
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर.
Contents
- 1 शिरुर तालुक्यात बेकायदा दारु जप्त ! तर कवठे येमाई येथे हॉटेल चे बील देण्यावरुन मारहाण !
- 1.1 शिरुर पोलिस अंतर्गत टाकळी हाजी पोलीसांची कारवाई !
- 1.1.1 शिरुर,दिनांक- 14 डिसेंबर : (प्रकाश करडे यांच्याकडुन )
- 1.1.2 ‘ सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करा !
- 1.1.3 सापडलेला माल पुढीलप्रमाणे आहे—-
- 1.1.4 पुढील तपास पोहवा श्री. उबाळे हे करत आहेत. प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री .संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे. —— शिरुर तालुक्यातील दुसर्या घटनेत कवठे येमाई येथे हॉटेल चे बील देण्याच्या कारणावरून एकास मारहाण !
- 1.1.5 About The Author
- 1.1 शिरुर पोलिस अंतर्गत टाकळी हाजी पोलीसांची कारवाई !
शिरुर तालुक्यात बेकायदा दारु जप्त ! तर कवठे येमाई येथे हॉटेल चे बील देण्यावरुन मारहाण !
शिरुर पोलिस अंतर्गत टाकळी हाजी पोलीसांची कारवाई !
शिरुर,दिनांक- 14 डिसेंबर : (प्रकाश करडे यांच्याकडुन )
शिरुर तालुक्यात बेकायदा दारु जप्त करण्यात आली आहे. तर कवठे येमाई येथे हॉटेल चे बील देण्यावरुन एकास मारहाण करण्यात आली आहे. शिरुर पोलिस अंतर्गत टाकळी हाजी पोलीसांची चांडोह येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केल्यानुसार हकीकत अशी की संतोष सुभाष बनसोडे, पोलीस कॉन्सटेबल ,शिरूर पोलीस स्टेशन अंकित टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्र, यांनी शिरूर पोलीस स्टेशन अंकित टाकळी हाजी दूराक्षेत्रामध्ये हजर राहून सरकार तर्फे फिर्याद दिली आहे.ते पोलीस स्टेशनला गेल्या आठ महिन्यांपासून पोलीस कॉन्सटेबल म्हणून नेमणूकीसआहेत .
त्यांना खालील माल चांडोह, तालुका -शिरूर, जिल्हा- पुणे या गावातील बेल्हा – जेजूरी हायवे रोड लगत असलेलल्या हॉटेल कावेरीच्या पाठीमागील बाजूच्या भिंतीच्या आडोशास सापडला आहे.
‘ सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करा !
प्रिय वाचक,व्यावसायीक बंधुंनो,
‘सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करून हजारो वाचकांपर्यंत/ग्राहकांपर्यंत पोहोचा. आमच्या खास जाहिरात पर्यायांद्वारे तुमच्या ‘ब्रँड’ची लोकप्रियता वाढवा आणि तुमच्या ग्राहकांचा ओघ तुमच्यापर्यंत वाढवा.
——-
अधिक माहितीसाठी satyashodhak.blog ला भेट द्या किंवा आम्हाला 7776033958/9529913559 वर संपर्क करा.
—–
आपला,
डा.नितीन पवार,संपादक,
सत्यशोधक न्युज,
satyashodhak.blog——
सापडलेला माल पुढीलप्रमाणे आहे—-
1) 760/- रुपये किंमतीच्या रॉयल चॅलेंज कंपनीच्या (व्हिसकी) 180 मिली मापाच्या 64 काचेच्या बाटल्या; प्रत्येक बाटलीची किंमत 190/- रूपये प्रमाणे,
2) 640/- रूपये किमतीच्या मॅकडॉल्स नबर 1 (व्हिसकी) कपनीच्या 180 मिली मापाच्या 04 काचेच्या बाटल्या प्रत्येकी बाटलीची किंमत 160/- रूपये प्रमाणे.
एकुण:1400/- रूपये.
असा वरील वर्णनाचा व किंमतीचा प्रोव्हीशनचा माल सापडला आहे. तो पोलीस हवालदार वारे यानी दोन पंचांसमक्ष जागीच जप्त केला आहे. त्यानंतर तो माल ताब्यात घेवून जात मालातुन प्रत्येकी एक एक बाटली सँपल करीता काढून घेवून सॅम्पल बाटलिस व उर्वरीत जप्त मालास पोलीस हवालदार वारे यांची व पंचांची सह्यांची कागदी सिले जागीच केली आहेत.
“महाराष्टातील सर्व जिल्हे व तालुक्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत.इच्छुकांनी आपले आपले अर्ज np197512@gmail.com /7776033958(What’s App number यावर पाठवावेत.- संपादक”
म्हणुन फिर्यादी संतोष सुभाष बनसोडे, पोलीस कॉन्सटेयल, नेमणूक शिरूर पोलीस स्टेशन, अंकित टाकळी हाजी पोलीस दूरखक्षेत्र यांनी
रामदास नानाभाऊ शिंदी’,वय-48 वर्षे,राहणार- बाडोह, तालुका – शिरूर, जिल्हा- पुणे यांच्या विरुध्द महाराष्ट्र प्रोव्हीबिशन कायदा कलम 65 (ई) प्रमाणे सरकार तर्फे कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे.
पुढील तपास पोहवा श्री. उबाळे हे करत आहेत.
प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री .संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
——
शिरुर तालुक्यातील दुसर्या घटनेत कवठे येमाई येथे हॉटेल चे बील देण्याच्या कारणावरून एकास मारहाण !
शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केल्यानुसार हकीकत अशी की
दिनांक 09/12/2024 रोजी सांयकाळी 18:30 वाजण्याच्या सुमारास कवठे येमाई, तालुका -शिरूर, जिल्हा- पुणे येथील अष्टविनायक रोडच्या बाजूस असलेल्या ‘हॉटेल किनारा’ च्या बाहेरील मोकळ्या जागेत हॉटेल मधील बिल देण्याच्या कारणावरून
1) सुभाष पांडूरंग मुंजाळ, राहणार,मुंजाळवाडी, कवठे येमाई तालुका -शिरूर, जिल्हा- पुणे.
2) गणेश रावजी घोडे, राहणार- घोडेवस्ती, कवठे येमाई,तालुका- शिरूर,जिल्हा- पुणे यांनी संगणमत करून फिर्यादी श्री. प्रविण सदाशिव वागदरे, वय- 32 वर्षे ,व्यावसाय -शेती, राहणार – येडेबोराडे वस्ती, कवठे येमाई,तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे यांना लाकडी दांड्याने, लाकडी काठीने , दगडाने मारहाण करून दमदाटी केलेली आहे. म्हणून त्यांनी त्यांच्याविरूद्ध शिरुर पोलिस ठाण्यात कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे.
आरोपींवर शिरूर पोलिस स्टेशनमध्ये भादवी कलम 118 (1), 351(2),324 (4),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस हवालदार श्री.उबाळे हे करत आहेत.
दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री.टेंगले हे आहेत.
प्रभारी अधिकारी श्री.संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.