जातो.असे आक्षेप घेतले जातात.पण त्यात फार कमी तथ्य आहे. एखादे असे उदाहरण नाही की अनुसुचित जाती जमातींच्या व्यक्तीने या कायदाचा उपयोग करून सवर्ण जातीतील व्यक्तीवर किंवा समुहावर भयान अत्याचार केले.अगदी माणुसकीला काळीमा फासणारे.बचाव करण्यासाठी जरुर केला.पण आक्रमण करण्यासाठी केला नाही करुही शकत नाही. कारण जातींची लोकसंखा जी ढाल व हत्यार म्हणून काम करणारी आहे.
अट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल का ?
फिर्यादीत नमुद केल्यानुसार हकिगत अशी की मार्च 2024 ते ता. 21/07/2024 रोजी सांयकाळी 19:00 वाजण्याच्या सुमारास शिरूर गावच्या हददीत सिध्दार्थनगर येथे फिर्यादीच्या
राहत्या घरी त्यांचे पती 1) आकाश प्रकाश शेजवळ,
सासु 2) चंदा प्रकाश शेजवळ
दोन्ही राहणार सिध्दार्थनगर, शिरूर, तालुका – शिरूर ,जिल्हा- पुणे यांनी सतत ‘तुला जेवण नीट बनवता येत नाही. तु जुन्या भाजीबाजार, शिरूर येथे असलेल्या घरी थांबत नाहीस‘ या कारणावरून सतत फिर्यादीस मारहाण करणे, उपाशी ठेवणे, घराबाहेर काढणे, टोमणे मारणे व जातीवाचक शिवीगाळ करून क्रूरपणाची वागणुक देउन जाचहाट केला आहे.’अट्रासिटी‘
म्हणुन फिर्यादी सौ. साक्षी संतोष गायकवाड उर्फ साक्षी आकाश शेजवळ, वय- 21 वर्षे ,व्यवसाय- घरकाम, सध्या राहणार – सिध्दार्थनगर, शिरूर, तालुका – शिरूर, जिल्हा- पुणे मुळ राहणार,हिंगणी दुमाला, तालुका- श्रीगोंदा ,जिल्हा- अहमदनगर
यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शिरूर पोलीस स्टेशनला गु.र.नं 654/2024 भारतीय न्याय संहीता कायदा कलम 85, 352, 351 (2) (3), अ.जा व अ. ज अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1) (R)(s) प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
तसेच प्रेम विवाह असल्याने फिर्यादी व आरोपींची जात वेगळी आहे.
दाखल अंमलदार पोलिस सब इन्पेक्टर श्री. उगले हे आहेत.तर पुढील तपास अधिकारी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर विभाग, शिरूर व प्रभारी अधिकारी श्री. जोतीराम गुंजवटे हे करत आहेत.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com