
Contents
बलात्कार करणार्याला 20 वर्ष सश्रम कारावास आणि 50 हजार रुपयांचा दंड !
बलात्कार घडला होता रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेञात !
शिरुर,दिनांक- 17 डिसेंबर : (प्रकाश करडे यांच्याकडुन)
बलात्कार करणार्याला 20 वर्ष सश्रम कारावास आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा बलात्कार घडला होता रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेञात ! सविस्तर माहिती पुढे वाचा. .
‘ सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करा !
प्रिय वाचक,व्यावसायीक बंधुंनो,
‘सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करून हजारो वाचकांपर्यंत/ग्राहकांपर्यंत पोहोचा. आमच्या खास जाहिरात पर्यायांद्वारे तुमच्या ‘ब्रँड’ची लोकप्रियता वाढवा आणि तुमच्या ग्राहकांचा ओघ तुमच्यापर्यंत वाढवा.
——-
अधिक माहितीसाठी satyashodhak.blog ला भेट द्या किंवा आम्हाला 7776033958/9529913559 वर संपर्क करा.
—–
आपला,
डा.नितीन पवार,संपादक,
सत्यशोधक न्युज,
satyashodhak.blog——
रांजणगाव एम आय डी सी त घटना?

रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 326/20 भारतीय दंड विधान कलम कायदा 363, 376 (2) ( N) 506 पोस्को 4, 8 ,12 ,ॲट्रॉसिटी अन्वये दिनांक 12 /10/ 2020 रोजी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.’बलात्कार‘
सदर गुन्ह्यातील आरोपी महेश श्रीहरी लटपटे,वय- 24 वर्ष, मूळ- राहणार ,वडगावलाडे , तालुका- केज,जिल्हा- बीड याच्याविरुद्ध गुन्ह्याचे तपास अधिकारी श्री. राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग तत्कालीन यांनी अभ्यास करून माननीय विशेष न्यायालय जिल्हा व सत्र न्यायालय शिवाजीनगर ,पुणे कोर्टात पुराव्यासह दोषारोपपत्र दाखल केले होते.
“महाराष्टातील सर्व जिल्हे व तालुक्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत.इच्छुकांनी आपले आपले अर्ज np197512@gmail.com /7776033958(What’s App number यावर पाठवावेत.- संपादक”
सदर केसची सुनावणी चालू असताना आरोपीने जामीनासाठी माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांच्या कोर्टात अर्ज दाखल केला असता कोर्टाने सदरचा अर्ज केल्याने आरोपीने जामीनासाठी माननीय सुप्रीम कोर्ट, दिल्ली येथे अर्ज दाखल केला होता.
शिरुर पोलिसांची कामगिरी. …
श्री प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर विभाग यांनी त्याबाबत प्रतिज्ञापत्र व सर्व सादर करून वेळोवेळी सदर केस मध्ये पाठपुरावा केला. सदर आरोपीचा जामीन अर्ज रद्द झाला होता. तसेच सदर केसच्या केसची सुनावणी दरम्यान गुन्ह्यातील साक्षीदार यांना पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे यांनी वेळेत कोर्टात हजर ठेवून पाठपुरावा केला होता.
सत्र न्यायालय पुणे यांचा निकाल…
साक्षी पुराव्याच्या आधारे माननीय श्री.एस. आर. नरवडे, सत्र न्यायालय, पुणे यांनी दिनांक 17 /12/ 2024 रोजी आरोपी महेश श्रीहरी लटपटे, वय- 24 वर्ष ,मूळ राहणार – लाडेवडगाव, तालुका- केज, जिल्हा- बीड याला 20 वर्ष सश्रम कारावासाची व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सदर केसमध्ये सरकारी वकील एडवोकेट श्रीमती भारती कदम मॅडम, केस अधिकारी श्री. महादेव वाघमोडे, पोलीस निरीक्षक कोर्ट पैरवी अंमलदार पोलीस हवालदार आप्पासाहेब सूर्यवंशी, पुणे सेशन कोर्ट पैरवी अधिकारी श्री. विद्याधर निश्चित, पोलीस उपनिरीक्षक, जिल्हा कोर्ट भैरवी अधिकारी संतोष घोळवे ,पोलीस निरीक्षक यांनी या केस मध्ये काम पाहिले.
महत्वपुर्ण घटना. ..
बलात्कार घडणे ही गंभीर घटना आहे.न्यायालयात गुन्हा सिद्ध होणे ही देखील महत्वपुर्ण घटना आहे. असा हा एखादा प्रकार आहे असे नाही. कित्येक कारणे व मजबुरी यांमुळे कित्येक बलात्कारांच्या घटना पोलिसांपर्यंत,न्यायालयापर्यंत पोहोचतही नाहीत.परंतु अल्पवयीन मुली किंवा महिला या अनिच्छेने पुरुषी वर्चस्ववादी व्यवस्था असलेल्या या समाजात दडपून टाकल्या जात असतात.लोकांच्या संकुचित विचारांमुळे पुष्कळदा अशा घटनांकडे समाज लक्ष देखील देत नाही. मिडिया मधुन मोठा गाजावाजा झाला तरच लक्ष देतो.आणि मिडिया देखील गरीबांच्या बाबतीतील घटनांकडे गांभिर्याने पहात नाही.
बलात्कार एक विकृती. …

बलात्कार ही एक भयंकर विकृती आहेच.पण एका स्रीचे पुर्ण आयुष्य बरबाद करते.पिडीत मुलगी किंवा महिला आयुष्यभर भय,अपमान,लज्जा,टोमणे सहन करत जीवन जगते.तर काहींचे जीवन संपविले जाते.काही स्वत: आपले जीवन संपवतात.लोकशाही,समानता वगैरेंचा ढोल राजकारणी सतत वाजवत असतात.पण ग्राउण्ड लेवलला लक्ष देत नाहीत. त्यात शिक्षणाचे विशेषत: उच्च शिक्षणाचे प्रमाण एकुण लोकसंख्येच्या प्रमाणात कितीतरी कमी आहे.शिक्षण फक्त एक सरकारी नोकरी मिळण्यासाठी असते असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे.शिक्षण हे माणसाला सुसंसत बनवण्यासाठी असते.
संस्कार समाजातुन गायब झाले !
संस्कार हा जीवनात अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. घरातील,आजुबाजूचे वातावरण,सध्याचा कमाईखोर सोशल मीडिया आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात नैतिकतेचा असलेला र्हास ,समाजात सध्या असणारी मूल्यव्यवस्था अशा सर्व प्रकारच्या घटकांचा प्रभाव आजच्या व्यक्तीवर पडत असतो.या सर्व बाबी जर भ्रष्ट झाल्या तर मोठ्या प्रमाणात लैंगिक दुराचार फैलावतो.त्याला प्रतिष्ठा देखील मिळते.रासरोजपणे बेकायदेशीर वेश्या व्यवसाय होटेल, लाॉज मधे चालते.प्रशासन,पोलिस ‘अर्थ’पुर्ण दुर्लक्ष करत राहतात.संस्कार द्यायला पालक,समाज व शिक्षण व्यवस्था कमी पडते.संस्कारी माणुस कधीच अशा प्रकारचे काम करत नाही. संस्कार घडवण्याऐवजी संस्कार विघडवणारी ही परिस्थीती निर्माण झाली आहे.त्यातुन हे आउटपुट येत असते.
तरी या केसमधे शिरुर पोलिसांनी एक चांगली कामगिरी आहे आहे, यात शंका नाही. मात्र ती समाजात सर्वदुर पोहोचणे आवश्यक आहे.