
Bal Varkari Dindi :’विठ्ठल नामाची शाळा भरली !’- माईलस्टोन स्कूल, कारेगाव येथे पारंपरिक अभंगाच्या गजरात रंगला बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा!
Bal Varkari Dindi Milestone School Karegaon
दिनांक 5 जुलै 2025 | प्रतिनीधी |
Bal Varkari Dindi : कारेगाव (ता. शिरूर) येथील माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडी सोहळा पार पडला. संत वेशभूषा, टाळ मृदुंग, पालखी आणि हरिनामाचा गजर यामुळे शाळा भक्तीमय वातावरणाने भरली होती.

महाराष्ट्राच्या संत परंपरेचे जतन करत कारेगाव येथील माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूल मध्ये भरवलेल्या ‘बालदिंडी सोहळ्या’ ने एक आगळीवेगळी भक्तिपर परंपरा विद्यार्थ्यांच्या मनात रुजवली.
आषाढी एकादशीनिमित्त आयोजित केलेल्या या दिंडीत शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत, टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनाम घेत दिंडी काढली. शाळेपासून श्री दत्त मंदिरापर्यंत पारंपरिक मार्गाने पायी दिंडी काढण्यात आली. या दिंडीत मुला-मुलींनी संत वेशभूषेत सहभाग घेतला तर महिला पालक आणि शिक्षिकांनी फुगडीचा आनंद लुटला.
“विठ्ठल नामाची शाळा भरली… शाळा शिकताना तहानभूक हरली…” असे शब्द व्यक्त करत शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अमोल कोहकडे सर यांनी आपल्या भावना मांडल्या.
कार्यक्रमात दीपप्रज्वलन, संत प्रतिमांना पुष्पहार अर्पण, विठ्ठल-रुक्मिणी आरती आदी विधी पार पडले.
माईलस्टोन अक्षरवारी 2025 या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमात सौ. मीनाताई गवारे (महाराष्ट्र पोलीस मित्र संघटना), अध्यक्ष सुनील शेठ ओस्तवाल, संस्थापक संचालक राजाराम पाटील सोनवणे, प्राचार्य कांचन सोनवणे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बाल वारकऱ्यांना केळी वाटप करण्यात आले. संत प्रतिमा आणि पालखी साठी पुष्पहार श्री गोविंद ढगे यांच्या सौजन्याने देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिन्सिपल कांचन मॅडम यांनी केले तर आभारप्रदर्शन अध्यक्ष सुनील ओस्तवाल यांनी केले.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना ••••
🔗
1.https://www.pandharpur.gov.in – पंढरपूर जिल्हा अधिकृत वेबसाइट
2.https://en.wikipedia.org/wiki/Warkari – वारकरी संप्रदायाची माहिती
3.https://maharashtratourism.gov.in – महाराष्ट्र पर्यटन विभाग
4. https://esakal.com – वारकरी संदर्भातील बातम्या