
Contents
शिरुर मधील बाबुरावनगर मधुन तीन लाखांची मारुती सुझुकी चोरीला गेली तर न्हावर्यात जबर घरफोडी !
शिरुर तालुक्यात दोन चोरीच्या गुन्ह्यांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल!
शिरुर,दि.1ऑगस्ट : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )

शिरुर मधील बाबुरावनगर मधुन तीन लाखांची मारुती सुझुकी कंपनीची कार चोरीला गेली आहे .तर शिरुर तालुक्यातीलच न्हावर्यात जबर घरफोडी करण्यात आली आहे. दोन्ही गुन्ह्यांची नोंद शिरुर पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलिस निरीक्षक श्री.ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.

मात्र या चोरीच्या घटना वाढतच जात आहे. ही चिंतेची बाब आहे. अशी शिरुर शहर व शिरुर तालुक्यातील नागरिकांची भावना झाली आहे. हे चोरटे लवकर पकडले जावेत. तसेच अशा घटनांना प्रतिबंध करण्याची अपेक्षा नागरिकांमधुन व्यक्त होत आहे.
शिरुर मधील बाबुरावनगर मधुन मारुती सुझुकीची चोरी….
पहिल्या फिर्यादीत नमुद केल्यानुसार
हकिगत अशी की फिर्यादी श्री.आकाश अशोक ढवळे, वय-25 वर्षे, व्यवसायीक, राहणार- बाबुराव नगर, शिरूर तालुका-शिरूर,जिल्हा- पुणे यांच्या घरी चोरी झाली आहे. चक्क त्यांची मारुती सुझुकी कार चोरीला गेली आहे.
चोरीला गेलेला माल–
1) 3,00,000/– रूपये किंमतीची मारूती सुझुकी कंपनीची पांढर्या रंगाची मॉडेल नं. TOUR SSTD CNG असा असलेली गाडी नं. MH12TH1226 असा आहे. तर गाडीचा चॅसी.नंबर .MA3EJKD1S00C6637 इंजीन नंबर. K12MN2404250 असा आहे.जु.वा.कि.अं.अशी या चोरीला गेलेल्या कारची माहिती पोलिस सुत्रांकडून उपलब्ध होत आहे.
वरील वर्णनाची मारूती सुझुकी कंपनीची पांढर्या रंगाची मॉडेल नंबर . TOUR S STD CNG असा असलेली गाडी नंबर . MH12TH1226 ही दिनांक 30/07/2024 रोजी 00:45 वाजण्याच्या ते दिनांक 30/07/2024 रोजी साधारण 12:30 वाजण्याच्या दरम्यान चोरीला गेली. ओम हाईट्स बिल्डींगच्या समोर बाबुराव नगर ,शिरूर ते न्हावरा फाटा रोडच्या बाजुला वरील चारचाकी गाडी पार्क केली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी आकाश ढवळे यांची तीन लाख रुपये किंमतीची ही मारुती सुझुकी कार चोरून नेली आहे.
शिरुर शहरातील नव्याने विकसित होत असलेला हा भाग गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत येवु लागला आहे.संवेदनशिल बनत चालला आहे. इथे घडणार्या गुन्हेगारी घटना या विविध अशा सर्व प्रकारातील आहेत हे विशेष.काही दिवसांपूर्वी येथे बेकायदेशीर वेश्या व्यवसाय चालवणारी व्यक्ती पोलिसांना सापडली होती.मोबाईल चोरी,बेकायदा दारु विक्री,गुटका विक्री,शस्त्रे बेकायदा सापडणे,स्वतःचे जीवन संपवणे,गळफास लावून घेणे इ.सर्व प्रकारचे गुन्हे या भागातुन शिरुर पोलिस स्टेशनला दाखल होत असताना दिसुन येत आहेत. येथील नागरिक व लोकप्रतिनीधी यांनी व शिरुर पोलिस स्टेशनने याबाबत त्वरित पावले उचलणे अपेक्षित आहे.
शिरुर पोलिसांकडून तपास सुरू. …
फिर्यादी- आकाश ढवळे यांनी याची फिर्याद दिली असली तरी रात्री व दिवसा येथे सी सी टी व्ही, सुरक्षा रक्षक यांची स्थिती सुधारणे आवश्यक आहे. नागरिकांनी स्वतः सावधानता बाळगणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.
अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशन गु र नंबर 663/2024 भारतीय न्याय संहिता कायदा कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक श्री. जगताप हे करत आहेत.तर दाखल अंमलदार पोलिस नाईक श्री. खेडकर आहेत. प्रभारी अधिकारी श्री. ज्योतीराम गुंजवटे ,पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास केला जात आहे.
शिरुर तालुक्यातील न्हावरा येथे घरफोडी. ….

तर दुसर्या घटनेत फिर्यादीत नमुद केल्यानुसार हकिगत अशी की फिर्यादी- सुभाष रामदास बिडगर, वय -36 वर्षे, व्यवसाय- शेती, राहणार- बिडगर वस्ती, न्हावरा, तालुका- शिरूर ,जिल्हा- पुणे यांची रोख रक्कम व सोन्याच्या बाळया दिनांक 31/07/2024 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या ते 13:50 वाजण्याच्या सुमारास बिडगर वस्ती ,न्हावरा, तालुका-शिरूर, जिल्हा- पुणे येथील फिर्यादीच्या राहत्या घराचा कोयंडा कशानेतरी तोडून कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्या वाटेने आतमध्ये प्रवेश करून घरफोडी करून चोरी केली आहे.

चोरीला गेलेल्या मालाचे वर्णन –
1) 55000/- रुपये रोख रक्कम ; त्यातील 500 रूपयाच्या दराच्या 110 नोटा, (नोटांचे नंबर माहित नाहीत)
2) 4000/- रुपये रोख रक्कम ; त्यातील 20 रूपये दराच्या 200 नोटा (नोटाचे नंबर माहित नाहीत)
3) 7000 /- रूपये किमतीचे 03 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळया जु.वा.कि. अं.यांची
एकुण किंमत 66000/-रुपये आहे.
अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशनला गु. र. नं. 668/2024 यात नोंद दाखल झाली आहे. तर भारतीय न्याय संहिता कलम 331(3),305(a) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल अंमदार पोलिस नाईक श्री. शिंदे हे आहेत.पुढील तपास अंमलदार सहायक फौजदार जी. एस.चव्हाण हे करत आहेत. प्रभारी अधिकारी श्री. ज्योतीराम गुंजवटे, पोलिस निरिक्षक, शिरूर पोलीस स्टेशन, शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास केला जात आहे.