
Contents
- 1 Babasaheb Ambedkar : ‘मोक्याच्या आणि मार्याच्या’ जागा कोणत्या व का ? : भाग : 2
Babasaheb Ambedkar : ‘मोक्याच्या आणि मार्याच्या’ जागा कोणत्या व का ? : भाग : 2
Babasaheb Ambedkar Sandesh
” Babasaheb Ambedkar : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना दिलेल्या प्रमुख संदेशांपैकी एका ,” मार्याच्या आणि मोक्याच्या जागा हस्तगत करा” या संदेशाचा एक अर्थ लावण्याचा आपण प्रयत्न करत होतो. तर हा 140 कोटी लोकांचा भारत , India चालतो हे खरे आहे. कसाही चालो. चालवला जातो आहे. हा एक चमत्कारच !”
कांशीराम यांचे मिशन—
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर 70/80 च्या दशकात बहुजन समाज पक्ष त्यावेळचे एक मिशनरी नेते कांशीराम यांनी स्थापन केला. लाट आणली. कु.मायावती या स्वत:च्या (Ambedkarite) आंदोलन व चळवळीतुन आलेल्या पहिल्या दलित (Scheduled Castes) महिला या उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदी आल्या. आजचा ‘मुख्यमंत्री’ म्हणजे पुर्वीचा ‘राजा’. ‘दलित’ म्हणजे जणु ‘गुलामच’ राजा झाला. या सरकारवर कुणा अंतर्गत किंवा बाह्यदेशातुन रिमोट कंट्रोल वगैरे नव्हता.Pure सरकार होते.कांशीराम यांना काही pocket संघटना,पक्ष किंवा नेता बनवता येणे कुणाला शक्य नव्हते. अस्सल,पहिल्या धारेतला नेता ,होते !
राजकिय सत्ता : मास्टर की—
कांशीराम यांनी आक्रमक आणि 85℅ समाज , ‘बहुजन समाज’, हे गणित मांडून हे साध्य केले .पक्ष संस्थापक म्हणजे आधी मी लिहीले त्याप्रमाणे ब्राम्हणी ‘गुरुडम’ (Gurudum जो आज विश्वगुरु बनू पहातो ) सारखेच ते बनले ! इतरांना ओबीसी,मुस्लिम, ब्राम्हणांना निवडुन आणले. काही सतिश मिश्रांसारखे ब्राम्हणही खासदार वगैरे केले .’मागणारे’ हात,’हे देणारे’ हात कांशीराम यांनी करुन दाखवले. ‘राजकिय सत्ता’. सर्व कुलुपांची एकच चावी ! ‘मास्टर की’! ही एक अशीच ‘मार्याची आणि मोक्याची’ जागा आहे. बरेच सांस्कृतिक बदल करण्याचा प्रयत्न कांशीराम यांनी केला.कारण सांस्कृतीक व्यवस्था हजार दोन हजार वर्षेही टिकते.जशी ब्राम्हणी छावणीने केलेली सांस्कृतीक व्यवस्था गेली अडीच हजार वर्षे टिकून आहे. हे कांशिराम यांनी बाबासाहेबांच्या बुद्ध धम्मामधे शोधले होते. उत्तर प्रदेश बुद्धमय, आंबेडकरमय करण्याचा प्रयत्न केला. वर्ण आणि जातींच्या उतरंडीच्या भारतीय समाज व्यवस्थेला उतरंडीत सर्वात खाली असलेला भाग सर्वात वर आणता येवू शकतो. हे सप्रमाण सिद्ध झाले.याचा पाया डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांचा विचार हाच होता.
मार्याच्या आणि मोक्याच्या जागा—
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ,’ मार्याची आणि मोक्याची ठिकाणे हस्तगत करा ” हा एक संदेश प्रत्यक्षात येवू शकतो हे सिद्ध झाले. इथे ‘मार्याचे आणि मोक्याचे’ ठिकाण आहेत ,’राजकिय सत्ता आहे. पुढे काय नेमके झाले ते मायावती आणि सीबीआयलाच माहिती ? केंद्रीय सत्तेने ‘मार्याचे आणि मोक्याचे ठिकाण’ असलेली एक महत्वाची आणि सशक्त, अधिकारी संस्था सीबीआय ही वापरली. ही एक अशीच ‘मार्याची आणि मोक्याची’ जागा ब्राम्हणी व तत्सम छावणीने वापरली ! पुढे ईव्हीएम ही आधुनिक मतदान पद्धती आणली गेली. प्रस्थापित व्यवस्था नवीन तंत्रज्ञान व संशोधन संस्था यांना भरपुर निधी उपलब्ध करुन देत असते. तरुण बुद्धीमान युवकांना संशोधनास लावते. त्यांना भरपुर मोबदला देवून त्याच्याकडून संशोधन व तंत्रज्ञान निर्माण करुन घेत असते. नंतर तेच संशोधन व तंत्रज्ञान हे आणखीन एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांत ,”मार्याची आणि मोक्याची’ जागा आहे हे लक्षात च्या ! नंतर ईव्हिएम हे एक आलेच त्यात !
कोनत्या आहेत त्या जागा?—
नंतर ‘डेटा सायन्स’ चा उपयोग आला. प्रत्येक व्यक्तीची सर्व माहिती ‘इस्रायल’ या देशातील संशोधकाकडे आली.संशोधन हाच या देशाचा प्रमुख व्यवसाय आहे.जगातील सर्व अत्याधुनिक संशोधन या देशात होते. तो ते निर्यात करतो. प्रथम ‘मानवी बॉम्ब’ चे तंत्रज्ञान यानेच निर्माण केले होते म्हणतात. ते एल टी टी ई ला विकले. त्यात राजीव गांधी यांचा बळी गेला. या देशाने जो भारताच्या महाराष्टातील तीन चार जिल्ह्यांइतकाच आकारमानाचा देश आहे. पण भारताच्या प्रत्येक युद्धात याने भारताला मदत केली आहे. असा आरोप भारताची शत्रुराष्टे भारत सरकारवर करत असतात. म्हणजे आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘मार्याच्या व मोक्याच्या जागां’ मधे इस्राइल देखील समाविष्ट करायचा की काय? असा प्रश्न देखील एवढ्या मोठ्या आपल्या देशाला लाजिरवाणा असा प्रश्न आहे !
मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात ‘इस्राएल’ हा देश निर्मितीच्या अशा अवस्थेत होता “झायोनिझम” या जगभरातील यहुदी लोकांच्या चळवळीच्या प्रक्रीयेत होता. पण आताच्या परिस्थितीस भक्कम व विश्वासु मित्रदेश हा देखील एक ‘मोक्याची आणि मार्याची’ जागा ठरु शकते. आहेच. हे ब्राम्हणी छावणीतील आताच्या मोदी सरकारने मोठ्या कौशल्याने हाताळत कायमची डोकेदुखी असलेल्या पाकिस्तानला भिकारी आणि कंगाल करुन टाकले. तो देश आज किमान एक आठवडा तरी भारताशी युद्ध झाले तर लढू शकेल की नाही अशा परिस्थितीत मोदी सरकारने नेउन ठेवला आहे. याबाबत मोदी सरकारचे अभिनंदन करणे आवश्यक आहेच. कारण शत्रुला कधीच प्रबळ होउ न देणे आवश्यक असतेच. चीनवरही बराच अंकुश ठेवण्यात मोदी सरकारने यश मिळवले आहे.
ईडी,ईव्हीएम वगैरे वगैरे? —–
विस्तारभयास्तव मी सद्यस्थितीतील ‘ईडी’ या मार्याच्या आणि मोक्याचा जागेकडे येतो . ही अशीच एक प्रमुख आर्थिक बाबींवर नियत्रंण ठेवण्यासाठी आपल्याला आवश्यक अशीच संस्था आहे. अर्थात ती मार्याच्यासाठी आणि मोक्याच्यासाठी विद्यमान सरकारने कठोरपणे वापरली.तिचा प्रयोग राजकिय विरोधकांना निष्प्रभ करण्यासाठी वापरणे कितपत योग्य ते आता आलेल्या निवडकीत जनताच ठरवेल किंवा ते गैर नाही असा कौल सुद्धा देईल की काय असे दिसते. (ईव्हीएम?)
एकंदरीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचित केलेल्या ‘मोक्याच्या आणि ‘मार्याच्या” जागा हस्तगत करण्याचा आणि व्यवस्था परिवर्तनाचा ध्यास असणार्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व जातीय व धर्मिय अनुयायांसमोर एक मोठे आव्हान आहे.
आणखीन ‘मार्याच्या व मोक्याच्या जागा’ आहेत. बन्किंग प्रणाली, आय.बी., इस्रो,संशोधन संस्था, अणु केंद्र , लष्करप्रमुख, निवडणुक आयोग, सर्वोच्च न्यायालय, राज्यपाल, कलेक्टर, राष्ट्रपती,तहसिलदार, पोलिस निरीक्षक, बॉलिवुड,क्रिकेटर इ.आहेत.
प्रत्येक क्षेत्रातील ‘क्लास वन’ च्या जागा—-
म्हणजे एकंदरीत सर्व श्रेत्रातील वरिष्ट अधिकार व अधिकारी निर्माण करत, प्रतिभा निर्माण करणे आवश्यक असते.तेव्हा मार्याच्या व मोक्याच्या जागा’ हाती येत असतात. नाही तर फक्त ,’मुलनिवासी'(?) निर्माण होतात. सर्व पैसा तिथे गेला तर अन्यत्र माणसे , मुले, मुली, तरुण,तरुणी कशी घडवणार ? फंडींग व्यर्थ जात आहे. तेवढ्यामधे भाजपा,काँग्रेस प्रमाणे पैशाचा वापर करुन 4/5 आमदार निवडुन येतील. प्रतिष्ठा वाढेल.वाढलेल्या प्रतिष्ठेमुळे आणखीन आमदार निवडुन येतील.पण इच्छा नाही. इच्छा पैशाची आहे. आज अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर ब्राम्हणी छावणीला पुर्ण नियंत्रण मिळवता आले आहे.
शेवटी एक गोष्ट नमुद करुन थांबतो की या ‘जागा’ ब्राम्हणी छावणीने आज हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. त्यांवर आपली पकड भक्कम करण्याचा प्रयत्न ब्राम्हणी छावणीचा राहणार हे ही नक्की !13 शे वर्षांनतर हे घडले आहे. (?) त्यास आंबेडकरी छावणीला व पुरोगामी घटकांना उत्तर द्यावे लागेल !
🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना•••••
1. https://www.ambedkar.org
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर माहितीचा खजिना)
2. https://bspindia.org
(बहुजन समाज पक्षाच्या अधिकृत वेबसाइट)
3.https://en.wikipedia.org/wiki/Kanshi_Ram
(कांशीराम यांच्या जीवन व कार्यावर आधारित माहिती)
4. https://www.prsindia.org/
(भारतीय कायदे, सत्ताधारी संस्था व संसद कामकाजावर माहिती)
5. https://vikaspedia.in/
(शासनाच्या विविध योजनेची माहिती)
6.https://www.drambedkarbooks.com
(आंबेडकरवादी साहित्य व पुस्तके ऑनलाईन)
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करून–
Babasaheb Ambedkar : ‘मोक्याच्या आणि मार्याच्या’ जागा कोनत्या व का ? : भाग : 1
(समाप्त)