
Contents
- 1 शिरुर तालुक्यात, “तुझा मुलगा जरी वकील असला तरी माझा जावई आत्ताच ‘मर्डर’ च्या गुन्हयामधुन जेलमधुन बाहेर आला आहे.” असे वक्तृव्य ! काय प्रकरण आहे ते वाचा !
- 1.1 शिरुर पोलिस स्टेशनला अट्रासिटी कायद्यानुसार 6 जणांवर गुन्हा दाखल?
शिरुर तालुक्यात, “तुझा मुलगा जरी वकील असला तरी माझा जावई आत्ताच ‘मर्डर’ च्या गुन्हयामधुन जेलमधुन बाहेर आला आहे.” असे वक्तृव्य ! काय प्रकरण आहे ते वाचा !
शिरुर पोलिस स्टेशनला अट्रासिटी कायद्यानुसार 6 जणांवर गुन्हा दाखल?
शिरुर,दि.21 नोव्हेंबर: ( ‘सत्यशोधक रिपोर्ट ‘)
शिरुर तालुक्यात, “तुझा मुलगा जरी वकील असला तरी माझा जावई आत्ताच ‘मर्डर’ च्या गुन्हयामधुन जेलमधुन बाहेर आला आहे.” असे वक्तृव्य करण्यात आले आहे. हे काय प्रकरण आहे ते वाचा सविस्तार !
शिरुर पोलिस स्टेशनला अट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल….

या प्रकरणात शिरुर पोलिस स्टेशनला अट्रासिटी कायद्यानुसार 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कायद्यानुसार गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलिस प्रशासन स्थानिक दबावाला बळी पडु शकते (?) .असे गृहित धरले जाते.म्हणुन अशी प्रकरणे वरिष्ठ पोलिस अधिकारी हाताळत असतात.ह्या कायद्यानुसार असे प्रकार गंभीर स्वरुपाचा गुन्हा मानला जातो.’शिरुर‘
शिरुर तालुक्यातील निमोणे येथील घटना. ….
शिरुर पोलिस स्टेशनमधे गुन्हा दाखल केल्यानुसार हकीगत अशी की दिनांक 18/10/2024 रोजी 16:30 वाजण्याच्या सुमारास निमोणे, तालुका-शिरूर, जिल्हा-पुणे गावच्या हद्दीत किशोर बाबुराव पतके, पुजा किशोर पतके, सानिका किशोर पतके, सविता जगदाळे, सविता संजय कदम, लिलाबाई रावसाहेब मोतीमोड यांनी फिर्यादी देविदास राधुजी पोटे, वय -56 वर्ष, धंदा – शेती, जात- हिंदु चांभार राहणार- निमोणे तालुका- शिरूर, जिल्हा-पुणे यांच्या राहत्या घरामध्ये प्रवेश केला.
चारचाकी गाडी लावण्यावरुन झाला वाद….
नंतर त्यापैकी किशोर पतके हा फिर्यादीला म्हणाला की , ‘ ये चांभारडया, तुझ्या मुलाला समजावुन सांग, घराचे शेजारील मोकळ्या जागेमध्ये चारचाकी गाडी लावायची नाही ! नाहीतर तुला सोडणार नाही. तुझा मुलगा जरी वकील असला तरी माझा जावई आत्ताच ‘मर्डर’ च्या गुन्हयामधुन जेलमधुन बाहेर आला आहे. परत गाडी इथे लावलेली दिसली तर तुझ्या मुलाला संपवायला वेळ लागणार नाही.’ त्यावेळी देवीदास हे किशोर याला म्हणाले की ,’ माझ्या घराच्या शेजारील मोकळी जागा ही माझा भाउ राजु विष्णु पोटे याची असुन मी त्या जागेमध्येच गाडी लावतोय. तुझ्या जागेमध्ये गाडी लावीत नाही.’ असे म्हटल्यामुळे त्यांना राग आला.
जीवे मारण्याची धमकीही. …

नंतर वरील सर्वांनी मिळून देवीदास पोटे तसेच त्यांच्या घरातील सर्वांना जातीवाचक शिवीगाळ केली. जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यावेळी त्याच्या सोबत असलेल्या सविता जगदाळे ह्या मला म्हणाल्या की, ‘ ये चांभारा ! तुझा मुलगा माझे विरूद्ध पोलीस स्टेशनला मी दारू विक्री करीत असले बाबत सारख्या तक्रारी देत आहे. तुझा मुलगा लय मोठा वकील झाला आहे काय? त्याला समजावून सांग ! नाहीतर तुमच्यावर आम्ही पण खोटे गुन्हे दाखल करून तुम्हाला कामाला लावु’.असे म्हणुन वरील सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवुन देवीदास पोटे यांना जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
म्हणुन फिर्यादी फिर्यादी देविदास राधुजी पोटे, वय -56 वर्ष, धंदा – शेती, जात- हिंदु चांभार राहणार- निमोणे तालुका- शिरूर यांनी
1) किशोर बाबुराव पतके
2) पुजा किशोर पतके
3) सानिका किशोर पतके
4) सविता जगदाळे
5) सविता संजय कदम
6) लिलाबाई रावसाहेब मोतीमोड ,सर्व राहणार, निमोणे, तालुका – शिरूर, जिल्हा- पुणे
अट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल. …
याआरोपींवर शिरूर पोलिस स्टेशनला 855/2024 बी .एन. एस. कलम 333,352,351 (2)(3),189 (2) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 चे सुधारणा 2015 चे कलम 3(2)(v)(a) प्रमाणे अट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कायदेशिर तक्रार शिरुर पोलिस स्टेशनला केली आहे. दाखल अंमलदार पोलिस सब इन्पेक्टर,श्री.चव्हाण हे आहेत. तपासी अंमलदार उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग, शिरूर हे आहेत.
प्रभारी अधिकारी पोलिस निरिक्षक केंजळे , शिरूर पोलीस स्टेशन हे आहेत.गुन्ह्याचा तपास चालु आहे.